नवीन लेखन...

नियमितपणे प्रसिद्ध होणार्‍या मजकूरासाठी खास सदरे

एजन्ट

बरेच जणांना प्रश्न पडतो की आम्ही जहाजावर कसे जातो किंवा जहाजावरुन घरी कसे येतो. आम्हाला घ्यायला किंवा सोडायला जहाज मुंबईत किंवा भारतात येते का किंवा कसे. मी असलेले एकही जहाज आजपर्यंत मुंबई काय भारतातील कोणत्याही पोर्ट मध्ये आलेले नाही. फक्त एकदाच सिंगापूरहुन गल्फ मध्ये जाताना भारतीय सागरी हद्दीतून काही तास गेले आहे. जिथे जहाज असेल तिथे आम्हाला पाठवले जाते. मग ते जहाज परदेशात असो किंवा भारतातील कोणत्याही पोर्ट मध्ये असो. जहाज ज्या देशात असेल तिथला विजा, इमिग्रेशन किंवा ईतर सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतरच जहाजावर पाठवले जाते तसेच जहाजावरून घरी पाठवले जाते. जहाजावर जसे कोणाला तरी रिलीव्ह करायला जावे लागते तसेच कोणी रिलिव्हर आल्याशिवाय जहाजावरुन खूप दुर्मिळ वेळा परत यायला मिळते. दुसरा कॅप्टन आल्याशिवाय सध्याचा कॅप्टन जाऊ शकत नाही तसेच पॅम्पमॅन आणि फिटर यांच्यापैकी एखादा खलाशी सुद्धा रिलिव्हर आल्याशिवाय जाऊ शकत नाही. […]

टेबल मॅनर्स

फोर्क आणि स्पून ने जेवायचे, जेवताना अन्न खाली पडून द्यायचे नाही. प्लेट मध्ये काट्या चमच्यांचा आवाज नाही झाला पाहिजे. फोर्क किंवा क्नाइफ कोणत्या हातात पकडायची वगैरे वगैरे सांगितले गेले. अर्ध्यापेक्षा जास्त जणांना हे माहिती होते आणि त्यांना तसं जेवता पण येत होते. पण माझ्यासारख्या काहीजणांना जेवताना कसले मॅनर्स पाळायचे, जहाजावर जाऊ तेव्हा बघू असं वाटायचं. घरात मांडी घालून हाताने जेवायची सवय, शेतावर लावणी नाहीतर कापणीला डाव्या हातावर भाकरी आणि त्याच भाकरीवर वाळलेले बोंबील, सुकट नाहीतर जवळ्याचे कालवण खाताना जी चव लागते ती पंचपक्वान्ने खाताना कशी काय मिळायची आणि तीसुद्धा काटे चमच्यांनी […]

वॉकी टॉकी

दुपारी दोन च्या सुमारास एबी आणि पंपी 3P टॅन्क चे झाकण उघडून तिथे काहीतरी काम करत असताना एबीच्या खिशात असलेला वॉकी टॉकी खाली टॅन्क मध्ये पडला. एबी ला वाटले आता चीफ ऑफिसर आणि कॅप्टन च्या शिव्या खायला लागतील. तो पंपीला म्हणाला कोणाला सांगू नकोस मी खाली जाऊन वॉकी टॉकी घेऊन येतो. पंपी त्याला म्हणाला वेड बीड लागलंय का तुला पन्नास फुटांवरून खाली पडलेला वॉकी टॉकी एकतर फुटला असेल नाहीतर खाली क्रूड ऑईल मध्ये खराब झाला असेल. त्याहीपेक्षा अजून टॅन्क क्लिनिंग व्हायचे बाकी आहे, खाली जाणाऱ्या शिडीवर ऑईल असेल उतरताना किंवा चढताना खाली पडशील. तू काही खाली जाऊ नको आपण सांगू कॅप्टनला. पण एबी काही ऐकेना तो खाली भराभर उतरू लागला आणि खाली टॅन्क मध्ये उतरल्यावर शोधता शोधता खाली पडला. पंपी काय ओळखायचे ते ओळखला आणि त्याने लगेच वॉकी टॉकी वरून कार्गो कंट्रोल रूम मध्ये ड्युटी ऑफिसरला एबी खाली टॅन्क मध्ये उतरला आणि बेशुद्ध पडला असल्याचे कळवले. […]

सीओसी

जहाजावर मरीन इंजिनियर व्हायचे म्हणजे एक वर्षाचा प्री सी ट्रेनिंग कोर्स करून कमीत कमी सहा महिने पूर्ण करावे लागतात. सहा महिने काम केल्याशिवाय मरीन इंजिनियर किंवा जवाबदार अधिकारी होण्यासाठी आवश्यक असलेली परीक्षा देता येत नाही. आपल्या भारतात ही परीक्षा भारत सरकारच्या समुद्र वाणिज्य विभाग म्हणजेच मर्कंटाईल मरीन डिपार्टमेंट कडून घेतली जाते. भारतात आणि विशेषकरून मुंबईतील केंद्रावर घेतली जाणारी परीक्षा जगातील इतर कोणत्याही देशांपेक्षा अवघड आणि कठीण समजली जाते. लेखी परीक्षा आणि त्याचसोबत तोंडी परीक्षा सुद्धा घेतली जाते. ज्यामध्ये अधिकारी होण्याकरिता लागणारी निर्णयक्षमता आणि कोणत्याही परिस्थितीला किंवा आव्हानाला सामोरे जायची सक्षमता तपासली जाते. म्हणूनच परीक्षा पास झाल्यावर मिळणारे सीओसी म्हणजे सर्टिफिकेट ऑफ कॉम्पेटेन्सी ज्याला सक्षमता प्रमाणपत्र असेच म्हटले जाते. […]

व्ही – सॅट

सूर्यदेवाचा खेळ संपल्यावर आता चंद्रदेवाने खेळ सुरु केला, चांदण्या लुकलुकायला लागल्या. ट्रेनी सिमनला म्हटलं आता चंद्रप्रकाश कसा दुधाळ दिसतोय पण तो कसल्यातरी विचारात दिसला, तरीपण तो म्हणाला दुधाळ चंद्रप्रकाश पाहिला की तिचा मधाळ चेहरा आठवतो. वाऱ्याची झुळूक आली की तिचे भुरभुरणारे केस आठवतात. जलतरंग जहाजावर येऊन आदळतात तितक्याच मंजुळ स्वरात तिच्या बांगड्या वाजल्याचे आठवतं. त्याला म्हटलं बस कर आता आठवणी, जाऊन मेसेंजर वर व्हिडिओ कॉल कर आणि बघत बस मधाळ चेहरा, फॅनवर भुरू भुरू उडणारे केस आणि बांगड्यांचे मंजुळ स्वर. […]

एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट

बाळ गर्भात एका बाजूला गेल्याने बाळाने मुव्हमेन्ट करून दुसऱ्या बाजूचे अवयव दिसावे म्हणून डॉक्टर प्रशांत पाटील यांनी प्रयत्न केले. पण बाळ फिरायला तयार होईना म्हणून ते मिस्कील पणे म्हणाले की बाळ झोपा काढतय हलायला तयार नाहीये आणि त्याचक्षणी बाळाने एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर फिरावे तशी गर्भात गिरकी मारली. बाळाची पूर्ण तपासणी संपत आली असताना बाळाचा एका हाताचा पंजा सोनोग्राफी स्क्रीन वर हलताना दिसला. डॉक्टर प्रशांत पाटील यांनी लगेच बघा बाळ गर्भातुन आपले बोलणे ऐकून आता आपल्याला टाटा बाय बाय सुद्धा करत आहे असे हसून सांगितले. […]

स्मार्ट इंजिन

आपल्या भारत सरकार तर्फे घेतली जाणारी एम ई ओ क्लास फोर म्हणजे मरीन इंजिनियर ऑफिसर क्लास फोर ही परीक्षा पास केल्यानंतर मला कंपनीने माझ्या सागरी जीवनातील दुसऱ्याच जहाजावर पाठविले. माझे दुसरे जहाज आईस क्लास तर होतेच पण त्याशिवाय या जहाजावरील इंजिन स्मार्ट इंजिन किंवा इलेक्ट्रॉनिक कंट्रोल्ड प्रकारचे होते. परीक्षा पास झाल्यावर पहिलेच जहाज असल्याने फोर्थ इंजिनियर म्हणून न पाठवता पुन्हा एकदा ज्युनियर इंजिनियर म्हणून पाठवण्यात आले होते. पण जहाज जॉईन केल्यानंतर पंधरा दिवसातच चीफ इंजिनियरकडून माझा रिपोर्ट मागवला गेला आणि दुसऱ्याच दिवशी फोर्थ इंजिनियर म्हणून प्रमोट केले गेले.
[…]

स्टीवर्ड

रात्री तापा साठी गोळ्या घेऊन झोपायला गेलेला स्टीवर्ड सकाळी कामावर आला नाही म्हणून कूक ने चीफ मेट शी बोलून एक ट्रेनी सी मन मदत करण्यासाठी मागून घेतला. चीफ मेट ने कॅप्टन च्या कानावर ही गोष्ट घातली. कॅप्टन ने स्टीवर्ड ला केबिन मध्ये फोन करून तब्येतीची विचारणा केली असता त्याने डोकं दुखतंय आणि मळमळते आहे असे सांगितले तसेच अंगावर लालसर पुरळ उठत असल्याचे सांगितले. कॅप्टन ने सेकंड मेट ला विचारून कोण कोणत्या गोळ्या दिल्या याबद्दल खात्री करून घेतली. […]

ऑईल स्पिल

वेक अप कॉल वाजल्यापासून आठ ते दहा मिनिटे झाले नव्हते की लगेच पुन्हा रिंग वाजली. तोंडातला ब्रश काढून घाईघाईत तोंड धुवून फोन उचलला तर पलीकडून मोटर मन म्हणाला जसे असाल तसे या खाली इंजिन रूम मध्ये ऑईल स्पिल झाले आहे. खाली जाताना चीफ इंजिनियर, सेकंड इंजिनियर आणि जुनियर इंजिनियर हे पण सगळे घाई घाईत पळत चालले होते. खाली जाऊन बघतो तर प्यूरीफायर रूम मधून काळे हेवी फ्युएल ऑईल दरवाजा बाहेर ओसंडून वाहत होते. […]

रोलिंग

सोमालियन पायरेट्सने केलेल्या अयशस्वी हल्ल्या नंतर आमच्या जहाजावर असणारे रायफलधारी सिक्यूरीटी गार्ड श्रीलंकेच्या ग्याले बंदरात उतरणार होते. सोमालियन पायरेट्सने दिवसा ढवळ्या जहाजाला हायजॅक करायचा प्रयत्न केला होता. पण जहाजावर ए के 47 रायफल हातात घेऊन उभे असलेले सिक्यूरीटी गार्ड बघून पायरेट्स जास्त वेळ व त्यांची शक्ती खर्च न करता माघारी फिरून गेले होते. […]

1 2 3 4 5 6 125
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..