बिहार डायरी – पृष्ठ दोन : मु. पो. हाजीपूर !
८-९ मुली- किंचित धीट, किंचित बुजऱ्या ! वयोगट १२-१४. आज दुपारी सगळ्याजणी आमच्या समोर “नुक्कड नाट्य ” करून दाखविण्यासाठी जमलेल्या. निमित्त होते- कंपनीच्या सी एस आर ( सामाजिक उत्तरदायित्व ) अंतर्गत नजीकच्या वैशाली जिल्ह्यातील ५० अंगणवाड्या आणि ५० शाळांमध्ये ” कुपोषण, व्यसनाधीनता, रस्ता सुरक्षा ” अशा विषयांवर स्ट्रीट प्ले करणाऱ्या या कन्यका – भोजपुरी आणि हिंदीत – प्रत्येकी ५-१० मिनिटांचे. […]