नवीन लेखन...

बेवड्याची डायरी – भाग ९ – भ्रम ..आभास …सत्य !

‘ प्रतिबिंब ‘ मधील विचार सरांनी अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितला होता व मला तो पटलाही .. माझ्या मागील अनुभवांवरून हे सिद्ध होत होते की मी मनाशी अनेकदा या पुढे प्यायचे नाही असे ठरवले होते तरी काही दिवसांनी माझे पिणे परत सुरु झाले होते .. माझ्या पिण्याबद्दल माझे आई , बाबा , मोठी भावंडे ..आणि अलका देखील चिंतीत होती .. पूर्वी अगदी मी क्वचित घेई तेव्हा त्यांना कधी माझ्या बाबत काळजी बाटली नव्हती पण ..आताशा माझ्या पिण्याचा विषय नेहमी निघत असे .. मी सहज मनाशी आतापर्यंत दारूत किती पैसे गेले असतील असं विचार केला तेव्हा ती रक्कम किमान २ लाख रुपये इतकी होत होती .. म्हणजे गेल्या १० वर्षात मी दोन लाख रुपयांची दारू प्यायलो होतो तर ..आणि तुलनेत या दहा वर्षात माझा कपड्यांवर ..स्वतच्या जेवणावर ..सिनेमा हॉटेलिंग वगैरे खर्च कमीच झाला होता ..

मी सगळ्या गोष्टींचा विचार करत असतानाच ..” मेलो ..मेलो ..पकडा ..धरा त्याला ” अशी मोठी आरोळी ऐकू आली आणि ऐक जण जो मघाच पासून वार्ड मध्ये कोपऱ्यात बसून होता तो ओरडत धावू लागला ..काय भानगड आहे मला समजेना ..ताबडतोब चार कार्यकर्त्यांनी त्याला पकडले आणि धरून ठेवली ..तो घामाघूम झाला होता ..सर्व शरीर थरथरत होते ..चेहरा काहीतरी भयंकर पहिल्या सारखा झाला होता ..त्याच्या डोळ्यात कोणतीही ओळख दिसत नाव्ह्ती.. दोन जणांनी ऐक नवार ची मोठी पट्टी आणली तिचे चार तुकडे केले आणि त्या व्यक्तीला धरून काळजीपूर्वक पलंगाला बांधून टाकले ..सर्व जण त्याच्या भोवती जमले होते ..माझ्या सारखे नवखे तर घाबरलेलेच होते .. काल रात्री हा माणूस सगळ्यांशी चांगला बोलत होता ..आणि अचानक आज याला काय झाले हा प्रश्न सगळ्यांना पडला होता ..तो माणूस बांधल्यामुळे जरा शांत झाला होता तरी पण बांधलेले हात पाय सोडवण्यासाठी त्याची चुळबुळ चालली होती ..तसेच तोंडाने देखील तो काहीतरी अस्पष्ट बोलत होता ..

मला अगदीच राहवले नाही म्हणून मी मॉनीटरला त्या माणसाबद्दल विचारले .आणि त्यांनी दिलेली माहिती जरा आश्चर्यजनकच होती माझ्यासाठी ..हा प्रकार म्हणजे दारू मुळे मेंदूवर झालेला तात्पुरता परिणाम होता म्हणे .. मेंदूला अनेक दिवस दारूची सवय झाल्याने ..अशी व्यक्ती जेव्हा व्यसनमुक्ती केंद्रात भरती होते ..किवा काही कारणाने दारू पिणे बंद होते तेव्हा काही जणांना असा त्रास होतो .. या प्रकारात दारू पिण्याचे खूप प्रमाण असेल असे काही नसते तर ..सदर व्यक्तीचा मेंदू दारू करिता किती संवेदनाक्षम असतो यावर हे अवलंबून असते .. म्हणजे जर मेंदूला विशिष्ट प्रमाणात दारूचा पुरवठा झाला नाही तर मेंदू एकप्रकारे असहकार पुकारतो ..आपल्या ज्ञानेंद्रिया मार्फत मेंदू कडे ज्या सूचना पाठवल्या जातात त्या संगणकाच्या भाषेत सांगायचे झाले तर करप्ट होतात …म्हणजे मेंदू कडे चुकीचे संदेश आणि संवेदना पाठविल्या जातात आणि मेंदू देखील या चुकीच्या संवेदना स्वीकारून त्यांचे विश्लेषण करून मज्जासंस्थेला पुढील कार्यवाही चे संदेश पाठवत असतो ..मुळात संदेश चुकीचा असल्याने …मेंदू कडून आलेला कार्यवाहीचा संदेश देखील चुकीच्या पद्धतीने कार्यवाहीत येतो ..शास्त्रीय परिभाषेत याला ‘ ‘ हँलुस्नेशन ‘ किवा ‘ डेलीरीयम ‘ असे ही म्हणतात ..अश्या व्यक्तीला ही अवस्था असे पर्यंत त्याच्या जिवाच्या सुरक्षेसाठी आणि इतरांच्याही सुरक्षेसाठी बांधून ठेवणे आणि औषधोपचार करणे गरजेचे असते ,,जर बांधले नाही तर अशी व्यक्ती या अवस्थेत रस्त्यावर धावून गाडीखाली येऊ शकते ..कोठून उंचावरून पडू शकते ..उडी मारू शकते ..कोणाला काही इजा करू करू शकते .. ही व्यक्ती झोपू शकत नाही किवा जेवण ..लघवी ..संडास या नैसर्गिक क्रिया देखील त्याला समजत नाहीत …काही प्रकरणांमध्ये तर ही अवस्था जास्त दिवस टिकते ..त्याला कारण मेंदुतील विशिष्ट रसायनांची कमतरता असते ..मग त्या साठी तपासण्या करून औषध योजना करावी लागते ..एक शांत झोप झाल्यावर हे लोक भानावर येतात …तोवर त्यांची काळजी घ्यावी लागते ..अगदी जीवघेणा प्रकार नसला हा तरी भयंकर नक्कीच असतो ..

डोळे ..नाक . कान ..जिव्हा ..त्वचा ही माणसाची ज्ञानेंद्रिये आसपास घडणाऱ्या घटनांचे आकलन करण्यासाठी मदत करून ..ते आकलन मेंदू कडे पोचवत असतात व नंतर त्याचे विश्लेषण करून मेंदू पुढील कार्यवाही चे आदेश देत असतो ..या आकलनातच गडबड होणे म्हणजे भयंकरच होते .अश्या अवस्थेत कधी कधी वेगवेगळ्या प्रकारचे वास येणे ..कोणीतरी हाक मारते आहे असा भास होणे किवा कानात कोणीतरी शिव्या देतेय असे आवाज ऐकू येणे ..समोर नसलेली दृश्ये डोळ्यासमोर साकार होणे..कोणीतरी आपल्याला मारायला आलेय असे दिसणे .. अंगावर अळ्या ..किडे फिरत आहेत असे वाटणे ..एकदम खूप थंडी वाजल्यासारखे होणे किवा एकदम उकडत असल्याचे वाटणे .. स्थळ काळाचे भान जाणे …मॉनीटर ने पुढे सांगितले की विजय भाऊ अहो ..यात अनेकांना वाटते की हे बहुतेक जास्त वर्षे आणि जास्त प्रमाणात दारू प्यायल्यामुळे होत असेल ..किवा देशी ..हलक्या दर्जाची दारू प्यायल्या मुळे होत असेल ..तर तसे अजिबात नाहीय ..कोणती ..किती दारू पितो माणूस हे यात महत्वाचे नसून त्याचा मेंदू दारू करिता किती संवेदनशील आहे ही गोष्ट महत्वाची आहे ..जशी लिव्हरची टेस्ट करून दारूमुळे नेमके किती नुकसान झालेय ते तपासण्याची सोय आहे त्याप्रमाणे मानवी मेंदूची नेमकी किती क्षमता कमी होतेय दारूमुळे ..झालीय हे समजण्याचे तंत्रज्ञान अजूनतरी नीट विकसित झालेले नाही ..आणि या पूर्वी आपल्याला असे कधी झाले नाही म्हणून पुढे कधी होणार नाही असे समजणे देखील चुकीचे आहे कारण कोणाचा मेंदू केव्हा दगा देईल हे सांगता येत नाही …

या प्रकारच्या भासांचे उदाहरण ‘ वास्तव ‘ या सिनेमात दिले असल्याचे त्याने मला सांगितले ..चित्रपटाच्या शेवटी संजय दत्त च्या मागे जेव्हा पोलीस लागतात आणि तो त्याच्या घरात लपलेला असतो ..तेव्हा त्याला असलेले दारूचे व कोकेनचे व्यसन न मिळाल्याने .तो असाच खिडकी कडे बघून ओरडतो … सर्वाना लपा म्हणतो .. प्रचंड घाबरलेला असतो तो .. मला तो सिनेमातला प्रसंग आठवला आणि मॉनीटर जे सांगतो आहे त्यावर माझा विश्वास बसला .. ही अवस्था किमान चार पाच दिवस तरी टिकते ..काही जणांना दारू बंद केल्यावर दुसऱ्याच दिवशी असे भास होतात तर काही जणांना दारू बंद केल्यावर काही दिवसांनी असे होते ..प्रत्येकालाच हे होईलच असेही नाही..तरी देखील कोणाला होईल आणि कोणाला होणार नाही असेही काही नक्की नसते … काही लोकांच्या मेंदूतील सोडियम ..पोटँशियम या घटकांचे प्रमाण जर बिघडलेले असेल तर जास्त दिवस ही अवस्था टिकू शकते .. अश्या प्रकारचे भास होणे म्हणजे दारू सरळ मेंदूवर परिणाम करत असल्याचे हे प्रतिक आहे ..आणि इतके होऊनही जर दारू पिणे पुन्हा सुरु राहिले तर असा माणूस ठार वेडा होऊ शकतो ..मला असे पूर्वी कधी झाले नव्हते मात्र आठवले की मागच्या वेळी जेव्हा मी घरीच दारू बंद केली होती तेव्हा रात्री मला नीट झोप लागली नव्हती आणि ..ऐक दोन वेळा मला घरातील टेलिफोन ची घंटी वाजल्याचा भास झाला होता ..तर एकदा कोणीतरी दार वाजवते आहे असे वाटले होते ..बाहेर नाक्यावर सिगरेट आणायला जाताना देखील मागून गाडीचा होर्न वाजतो आहे असे वाटून मी बाजूला सरकलो होतो ..बापरे म्हणजे हे असेच भासाचे प्रकार होते तर .. मनातून मी जरा घाबरलोच..या पुढे परत दारू प्यायची नाही हे मनाशी पक्के ठरवत होतो …

— तुषार पांडुरंग नातू

( बाकी पुढील भागात )

” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५

( माझ्या ‘ बेवड्याची डायरी ” या लेखमालेत मी आमच्या ‘ मैत्री व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद ‘ नागपूर ..येथे कसे वातावरण असते ..काय काय घडते …कशा गमती जमती तसेच गंभीर घटना घडतात ..याबाबत लिहिले आहे. यातील विजय हे व्यसनी पात्र काल्पनिक आहे ..हा विजय आमच्या केंद्रात उपचारांना दाखल झाल्यावर काय काय होते ते त्याने इथे डायरीद्वारे सांगितलेय ..यातील माॅनीटर म्हणजे आमचा निवासी कार्यकर्ता आहे ..तर ‘ सर ‘ असा जो उल्लेख आहे तो …तुषार नातू व रवी पाध्ये या प्रमुख समुपदेशकांसाठी आहे याची दखल घ्यावी .)

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..