नवीन लेखन...

नियमितपणे प्रसिद्ध होणार्‍या मजकूरासाठी खास सदरे

ब्लॅक आउट

हवामान सकाळपासून खराब होणार आहे असा व्हेदर फोरकास्ट आदल्या दिवशीच मिळाला होता त्यामानाने संध्याकाळी साडे सहाला डिनर होईपर्यंत सहन करण्याइतपत जहाज हेलकावत होते. पण रात्री दहा नंतर वाऱ्याचा वेग वाढला होता. सुं सुं करत वाहणाऱ्या वाऱ्यासोबत लाटांनी सुद्धा आक्राळ विक्राळ रूप धारण केले होते. जहाज येणाऱ्या लाटेवर स्वार होऊन दुसरी लाट यायच्या आत दोन्हीही लाटांच्या मध्ये धाडकन खाली आदळत होते आणि पुन्हा एकदा उसळी मारल्या सारखं वर येत होतं. […]

ऑनबोर्ड सरदार

आजपर्यंत जेवढ्या जहाजांवर काम केले त्या त्या सगळ्या जहाजांवर कमीत कमी एक तरी दाढी आणि पगडी असलेले सरदार हे अधिकारी किंवा खलाशी असायचे. […]

जे एस एम अलिबाग

बी ई करताना अलिबागच्या जे एस एम कॉलेज ची खूप आठवण यायची. डिग्री करताना फर्स्ट ईयर मध्ये प्रत्येक शुक्रवारी शेवटची मालदार नाहीतर अजंता पकडून अलिबागला यायचे आणि सोमवारी पहिली अजंता पुन्हा मुंबईला जायचे. साहजिकच पुढल्या वर्षी ड्रॉप लागण्यासाठी कमीत कमी जेवढ्या केट्या लागतात त्याच्यापेक्षा डबल केट्या लागल्या. […]

मकान डुलु

कितीही महत्वाचे काम असले तरी त्यांच्या नमाज पठणाची वेळ झाली की ते काम थांबवून जातात असं ऐकलं होतं पण मला तसा अनुभव कोणाकडूनच आला नाही. उलट कॉफी ब्रेक किंवा जेवणाची वेळ होतं आली की मीच त्यांना त्यांच्या भाषेत बोलायचो, मकान डुलु,मकान डुलु म्हणजे जेवायला चला जेवायला चला. […]

तंत्रविश्व – भाग ८ : उत्पन्नाचा पर्यायी स्रोत – शेअर मार्केट

2020 आणि 2021 ही दोन वर्षे प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय ठरतील अशी वर्षे असणार आहेत.कोरोनाचे थैमान आणि त्यामुळे निर्माण   झालेल्या विविध क्षेत्रातील  अभूतपूर्व बदलाचे परिणाम अजून काही महिने तरी जाणतील असे चित्र आहे. समाजातील उच्च उत्पन्न गटातील व्यक्तींना याचे परिणाम फारसे जाणवले नाहीत ,परंतु मध्यमवर्गीय आणि हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य जनतेला कोणामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींना […]

पेबेलॉकॉन आयलंड

मागील तीन महिन्यात जहाजावरुन दिसणाऱ्या बेटाचे ज्याचे नाव पेबेलॉकॉन आयलंड आहे त्याच्याबद्दल सगळ्यांकडून खूप ऐकले होते. जहाजावरुन आयलंड दिसायचं पण थोडंसंच. पाण्याच्या वर तरंगणारी थोडीशी हिरवीगार झाडी आणि एका चिमणीतून जळणाऱ्या गॅसची एक तांबडी फडफडणारी ज्वाला. रात्रीच्या निरव शांततेत आणि अंधारात तर ही ज्वाला आणखीनच प्रखर दिसायची. […]

सेकंड इंजिनियर

दुपारी एक वाजता जाणाऱ्या सेकंड इंजिनियर कडून हॅन्ड ओव्हर आणि माझ्याकडून टेक ओव्हर सुरु झाले. खाली इंजिन रूम मध्ये वेगळी लिफ्ट मेन डेकवरून खाली इंजिन रूम चे पाच मजले. दुसऱ्या मजल्यावर कंट्रोल रूम च्या खाली आणखी तीन मजले. […]

जॉइनिंग ऑनबोर्ड

जकार्ता सोडल्यावर बोट निघाल्यापासून तासाभरात निळ्याशार समुद्रात गेल्यावर वारा आणि लाटांमुळे बोट रोलिंग करायला म्हणजेच घड्याळाच्या दोलका प्रमाणे इकडून तिकडे हलायला लागली होती. सकाळचे सव्वा आठ की साडेआठ वाजता बोटीत येऊन सीटवर बसल्या बसल्या थंडगार एसी मुळे जी झोप लागली ती दोन तासांनी अनाउन्समेंट झाली नसती तर कदाचित उडाली नसती. […]

तेरीमा कसीह

डिपार्चर नंतर अरायव्हलला पब्लिक ऍड्रेस सिस्टिम वर इंडोनेशियन भाषेत अनाउन्समेंट झाल्यावर तेरीमा कसिह हा शब्द ऐकला. तोच शब्द विमानातून बाहेर पडताना एअरहोस्टेस सगळ्यांना बोलत होती. तेरीमा कसिह या इंडोनेशियन शब्दाचा अर्थ म्हणजे धन्यवाद. […]

ब्लँक कॉल

चीफ ऑफिसरने सुरवात केली, तुम्हा सर्वांपैकी कोणाला एखाद्या बद्दल काही तक्रार असेल तर चीफ इंजिनियर किंवा कॅप्टन कडे येऊन तसे सांगावं. पण अशाप्रकारे कोणाला त्रास देऊ नये. मागील दोन दिवसापासून कॅप्टन च्या केबिन मध्ये रोज रात्री कोणत्याही वेळेला फोन करत आहे. रात्री बारा वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत तीन चार वेळेला कोणत्याही वेळी ब्लँक कॉल करून कॅप्टनची झोपमोड केली जातेय. […]

1 2 3 4 126
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..