नवीन लेखन...

व्यसनमुक्ती केंद्रात होणारे नेमके उपचार.. तेथिल वातावरण, बारा गावचे पाणी प्यायलेले बेरकी व्यसनी जेव्हा एकत्र रहातात तेव्हा होणाऱ्या गमती जमती, व्यसनामुळे झालेल्या शारीरिक व मानसिक नुकसानाचे गंभीर स्वरूप, पालकांची दयनिय अवस्था, व व्यसनी व्यक्तीच्या मानसिकतेत बदल घडवत त्याला व्यसनमुक्त करण्याचे केले जाणारे पयत्न हे सारे वास्तव या सदरात मांडले आहे.. व्यसनाच्या वाटेकडे न वळण्यासाठी प्रेरणा, ज्यांनी या वाटेचा प्रवास सुरु केलाय त्यांना सावधगिरीच्या सुचना अन परावृत्त होण्याची मदत तर जे अडकले आहेत त्यांच्या सुटकेचा मार्ग दाखवणारे हे सदर.

तुषार नातू यांच्या “बेवड्याची डायरी” या पुस्तकावर आधारित…

स्वभावदोष हाकलणे.. (बेवड्याची डायरी – भाग ४५ वा)

काल समूह उपचार संपल्यावर आम्ही सगळे डिस्चार्ज होणाऱ्या व्यक्तीला स्वत:च्या पत्नीचा फोन नंबर देणाऱ्या पाटील भोवती गोळा झालो होतो ..सगळे त्याला तू मूर्ख आहेस असे म्हणत होते ..तो खजील होऊन बसला होता ..शेरकर काका अशी मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत …ते पाटील ला म्हणाले ..तुला पुढची बातमी तर सरांनी सांगितलीच नाहीय ..मला ऑफिस मधून असे समजलेय […]

कन्फेशन.. अपराधांची कबुली (बेवड्याची डायरी – भाग ४४ वा)

कन्फेशन ‘ करताना अथवा आपल्या चुकांचा कबुली जवाब देताना पाचव्या पायरीत जो आदरणीय व्यक्तीचा उल्लेख आहे त्या बाबतीत सांगताना सरांनी आजच्या समूह उपचारात… अशी आदरणीय व्यक्ती कोण असावी असे आपल्याला वाटते ? हा प्रश्न सर्वाना विचारला ..एकाने सांगितले की त्याचे आजोबा त्याच्या दृष्टीने आदरणीय आहेत ..एकाने त्याच्या एका यशस्वी मित्राचे नाव सांगितले ..मी माझ्या एका नातलगाचे […]

बदनामीची भीती ! (बेवड्याची डायरी – भाग ४३ वा)

पाचव्या पायरीचे विवेचन करत असताना सरांनी सांगितले की एका व्यसनीला उगाचच असे वाटत असते की आपल्या व्यसनाबद्दल कोणाला काहीच माहित नाहीय .. तो कुटुंबीय आणि जवळचे लोक सोडून इतर लोकांसमोर प्रयत्न पूर्वक चांगला वागण्याचा प्रयत्न करत असतो ..मी किती चांगला व्यक्ती आहे ..मी किती हसतमुख ..खेळकर प्रवृत्तीचा आहे हे इतरांना भासवण्याचा त्याचा आटापिटा चाललेला असतो ..अशा […]

स्वभावदोषांचे उच्चाटन.. नव्या व्यक्तिमत्वाला आकार (बेवड्याची डायरी – भाग ४२ वा)

” आपल्या व्यक्तीमत्वात अमुलाग्र बदल घडवून आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याखेरीज कायमची व्यसनमुक्ती तसेच ..सुखी , समाधानी , संतुलित आणि उपयुक्त जिवन व्यतीत करणे खूप कठीण आहे ” .. असे सांगत सरांनी आज समूह उपचारात पुन्हा ‘ आत्मपरीक्षण ‘ या संकल्पनेवर जोर दिला ..” हट्टी .जिद्दी …आत्मकेंद्रित ..बेपर्वा ..टोकाच्या नकारात्मक भावना ..आळशीपणा ..चालढकल करण्याची वृत्ती ..इतरांना दोष […]

बिंग फुटले… (बेवड्याची डायरी – भाग ४१ वा)

रात्री पाणी प्यायला म्हणून उठलो ..पाण्याच्या कुलरजवळ पाणी पीत असताना ..बाथरूमच्या पॅसेज मध्ये दोन तीन जण उभे दिसले ..मला पाहताच ते जरा चपापल्या सारखे झाले असे मला जाणवले ..इतक्या रात्री यांचे काय सुरु असावे याचा विचार करत होतो ..त्या तिघांपैकी दोन जण मध्यप्रदेशातून उपचारांसाठी आणलेले ब्राऊन शुगरचे व्यसनी होते ..तर तिसरा नागपूर मधलाच दारूचा व्यसनी ..तिघेही […]

चिरफाड करणारे पत्र.. (बेवड्याची डायरी – भाग ४० वा)

माँनीटरच्या म्हणण्यानुसार जे प्रामाणिक पणे आत्मपरीक्षण करतात त्यांच्या मनात ..आत्मग्लानी ..अपराधीपणा ..अशा भावना निर्माण होणे स्वाभाविक होते ..मी येथे उपचारांसाठी दाखल होताना अश्या सगळ्या प्रक्रियांना सामोरे जावे लागेल याचा विचार देखील केला नव्हता ..व्यसनमुक्तीचे उपचार म्हणजे मला काही दिवस शारीरिक त्रासासाठी गोळ्या औषधे देतील ..मग व्यसन करणे कसे वाईट आहे हे समजावून सांगतील इतकेच वाटले होते […]

अहंकाराची लुडबुड ! (बेवड्याची डायरी – भाग ३९ वा)

अलकाने माझ्यावर आता तिचा पूर्वीसारखा विश्वास राहिलेला नाहीय हे उघड बोलून दाखवल्यावर मला खूप अपमान झाल्यासारखे वाटले ..मी म्हणालो ..जर तुझ्या विश्वासच नाहीय माझ्यावर मग मला का दाखल केलेस व्यसनमुक्ती केंद्रात ..सरळ घटस्फोट घ्यायचा होता माझ्याशी …माझे असे बोलणे तिला खूप लागले असावे ..जखमी झाल्यासारखे तिने पटकन माझ्याकडे रोखून पहिले ..तिच्या नजरेत एकाच वेळी अनेक प्रकारचे […]

कर्णपिशाच्च.. (बेवड्याची डायरी – भाग ३८ वा)

आम्ही भाजी निवडत असताना माॅनीटर भाजी निवडण्यास टाळाटाळ करणाऱ्या मंडळींकडे लक्ष ठेवत होता ..काही जण नुसतेच समूहात बसून हातात एखादी गवार शेंग घेवून अथवा मेथीची काडी घेवून गप्पा मारत बसले होते …माॅनीटरचे लक्ष जाताच ते भाजी निवडतोय असे भासवत ..भाजी निवडता निवडता तोंडे सुरूच होती सगळ्यांची ..हास्यविनोद सुरु होते ..एकदोन टवाळ लोक गुपचूप वार्डातील जरा ‘ […]

सुड्घेवू गवार ..वैरी लसूण… दावेदार मेथी (बेवड्याची डायरी – भाग – ३७ वा)

” चौथ्या पायरीत ‘ आत्मपरीक्षण ‘ करताना अनेकांना वाटेल की आम्हाला फक्त दारू सोडायची आहे त्यासाठी हे आत्मपरीक्षण वगैरेची अजिबात गरज नाही ..दारू पिणे सोडले तर माझ्यात काहीच दोष नाहीत ..आपले कुटुंबीय देखील अनेकदा आपल्याला म्हणाले असतील ‘ तू फक्त दारू सोड ..बाकी सगळे चांगलेच गुण आहेत तुझ्यात ‘ परंतु मित्रानो आपले कुटुंबीय हे आपण दारू […]

उत्खनन ..मंथन ! (बेवड्याची डायरी – भाग ३६ वा)

फळ्यावर सरांनी ” आम्ही निर्भय होऊन आमच्या गतजीवनातील नैतिकतेचा शोधक आढावा घेतला ” असे वाक्य लिहिले होते ..” मित्रानो या पूर्वी अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसच्या पहिल्या तीन पायऱ्या तसेच ” फक्त आजचा दिवस ‘ या बाबत चर्चा केली आहे..ज्यात दारू तसेच अन्य मादक पदार्थांबाबत असलेली आपली मानसिक आणि शारीरिक गुलामी मान्य करत …आपले जीवन कसे अस्ताव्यस्त झालेय हे […]

1 2 3 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..