नवीन लेखन...

फक्त आजचा दिवस ! ( बेवड्याची डायरी – भाग २८ वा )

आजच्या समूह उपचारात सरांनी आधी चर्चा झालेल्या अल्कोहोलिक्स अॅनाँनिमसच्या पहिल्या तीन पायऱ्यांचा एकत्रित आढावा घेत आम्हाला सर्वाना ‘ फक्त आजचा दिवस ‘ हे तत्व समजावून सांगितले ..पहिली पायरी हतबलता , मान्यता , अस्ताव्यास्तता दर्शवून देते ..तर दुसऱ्या पायरीने विश्वास ..श्रद्धा मिळवता येते , तिस-या पायरीत नवीन जीवनाचा मजबूत पाया तयार करण्यासाठी स्वेछेचा त्याग व आपल्याला समजलेल्या ईश्वराच्या कलाने जीवन व्यतीत करण्याबद्दल मागर्दर्शन दिलेले आहे हे सांगत ..सरांनी सर्व प्रथम.. इथे दाखल झाल्यावर आपण व्यसनांच्या आहारी गेलेलो आहोत हे स्वतःशी कबूल करणे आवश्यक आहे व त्यासाठी व्यसनामुळे आपले जीवन कसे अस्ताव्यस्त झालेय हे तपासण्यास आपल्याला प्रेरित केले गेलेय असे सांगितले ..आपली बुद्धी , आर्थिक व मानसिक शक्ती , तसेच शैक्षणिक आणि इतर क्षमता स्वतःच्या बळावर व्यसन कायमचे बंद ठेवण्यास कशा असमर्थ ठरल्या हे प्रत्येकाने नक्कीच तपासले पाहिजे ..तरच आपल्याला व्यसनमुक्ती साठी कोणाची तरी मदत घेणे गरजेचे आहे हे समजेल .. ही पहिली पायरी ..नंतर ही मदत घेण्यासाठी ईश्वरी शक्ती ओळखणे ज्यात विशिष्ट धर्माचा ..जातीचा ..पंथाचा देवा खेरीज निसर्ग ..आपले नातलग ..स्नेही ..हितचिंतक …एखादी अध्यात्मिक विचारधारा …एखादे तत्व इतकेच नव्हे तर अल्कोहोलिक्स अँनाॅनिमसचे तत्वज्ञान .. सगळे आपल्यासाठी कसे उच्चशक्ती किवां ईश्वर आहे हे समजून घेणे व त्यावर विश्वास ठेवणे आले ..जे जे आपल्याला व्यसनापासून परावृत्त करण्यास मदत करते ते सगळे या ईश्वराच्या व्याख्येत समाविष्ट होऊ शकते ..हे समजून घेवून त्यावरील विश्वास बळकट करणे ही झाली दुसरी पायरी ..

यापुढे व्यसनमुक्त रहात नवीन जीवनाची बांधणी …जडण घडण ..किवा नव्या आणि सर्वांसाठी उपयुक्त अशा पद्धतीने जीवन व्यक्तीत करण्यासाठी आपल्याला समजलेल्या ईश्वरी तत्वानुसार जीवन व्यातित करण्याची मानसिक तयारी हे तिसऱ्या पायरीचे सार आहे असे सर म्हणाले ..स्वताच्या इच्छेने जीवन व्यतीत करण्याच्या आपल्या अट्टाहासामुळेच आपले प्रचंड नुकसान झालेय हे लक्षात घेतले तरच तिसरी पायरी आचरणात आणण्याची मानसिक तयारी होते असे सांगत सरांनी तिसऱ्या पायरीचे यशस्वीपणे आचरण करण्यासाठी ‘ फक्त आजचा दिवस ‘ हे तत्वज्ञान खूप मदत करू शकते हे सांगितले. केवळ व्यसनी व्यक्तीसाठीच नाही तर ..अस्वस्थ ..अशांत ..असमाधानी ..असुंतूलीत..अयशस्वी अशा सर्व लोकांसाठी.. हे ‘ फक्त आजचा दिवस ‘ लागू पडते .ज्यात फक्त आजचा दिवस काहीही झाले ..कितीही संकटे आली ..कितीही निराशा… वैफल्य आले ..कितीही आनंदाचा यशाचा क्षण आला तरीही मी व्यसन करणार नाही हा निश्चय आहेच ..या खेरीज माझ्या सुखी ..समाधानी ..संतुलित आणि यशस्वी जीवनासाठी काय काय करणे भाग आहे हे स्पष्ट केले …एक एक दिवसाच्या हिशेबाने आयुष्य अधिक सोपे ..सहज ..सुंदर कसे घडते हेच यात दिले आहे .

‘ फक्त आजचा दिवस ‘

१) फक्त आजचा दिवस आयुष्यभराचे सर्व प्रश्न ..चिंता ..समस्या एकदम सोडवण्याऐवजी ..फक्त आलेला आजचा दिवस मी व्यवस्थित पणे जगण्याचा प्रयत्न करेन .

२ ) फक्त आज मी इतरांचे ऐकेन..जास्तीत जास्त नीटनेटके दिसण्याचा ..किंचितही टीका न करण्याचा आणि स्वतःखेरीज अन्य कुणालाही न सुधारण्याचा मी प्रयत्न करेन .

३ ) फक्त आजचा दिवस मी कुणालाही समजणार नाही अशा पद्धतीने कुणाचे तरी भले करेन ..

ही तीन वाक्ये सरांनी फळ्यावर लिहिली आणि एकेका वाक्याचे विश्लेषण करण्यास सुरवात केली ..प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनेक प्रश्न ..समस्या..चिंता असतात..आणि त्या समस्या सोडविल्या जाव्यात असे प्रत्येकाला मनापासून वाटत असते ..या चिंता आणि समस्याच आपल्या अस्वस्थतेस कारणीभूत असतात .. या समस्या चुटकीसरशी सुटाव्यात ..यांचे उत्तर आपल्याला ताबडतोब मिळावे ..किवा या चिंता कधी कमी होतील या बाबतचा सर्वांगीण विचार करण्यात आपण बराच वेळ वाया घालवत असतो ..खरे तर प्रत्येकाला आपण नक्की किती दिवस जगणार आहोत हे देखील माहित नसते ..भविष्याच्या पोटात नेमके काय दडलेले आहे हे कोणीच सांगू शकत नाही ..अशा वेळी संपूर्ण जिवनभराच्या चिंता .समस्या यांचा आपण विचार करत बसतो ..त्या लवकरात लवकर सुटाव्यात यासाठी जीवाचा आटापिटा करत असतो ..सतत चिंताग्रस्त असतो ..काळजी करत बसतो ..प्रश्न सुटावेत म्हणून बैचैन रहातो.. हे अविवेकी आहे ..क्षणभंगुर किवा अशाश्वत जीवनाची अनिश्चितता ध्यानात घेतली तर हे व्यर्थ असते ..त्या ऐवजी जर ‘ फक्त आजचा दिवस ‘ या प्रश्न चिंता सोडवण्यासाठी मी व्यवस्थित पद्धतीने व्यतीत केला तर नक्कीच मी समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करू शकेन

..आता व्यवस्थित म्हणजे काय हा प्रश्न उरतो ..तर व्यवस्थित म्हणजे …सर्वात आधी आज मी या अनमोल शरीराची योग्य स्वच्छता ठेवेन ..शरीर बळकटी करता आवश्यक व्यायाम करेन ज्यात योगाभ्यास , प्राणायाम येते …नंतर माझ्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक असलेली नोकरी अथवा काम नीट जवाबदारीने करेन ..माझ्या सभोवालच्या लोकांशी चांगले संबंध ठेवेन ..माझ्या कुटुंबियांच्या भावनांची योग्य काळजी घेईन ..भविष्याची तरदूत म्हणून योग्य ती काटकसर ..बचत करेन ..माझी मनस्थिती आनंदी राहण्यासाठी मनोरंजन ..कला ..माझे छंद यांच्यासाठी योग्य वेळ देईन ..एकंदरीत जवाबदारीने वागेन हे सगळे व्यवस्थितपणाच्या व्याख्येत येते .

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

( माझ्या ‘ बेवड्याची डायरी ” या लेखमालेत मी आमच्या ‘ मैत्री व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद ‘ नागपूर ..येथे कसे वातावरण असते ..काय काय घडते …कशा गमती जमती तसेच गंभीर घटना घडतात ..याबाबत लिहिले आहे. यातील विजय हे व्यसनी पात्र काल्पनिक आहे ..हा विजय आमच्या केंद्रात उपचारांना दाखल झाल्यावर काय काय होते ते त्याने इथे डायरीद्वारे सांगितलेय ..यातील माॅनीटर म्हणजे आमचा निवासी कार्यकर्ता आहे ..तर ‘ सर ‘ असा जो उल्लेख आहे तो …तुषार नातू व रवी पाध्ये या प्रमुख समुपदेशकांसाठी आहे याची दखल घ्यावी .)

” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..