नवीन लेखन...

दृष्टिकोन

आता मी सुद्धा माझा दृष्टिकोन बदलून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसा भाग घेता येईल  असे कार्यक्रम सादर करायचे ठरविले . विद्यार्थ्यांचा आनंद हाच तर माझा आनंद होता. मुलांच्या दृष्टिकोन जाणून घेतल्यामुळे मला  अनाकलनीय असं काहीतरी साध्य केल्याचा आनंद झाला.        […]

५ जून २०२२ – ‘जागतिक पर्यावरण दिन’

दोनच दिवसांनी , ५ जून २०२२ रोजी, ‘जागतिक पर्यावरण दिन’ आहे,  हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. सतराव्या शतकात ‘संत तुकारामांनी’, वृक्षाचे महत्त्व सांगताना “वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे’, असा अतिशय सुंदर अभंग रचून सामाजिक संदेश  दिला.  […]

स्वातंत्र्य संग्रामातील विरांगना – मातंगिनी हाजरा

स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या अनेक महिला होत्या . त्यातील एक म्हणजे ‘मातंगिनी  हाजरा’.   त्यांची धडाडी मला भावली. माझ्या कलकत्याच्या वास्तव्यात ‘  हाजरा स्ट्रीट’ वरून चालताना मला गहिवरून येत असे. बंगालमध्ये ‘मातंगिनी  हाजरा’ नावाने अनेक शाळा, हॉस्पिटल्स, रस्ते आणि पुतळे उभारले गेले आहेत. […]

‘अनुभूती’ कुटुंब न्यायालयीन खटल्यांची

पंधरा कथा असलेले आणि केवळ ८८ पानांचे हे पुस्तक, मराठी कायदेविषयक साहित्यातील एक अमूल्य ठेवा बनून राहिले आहे. लेखिका बागेश्री ताई , या कुटुंब न्यायालयाच्या निवृत् न्यायाधीश आहेत . तसेच  गेली चाळीस वर्षे मॅरेज  कौन्सिलिंग नंतर न्यायदान आणि त्यानंतर ज्येष्ठांचे कौन्सिलिंग करीत असताना त्यांना जे अनुभव आले ते केसेस  आणि कथांद्वारे त्यांनी लिहिले आहेत. […]

‘दामू, साने गुरुजींचा धडपडणारा मुलगा’ – पुस्तक परिचय

हे पुस्तक आशाताई कुलकर्णी यांनी २०१८  मध्येच मला सप्रेम भेट म्हणून दिले होते. त्यावेळी मी ते पुस्तक वाचून काढले होते, पण पंधरा दिवसांपूर्वी ते पुस्तक मी वाचू लागले आणि त्यातला सखोल आणि सुयोग्य अर्थ, खरेपणा मला जाणवू  लागला. हा धडपडणारा विद्यार्थी म्हणजे, तरुण वयातच भारावून जाऊन, देश आणि लोक सेवाकार्यात झोकून देणारा ‘दामोदर बळवंत कुलकर्णी”,  म्हणजेच साने गुरुजींचा दामू !  ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’  हा त्यांचा सामाजिक कार्याचा गाभाच आणि मूलतत्वच  होते. […]

प्रतिभा – व्हिन्सेंट व्हॅन गॉगची – भाग २

व्हॅन गॉगच्या मृत्यूनंतर चित्रकार म्हणून त्याची कारकीर्द संपुष्टात आली असली तरी जगाला प्रेरणा देणारा भविष्यातील एक महान चित्रकार म्हणून त्यांचा वारसा जपला गेला आहे . त्याची कीर्ती त्याच्या मृत्यूनंतर वाढत गेली. त्याची गणना जगातील महान चित्रकारांमध्ये केली जाते . आधुनिक कलेच्या संस्थापकांपैकी एक असे त्याला मानले जाते. […]

प्रतिभा – व्हिन्सेंट व्हॅन गॉगची – भाग १

ॲम्स्टरडॅममधील जगप्रसिद्ध भव्यदिव्य असे ‘व्हिन्सेंट व्हॅन  गॉग’ म्युझियम हे व्हॅनगॉगच्या चित्रकला प्रदर्शनाचे सर्वात  मोठे म्युझियम होय. या म्युझियम मध्ये 200 पेक्षा अधिक रंगवलेली चित्रे, पेंटिंग्स, पाचशे चित्रे ,चार स्केच बुक्स,  तसेच व्हॅन गॉगच्या अक्षरात लिहिलेली सातशे पत्रे आहेत.  कलाकाराची कला कशी  प्रगल्भ आणि सुंदर होत जाते याचा उत्कृष्ट नमुनाच बघायला मिळतो . […]

कथा ‘अ‍ॅन फ्रँक’ची

आम्ही युरोपच्या ‘टूरवर’ असताना, नेदरलँड ला उतरलो. ‘अ‍ॅन फ्रॅंक हाऊस ‘ नावाने जागतिक प्रसिद्धी पावलेल्या आणि ऐतिहासिक म्युझियम ला भेट देण्यास निघालो.   तेंव्हा हा रस्ता जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य  पर्यटकांनी फुलून गेला होता. इमारतीच्या दर्शनी भागाच्या समोर उभे राहून शेकडो पर्यटक ‘म्युझिअमचे ‘  फोटो काढून घेत होते.  आम्ही प्रथम तिकीट काढून रांगेत उभे राहिलो आणि जेंव्हा त्या ‘वास्तूत ‘ मी पहिले पाऊल टाकले तेव्हा माझे अंग थरारले.  विशेष लक्षवेधी बाबी म्हणजे अ‍ॅन फ्रॅंक हिचे ‘बोलके मंतरलेले  डोळे’ असणारे चित्तवेधक चित्र आणि प्रवेशद्वारा समोरचा ‘पुतळा’. […]

जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे अर्थात नाना शंकरशेठ

आज आपण अशा एका व्यक्तीच्या आठवणींना उजाळा देणार आहोत की ज्यांनी मुंबईच्या शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक गोष्टींच्या पायाभरणीत सिंहाचा वाटा उचलला आहे.  अशी ही महान व्यक्ती म्हणजे जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे, म्हणजेच  नाना शंकर शेठ. आधुनिक मुंबईचे शिल्पकार. वयाच्या बाविसाव्या वर्षापासून अगदी मृत्यूपर्यंत म्हणजे ६५ व्या वर्षापर्यंत मुंबईच्या जडणघडणीत त्यांनी केलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. या महिना अखेरीस , म्हणजे, 31 जुलै 2021 ला त्यांचा 156 वा  स्मृतीदिन आहे. त्यानिमिताने हा त्यांच्या योगदानाचा उहापोह ! […]

गुरुपौर्णिमा

अलौकिक बुद्धीमत्ता, विद्वत्ता असलेली व्यक्ती जागतिक वाड्.मयातही सापडणं दुर्मिळच आहे. अशा ह्या श्रीव्यासांचे पुण्यस्मरण या गुरूपौर्णिमेच्या निमित्तानं करणं औचित्यपूर्ण आहेच, ते भारतीय समाजाचं कर्तव्य आहे. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..