मराठी आडनावांचा अभ्यास हा अेक गहन विषय आहे. हा अभ्यास करतांना, मराठी आडनावांत असलेल्या विविधतेमुळे कित्येक वेळा विनोद, मनोरंजक किस्से, आिण गमतीजमती निर्माण होतात. अशाच काही गमतीजमती येथे संकलीत केल्या आहेत. त्या त्या आडनावांच्या व्यक्तींनी,या गमतीजमतींचा आनंद खेळीमेळीने घ्यावयाचा आहे, कारण त्या आडनावांची हेटाळणी करण्याचा मुळीच अुद्देश नाही. […]
जागतिकीकरण आणि आधुनिक पाश्चात्य तंत्रज्ञान यांच्या वाढत्या प्रभावामुळे आणि प्रसारामुळे जग जवळ येत आहे हे आपण मान्य करुच. पण, याचं मुख्य कारण भाषेचं आदान प्रदान आहे हे ही विसरात कामा नये. कारण, भाषा हे एकमेव माध्यम आज जागतिक स्तरावरील अनेक क्रांती, अनेकविध व परिवर्तनांसाठी जितकं महत्वाचं मानलं गेलं तितकीच महत्त्वता आज भाषेतून होण्याच्या संपर्कालाही प्राप्त होतेय असं तज्ज्ञांच मत आहे. […]
सुरेश भटांच्या या शब्दांना कौशल श्री इनामदारने संगीत दिलं आहे. हे गीत प्रचंड मोठ्या प्रमाणात, म्हणजे १२० प्रस्थापीत गायक, ३५० समूहगायक आणि १०० वादक यांच्या ताफ्यात ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे. […]
मराठी भाषा महाराष्ट्र व गोवा राज्याची राजभाषा असून सुमारे ९ कोटी लोकांची मातृभाषा आहे. मराठी भाषा कमीत कमी १००० वर्षापासून अस्तित्वात आहे. भारतीय संविधानाने मराठीला इतर २२ भाषांबरोबर अनुसूचित भाषेचा दर्जा दिला आहे. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारीला सर्वत्र जागतिक मराठी दिन साजरा केला जातो. […]
शिवसेना ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा प्रवास करणारा नेता राज ठाकरे आज आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जी राजकारणात गरुडझेप घेत आहे, ती अनेक राजकीय दिग्गजांना विचारात ठाकणारी आहे. शिवसेना सोडल्यानंतर हा नेता नेमके काय करणार हा अनेकांना प्रश्न पडला होता. […]