नवीन लेखन...

परिस्थितीशी जुळवून घेणे ( बेवड्याची डायरी – भाग २९ वा )

मिलिंदच्या ‘ फक्त आजचा दिवस ‘ च्या केलेल्या विडंबनाचे कौतुक करत सर म्हणाले ..एक वैशिष्ट्य सांगितले जाते व्यसनी व्यक्तीचे ते हे की व्यसनी व्यक्तीची बुद्धिमत्ता अतिशय कुशाग्र असते ..परंतु त्याला ही बुद्धिमत्ता योग्य पद्धतीने स्वतःच्या भल्यासाठी तसेच प्रगतीसाठी ..व्यसनमुक्तीसाठी ..वापरता येत नाही ..तर उलट तो ही अतिरिक्त बुद्धी नेमकी स्वता:च्या वर्तनाचे समर्थन करण्यासाठी ..स्वता:च्या चुका लपवण्यासाठी वापरत असतो.. त्यामुळेच व्यसनमुक्त रहाणे त्याला अवघड जाते ..सरांनी मग पुढची सूचना चर्चेला घेतली ..’ फक्त आज सर्व परिस्थिती माझ्या इच्छा आकांक्षानुसार बदलण्याऐवजी मी स्वतःला आहे त्या परिस्थिती नुसार बदलण्याचा प्रयत्न करेन ‘ …प्रत्येक व्यसनी हा नेहमी स्वताच्या इच्छेनुसार जीवन व्यतीत करता यावे या मनोवृत्तीचे समर्थन करणारा असतो ..तो त्या साठी खूप आग्रही देखील रहातो ..मात्र या जगात कोणाच्याही मनासारखे सतत घडत नसते …आसपासची माणसे ..परिस्थिती ..अनेकदा आपल्यासाठी अनुकूल नसतात ..त्यावेळी व्यसनी व्यक्ती पटकन निराश होतो ..वैफल्यग्रस्त होतो ..अथवा खूप संतापून संघर्ष करणे सोडून देतो …व त्याच्यावर अन्याय होतोय असे समर्थन देवून पुन्हा व्यसनाकडे वळू शकतो

..खरे तर निसर्गाशी ..कुटुंबियांशी ..नातलगांशी ..समाजाशी ..परिस्थितीशी जुळवून घेण्यातच माणसाचे भले असते ..त्रासदायक असलेल्या परिस्थितीतून योग्य मार्ग काढण्यासाठी भावनिक पातळीवर संतुलित राहून..सर्वांच्या हिताचा विचार करून प्रयत्न केले तरच आपण परिस्थिती बदलण्यासाठी स्वता:ची ताकद वाढवू शकतो ..त्यामुळे माणसाचा नेहमी जुळवून घेण्याकडे कल असला पाहिजे ..अन्यथा सतत भांडणे ..कटकटी ..भावनिक असंतुलन ..या गोष्टींचा सामना करावा लागून आपण केलेला व्यसनमुक्तीचा निश्चय वारंवार डळमळीत होऊन व्यसन सुरु होते …

पुढची सूचना होती …’ फक्त आज माझ्या चंचल मनाला मी आवर घालेन ..स्वतःला उपयुक्त एखादी गोष्ट शिकण्याचा अथवा आभ्यासण्याचा मी प्रयत्न करेन ‘ ही सूचना खरेतर प्रत्येक व्यक्तीला लागू पडते कारण चंचलता हा मनाचा स्थायीभाव आहे ..मन सारखे एका विचारतून दुसऱ्या विचाराकडे जात असते ..बहिणाबाई चौधरी यांनी ‘ मन वढाय वढाय ‘ या कवितेत मनाच्या चंचलतेचे अतिशय सुंदर वर्णन केलेले आहे ..मन नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या भोगांच्या विचारात लिप्त असते ..अशा ओढाळ मनाला जर लगाम घालता आला नाही तर माणसाची ‘ एक ना धड ..भराभर चिंध्या ‘ अशी अवस्था होणारच ..जिवनात यशस्वी व्हावे ..अधिकाधिक प्रगती करावी ..स्वताच्या आणि इतरांच्या सुखासाठी सतत प्रयत्न करावेत ..सर्वाना आनंद होईल असे वर्तन असावे ..असे सर्वांनाच वाटत असते ..मात्र सर्वाना ते करता येत नाही याचे कारण मनाची चंचलता हे आहे ..

आपण जरी व्यसनमुक्तीचे ..चांगल्या जीवनाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून येथे उपचार घेत असलो तरीही अनेकदा ..मनाच्या चंचलतेमुळे आपण आपल्या ध्येयापासून विचलित होऊ शकतो ..मग कंटाळा येणे ..निराशा येणे ..कुटुंबियांची ..मित्रांची ..खूप आठवण होऊन येथून लवकरात लवकर बाहेर पडणे ..वगैरे प्रकारच्या विचारांनी मन अवस्थ होते ..तसे होऊ नये म्हणून मनाच्या चंचलतेला आवर घालणे अपरिहार्य आहे ..आपले व्यसनमुक्तीचे ..प्रगतीचे ..ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला मनाला कठोरपणे लगाम घालता आला पाहिजे ..चंचल मनाला ताळ्यावर आणण्यासाठी अथवा मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी आपण सर्व येथे योगाभ्यास व प्राणायाम करतोच आहोत ..मात्र हे आभ्यास प्रामाणिक पणे केले तरच ..शिवाय येथून बाहेर पडल्यावर देखील हे सुरु ठेवले तरच आपल्या मन ताब्यात ठेवणे शक्य होईल …प्राणायाम करताना ‘ अनुलोम विलोम . अथवा ‘ दीर्घ श्वसन ‘ या प्रकारावर भर दिला तर नक्कीच हे साध्य होईल …सर्वांनी घरी देखील हे केले पाहिजे ..काळ कोणासाठी कधीच थांबत नाही ..आपण आधीच आयुष्याची अनेक अनमोल वर्षे व्यसनाधीनतेत वाया घालवली आहेत ..तेव्हा आता वेळेचा सदुपयोग करायला शिकले पाहिजे ..प्रत्येक क्षण मोलाचा आहे हे लक्षात घेवून ..आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी ..आरोग्यासाठी ..ज्ञान संवर्धनासाठी ..आपण वेळ दिला पाहिजे ..स्वतःला उपयुक्त अशा गोष्टी शिकण्याचा …अभ्यासण्याचा प्रयत्न असला पाहिजे आपला ..उगाचच टिवल्याबावल्या ..टाईमपास ..फालतू बडबड ..नसते विचार करत बसण्यापेक्षा ..वेळेचा सदुपयोग केला पाहिजे …

सर हे सर्व बोलत असतांना एकाने प्रश्न विचारण्यासाठी हात वर केला ..सरांनी त्याला अनुमती दिली ..तो उठून उभा राहत म्हणाला ‘ सर ..मला घरची खूप आठवण येतेय ..मला घरी कधी सोडणार ? ‘ त्याच्या या प्रश्नाने सर्व हसू लागले ..हा फालतू प्रश्न आहे असे म्हणत त्याच्या आसपासचे लोक त्याला खाली बसवू लागले ..सरांनी सर्वाना शांत केले ..मग म्हणाले ..बघा हा मनाच्या चंचलतेचा उत्तम नमुना ..आपण आता इथे काय शिकतो आहोत याकडे याचे लक्षच नव्हते ..हा सतत इथून बाहेर कसे आणि केव्हा पडता येईल याच विचारात होता इतका वेळ ..असेच असते मनाचे ..ते आपले शरीर जेथे आहे तेथे न राहता शरीराच्या बाहेर पडून सर्व ठिकाणी जावू पहाते ..प्रत्येकाने ‘ आज ..आत्ता ..इथे ‘ हा विचार केला तर हे टाळता येते ..आपण आत्ता ..इथे व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनमुक्तीचे उपचार घेत आहोत हे ध्यान्यात ठेवले पाहिजे ..आपले उपचार पूर्ण होताच इथून बाहेर जाता येईल हे नक्की ..त्यासाठी आपले कुटुंबीय आणि समुपदेशक निर्णय घेत असतात ..तेव्हा त्याबाबत आपण विचार करणे व्यर्थ आहे ..त्याएवजी आपण इथे का आहोत ? का यावे लागले ? याचा विचार केला तर इथले वास्तव्य नक्कीच आपल्याला उपयुक्त ठरेल ..बाहेर असताना देखील आपण असेच चंचल होतो ..घरी असताना ..मित्रांचा विचार ..व्यसनाचा विचार ..ऑफिसचा विचार ..तर ऑफिसला गेल्यावर ..घरचा ..नातलगांचा विचार ..भविष्य काळातील समस्यांचा विचार ..किवा भूतकाळातील विचार ..हे सगळे सोडून ‘ आत्ता ..इथे ‘ हा विचार समोर ठेवला तरच चंचलता आटोक्यात ठेवता येईल ..

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

( माझ्या ‘ बेवड्याची डायरी ” या लेखमालेत मी आमच्या ‘ मैत्री व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद ‘ नागपूर ..येथे कसे वातावरण असते ..काय काय घडते …कशा गमती जमती तसेच गंभीर घटना घडतात ..याबाबत लिहिले आहे. यातील विजय हे व्यसनी पात्र काल्पनिक आहे ..हा विजय आमच्या केंद्रात उपचारांना दाखल झाल्यावर काय काय होते ते त्याने इथे डायरीद्वारे सांगितलेय ..यातील माॅनीटर म्हणजे आमचा निवासी कार्यकर्ता आहे ..तर ‘ सर ‘ असा जो उल्लेख आहे तो …तुषार नातू व रवी पाध्ये या प्रमुख समुपदेशकांसाठी आहे याची दखल घ्यावी .)

” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..