भारताच्या पूर्वेकडील टोकावर, जिथे उगवता सूर्य पहिल्यांदा हिमालयाच्या कुशीत हसतो, त्या भूमीतील काही ठिकाणं नकाशावर दिसतात, पण त्यांचं सौंदर्य मनाने अनुभवावं लागतं – तेव्हाच प्रवासाचा अर्थ उमगतो. ‘तवांग’ आणि ‘सेला खिंड’सारख्या प्रसिद्ध ठिकाणां पलीकडेही अरूणाचल प्रदेशात अशा अनेक अद्भुत जागा आहेत – ज्या तुम्हाला अनोख्या संस्कृतींच्या, निसर्गाच्या आणि मानवी साधेपणाच्या जवळ नेतात. चला, या भागात करूया अशाच काही “गुप्त रत्नांचा” शोध, ज्यामुळे तुमचा पुढचा प्रवास एक नवीन अनुभव ठरेल. […]
भारताच्या नकाशाकडे पाहीलं, की पूर्वेकडच्या टोकाशी डोंगररांगांमध्ये सामावलेलं एक राज्य आपल्याला दिसतं – अरुणाचल प्रदेश. नावाप्रमाणेच भारतात सर्वप्रथम सूर्य इथेच डोकावतो. सकाळच्या पहिल्या किरणांनी हिमालयाच्या कड्यावर पडलेलं सोनसळी तेज, दऱ्यांमधली धुक्याची चादर आणि शांत डोंगर वेडं वातावरण – प्रवाशाला नकळत मोहवून टाकतं. […]
मूळ महिकावती म्हणजे आजचे केळवे माहीम – जिल्हा पालघर. अनेक राजवंशांनी महिकावतीवर राज्य केले. व्यापारसमृद्ध शूर्पारक (म्हणजे नालासोपारा) आणि महिकावती संपूर्ण दक्षिण आशियात प्रसिद्ध होते. रोम राज्याशी इथला वाणिज्यसंपर्क भरपूर होता. […]
गुजरात या राज्याची पहिली पायरी चढताच जणू एक नवा जग अनुभवायला मिळतो. गजबजलेल्या उद्योग-धंद्यांसोबत इथली परंपरा, संस्कृती, रंगीत सण आणि खाद्यसंस्कृती मनाला वेगळाच ठसा उमटवतात. खाद्यसंस्कृतीचा अनुभव गुजरात मध्ये पाऊल टाकताच आपले स्वागत एका ताटाने होते – ज्यात गोड, तिखट, आंबट अशा सगळ्या चवींचा सुंदर समतोल असतो. […]
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे एक निसर्गसमृद्ध व टुमदार गाव. हे गाव प्रसिद्ध आहे ते येथील विस्तीर्ण, स्वच्छ व सुंदर समुद्रकिनाऱ्यामुळे! याच दिवेआगरची एक वेगळी ओळख निर्माण झाली ती येथील सुवर्ण गणेश मंदिरामुळे! नोव्हेंबर १९९७ मध्ये येथे सुमारे १३२० ग्रॅम वजनाचा गणेशाचा सोन्याचा मुखवटा आणि २८० ग्रॅम वजनाचे गणेशाचे दागिने जमिनीत खोदकाम करताना सापडले आणि दिवेआगर संपूर्ण राज्यात प्रसिद्धीच्या झोतात आले. […]
लेह-लडाख, ज्याला Land of High Passes म्हणून ओळखलं जातं, हा भारताच्या उत्तरेतील अप्रतिम प्रदेश आहे. आयुष्यात एकदा तरी इथे जावं, अशी इच्छा अनेकांना असते. […]
भारतातील प्रत्येक दत्तभक्ताच्या अंतःकरणात दोन तीर्थक्षेत्रे पवित्र स्थान राखून आहेत – पिठापूर आणि कुरवपूर. आंध्रप्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातील पिठापूर हे श्रीपाद श्रीवल्लभ – दत्तात्रेयांचे प्रथम अवतार यांचे जन्मस्थान आहे, तर कुरवपूर ही त्यांची तपोभूमी. कृष्णामाईच्या विशाल पात्रामध्ये वसलेले कुरवपूर मंदिर आणि पिठापूरमचे जन्मस्थान हे दैवी अनुभूतीचे केंद्र मानले जाते. […]
ही २६ भागांची मालिका भारतातील ओळखीची पण अनुभवल्याशिवाय राहून गेलेली आणि काही अनपेक्षित आश्चर्यानी भरलेली, अनुभवासाठी सज्ज असलेल्या स्थळांची गाथा आता मराठीसृष्टी च्या वाचकांसाठी येत आहे. प्रत्येक लेखात एक नवीन destination, त्याची संस्कृती, स्थानिक खाद्यसंस्कृती, व्यवहार्य प्रवासटिप्स आणि आपला अनुभव समृद्ध करणाऱ्या खास मार्गदर्शक सूचना असतील. […]
प्रभु श्री राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवले गेले. नागपूरपासून ५५ कि.मी. वर असलेले हे शहर अतिशय सुबक आहे. शहराच्या पूर्वेला एक उंच डोंगर आहे त्यावर प्रभू श्रीरामांचे सुमारे ६०० वर्षे जुने मंदिर आहे. […]
आंजर्ले हे गाव दापोली तालुक्यात (जि. रत्नागिरी) समुद्रकिनारी वसले आहे. गावाला जोडणारी वाहतूक व्यवस्था परिपूर्ण असून आंजर्ले – वेसवी – मंडणगड-मुंबई त्याचप्रमाणे आंजर्ले – दापोली व तेथून मुंबई- पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी असे रस्ते आहेत. […]