नवीन लेखन...

नियमितपणे प्रसिद्ध होणार्‍या मजकूरासाठी खास सदरे

समर्पितांच्या सहवासात….

मनस्वी वृत्तीची माणसे स्वप्नांचे पाठलाग सहसा सोडत नाही. ठरविलेल्या प्रघातांची, परिघांची चाकोरी सोडत नाही आणि बघता-बघता एका उंचीवर पोहोचतात. आपल्यालाही त्यांच्यात सामील करून घेतात. अशांच्या समूहात मग स्वतःलाच उत्साही वाटायला सुरुवात होते, त्यांच्या आदरातिथ्याने भारावयाला होते आणि त्यांच्या सहवासानंतर अतृप्ती घेऊन परतावे लागते. […]

युरोप ऑन रेल (युरेल) आणि युरो स्टार – भाग ३

स्वित्झर्लंडला जाणारी पुढील गाडी लिऑन या दुसऱ्या स्टेशनवरून सुटणारी असल्याने संध्याकाळच्या भर गर्दीत ट्यूबनं पॅरिस नॉर्ड येथून सर्व मोठ्या बॅग्ज नेण्यासाठी महा कसरत करावी लागली. मुंबईत याबाबतीत विचार करणंसुद्धा शक्य नाही, परंतु या देशात गाडीतून उतरणं फारच सोपं होतं. लिऑन स्टेशनला अनेक प्लॅटफॉर्मूस, त्यातही इन्डिकेटरवरील गाड्यांची नावं फ्रेंच भाषेत असल्याने आम्हाला ती नीटपणे वाचता येत नव्हती. […]

‘चार’ असतात ‘पक्षिणी’ त्या ! रात असते ‘कायमची’ वादळी !!

कुसुमाग्रजांनी “वीज म्हणाली धरतीला ” (१९७०) मध्ये लखलखणाऱ्या झाशीच्या राणीचे आणि तिच्या विस्तवाला प्राक्तन बांधलेल्या सहेल्यांचे हे घायाळ करणारे वर्णन लिहिलंय. आमचे गुलज़ार महोदय ” नमकीन ” (१९८२) मध्ये असेच तीन निखारे (शर्मिला, शबाना आणि किरण वैराळे) उशाला घेऊन निजणारी वहिदा रंगवितात, पुन्हा चार पक्षिणी ! […]

युरोप ऑन रेल (युरेल) आणि युरो स्टार – भाग २

अॅमस्टरडॅम ते लंडन हा पहिला प्रवास रेल्वे-बोट-रेल्वे’ असा होता व त्यातही साध्या वर्गाचं तिकीट काढलं होतं. अॅमस्टरडॅम रेल्वे स्टेशन अक्षरशः डोळे दिपवून टाकणारं आहे. तेथील स्वच्छता, टापटीप व तुरळक गर्दी या गोष्टीही मनात आणि नजरेत भरतात. १५ ते २० प्लॅटफॉर्म्सवर अनेक गाड्या निघण्याच्या प्रतीक्षेत होत्या. आमच्या डब्यात मात्र प्रवाशांची बरीच गर्दी होती. जेमतेम बसण्याची सोय झाली […]

युरोप ऑन रेल (युरेल) आणि युरो स्टार – भाग १

जीवनात काही गोष्टी योगायोगाने अशा काही घडत जातात, की मागे वळून पाहताना त्या खरंच घडल्या होत्या यावर विश्वास बसत नाही. तशीच गोष्ट माझ्या आयुष्यात घडली आणि ती म्हणजे रेल्वेने युरोपची भ्रमंती! सन १९८० मध्ये माझा एक मित्र वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी जर्मनीत गेला. त्यानं जर्मनीला येण्याचं आग्रहाचं आमंत्रण दिलं आणि त्यातूनच एका अविस्मरणीय रेल्वेप्रवासाची आखणी कागदावर उतरली. […]

लोकल व इंजिने चालविणाऱ्या महिला चालक

भारतीय रेल्वेच्या १४५ वर्षांच्या इतिहासात इ.स. २००० नंतर आलेली अभूतपूर्व क्रांती म्हणजे लोकल गाड्या व इंजिनं चालविण्यासाठी महिला ड्रायव्हर्सची झालेली नेमणूक! आज एकूण ५० महिला या अशा विविध तऱ्हेच्या गाड्या चालवतात. इंजिनाच्या खिडकीत उभं राहून स्टेशनवर गाडीचालक म्हणून होणारं त्यांचं आगमन निश्चितच कौतुकास्पद आहे. […]

इंजिन ड्रायव्हर्स आणि गाडीचा प्रवास

गाडी चालविण्याची संपूर्ण जबाबदारी मुख्य ड्रायव्हरची असते. प्रवासात काही अडचण आली, तर मुख्य ड्रायव्हर आपली जागा सोडून खाली उतरत नाही. ते काम साहाय्यकाचं (असिस्टंट ) असतं. […]

चित्तरंजन प्रकल्प – रेल्वे इंजिन कारखाना

चित्तरंजन प्रकल्पामुळे रेल्वेला लागणाऱ्या सर्व तांत्रिक बाबींत भारत स्वावलंबी झाला. परदेशी गंगाजळीत मोलाची भर पडली आणि एक आदर्श, नव्याने बांधलेलं अद्ययावत शहर म्हणून चित्तरंजनची भारतभर ख्याती झाली. […]

रेल्वेची इंजिने

इलेक्ट्रिकची इंजिनं आली आणि गाड्यांचे वेग वाढले. इंजिनड्रायव्हरचं जीवन सुसह्य झालं. मालगाड्यांच्या डब्यांची संख्या वाढू लागली. सन १९६२ पासून, म्हणजेच जेव्हा मालगाड्यांच्या डब्यांची संख्या वाढू लागली तेव्हापासून, डिझेल इंजिनाचं आगमन झालं. डिझेलवर चालणाऱ्या इंजिनाची हॉर्सपॉवर २६०० ते ५५०० पर्यंत असल्याने लांब पल्ल्याच्या २२ ते २५ डब्यांच्या प्रवासी गाड्यांचा वेग वाढला. […]

मार्शलींग यार्ड

कोणतीही मालगाडी नीटपणे न्याहाळली तर असं लक्षात येतं, की तिला भारतातील वेगवेगळ्या विभागांचे डबे जोडलेले असतात. नॉर्थन रेल (एन.आर.), वेस्टर्न रेल (डब्ल्यू.आर.), वगैरे. असे डबे काही महत्त्वाच्या जागी एकमेकांना जोडले जाऊन त्यांची ६० ते ७० डब्यांची मालगाडी तयार होते. ज्या जागी अशा अनेक मालगाड्यांचे डबे वेगवेगळ्या विभागांतून येतात त्या जागांना ‘मार्शलींग यार्ड’ म्हणतात. यांमध्ये मुख्यत: दोन […]

1 4 5 6 7 8 141
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..