नवीन लेखन...

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

जीवसृष्टीतील इतर प्राणीमात्रांच्या तुलनेत मानवाला अधिक बुध्दिमत्तेचे वरदान लाभले आहे. या अत्त्याधिक (?) बुध्दीचा वापर करून मानवाने आपले भौतिक, भावनिक, मानसिक जीवन समृध्द करण्यासाठी अनेक शास्त्रांना जन्म दिला. चौसष्ट कलांची चौसष्ट शास्त्र निर्माण झाली असे म्हटले तर वावगे ठरू नये.
[…]

खाण तशी माती

‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’, असे तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले आहे. बीज जर शुद्ध असेल तर त्यापासून तयार

होणाऱ्या झाडाला लागणारी फळे रसरशीत, कसदार आणि अवीट चवीचीच असणार. मात्र मुळात बीजच अशुद्ध असेल तर फळेही

निकस आणि निकृष्टच निपजणार. हा न्याय केवळ वनस्पतीसृष्टीलाच लागू आहे, असे नाही.
[…]

सज्जनांची तटस्थता

आज संपूर्ण जग हे समस्यांचे माहेरघर झालेले आहे. एकजात सर्वांनी होकारार्थी माना डोलवाव्यात असेच हे वाक्य आहे आणि सर्वांच्या माना डोलतातसुध्दा. परंतु केवळ माना डोलावण्याने काय साध्य होणार? समस्या उद्भवणे आणि त्यांचे निराकरण हे जगाचे रहाटगाडगे चालू राहण्याचे एक प्रमुख कारण आहे.
[…]

नोकरशाहीचे उफराटे सल्ले

प्रगतीचा एकेक टप्पा गाठणार्‍या आदिमानवाने हजारो वर्षांपूर्वी चाकाचा शोध लावला. चाकाचा शोध लागल्यानंतर मानवाच्या प्रगतीची गती अधिकच वाढली. चाक आले आणि चाकापाठोपाठ गाडे आले, पुढे-पुढे चाकाचे महत्त्व अतिशय वाढले. आज तर

परिस्थिती अशी आहे की, चाकाचा उल्लेख केल्याशिवाय आमचे कोणतेच गाडे पुढे सरकू शकत नाही.
[…]

हे हलाहल आम्ही पचवू शकणार नाही

हिंदुस्थानला कायमस्वरूपी गुलामीत ढकलू पाहणार्‍या शक्तींनी बाहुबलाऐवजी बुध्दिबळाने आपले प्रयत्न चालविल्याचा उल्लेख मागील ‘प्रहार’मध्ये मी केला आहे. या शक्तींनी आपली कुटिल योजना तडीस नेण्यासाठी तीन प्राथमिक लक्ष्ये निर्धारित केली आहेत. त्यापैकी संस्कृतीवरचे त्यांचे अप्रत्यक्ष आक्रमण कसे यशस्वी ठरले, याचा उहापोह मागील लेखात झालाच आहे. […]

पारतंत्र्याचे पाश आवळले जात आहेत!

मानवी इतिहास हा युद्धांचा इतिहास आहे. वर्तमानही काही वेगळे नाही आणि भविष्यावरदेखील युद्धाचे सावट पडलेले स्पष्ट दिसत आहे. रक्तरंजित युद्धाचा आणि मानवाचा हा अन्योन्य संबंध निर्माण का झाला, युद्ध कशासाठी लढली जातात, या प्रश्नांची उत्तरे

केवळ साम्राज्यविस्तार असे दिले जात असेल तर ते अतिशय त्रोटक ठरेल. साम्राज्यविस्तार हे वरकरणी दिसणारे कारण आहे.
[…]

अति तिथं माती

भारतीय पुराणातील भस्मासुराची आणि युरोपियन लोकसाहित्यातील मिडास राजाची कथा जवळपास सर्वांनाच माहीत आहे.भस्मासुराची प्रवृत्ती आणि आताच्या अतिरेक्यांची प्रवृत्ती यामधील साम्य लक्षात घेतल्यास भस्मासुराला आद्य क्रांतिकारकाच्या धर्तीवर आद्य अतिरेकी म्हणून संबोधण्यास हरकत नाही. […]

डॉक्टर आजारी झालेत!!

मनुष्य समाजप्रिय प्राणी आहे, असे म्हटले जाते. नव्हे तो समाजप्रिय प्राणी आहेच. आदिम काळातील रानटी अवस्थेपासून मनुष्यप्राण्याची ती स्वाभाविक गरज ठरत आली आहे. शत्रूच्या तुलनेत शारीरिकदृष्ट्या दुर्बल असलेले प्राणी समूहाने वावरून आपली सुरक्षितता जोपासतात, हा निसर्गनियम आहे आणि मानव त्याला अपवाद नाही. […]

निखार्‍यांचा कोळसा होऊ नये!

एक पौराणिक कथा आहे. रघुराजाच्या दरबारात एक याचक आला. त्या याचकाने मागितलेले दान देण्याइतकी संपत्ती

रघुराजाच्या खजिन्यात नव्हती.
[…]

आता उरले लुटण्यापुरते

पृथ्वीचा फेरफटका मारताना एकदा आद्य वार्ताहर नारदमुनींना एक गलेलठ्ठ डुक्कर घाणीत/गटारात लोळताना दिसले. ईश्वरी अवताराचे महाभाग्य लाभलेल्या वराहाची ती अवस्था नारदाला पाहवली नाही.
[…]

1 49 50 51
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..