नवीन लेखन...

सुंदरतेचा आस्वाद ! (बेवड्याची डायरी – भाग ३३ वा)

इथे आल्यापासून एक चांगली सवय लागलीय मला ..लवकर उठण्याची ..सकाळी साडेपाचला बेल वाजण्यापूर्वीच मला जाग येवू लागली आहे ..विशेष म्हणजे उठल्यावर एकदम फ्रेश वाटते ..याचे कारण रात्री वेळेवर झोप हे असावे बहुतेक ..तसेच इथे मी सगळ्या कौटुंबिक व इतर प्रकारच्या चिंतांपासून दूर असल्याने मनस्थिती देखील चांगली राहतेय ..घरी असताना रात्री कितीही दारू प्यायलो असलो तरी लवकर झोप लागत नसे ..लागली तरी ती झोप नव्हती तर दारूच्या नशेत शरीर मन शिथिल होणे असे ..त्यामुळे सकाळी उठल्यावर प्रचंड थकवा जाणवे..मन देखील विषण्ण असे ..डोळ्यांची चुरचुर ..अंगदुखी ..पित्तप्रकोप अशी सगळी लक्षणे जाणवत ..अंथरुणातून उठूच नये असे वाटे ..अलकाने खूप तगादा लावल्यावर मी नाईलाजाने उठत असे ..आता ही लवकर उठण्याची सवय अशीच ठेवायची असे मी ठरवले होते मनाशी ..मी लवकर उठतो म्हणून माॅनिटरने मला बेल वाजल्यावर इतरांना उठवण्याची देखील जवाबदारी दिली होती …हे दुसर्यांना उठवण्याचे काम गमतीशीर होते ..विशेषतः काही आळशी लोक उठायला खूप कंटाळा करत असत ..कितीही हाक मारला तरी नुसते ..हु..हम्म ..पाच मिनिट ..अशी सवलत मागत असत ..

काही जण वैतागून ..मला म्हणत …यार तू रातको सोता है या नही ? ..एकाने तर मला चक्क शाप दिला होता ..तू चैन से सोनेवालो कि निंद हराम करता है ..तूझे कभी चैन नही मिलेगा ..एकदोन महाभाग असे असत की अजिबात त्यांच्यावर कसलाही परिणाम होत नसे ..शेवटी त्यांच्या तोंडवर थेंबभर पाणी शिंपडले की मग डोळे उघडत ते ..मला हे उठवण्याचे काम करतोय म्हणून काहींनी मला गमतीने ‘ मुर्गा ‘ म्हणजे ‘ कोंबडा ‘ म्हणण्यास सुरवात केली होती ..अर्थात मी हे काम उत्साहाने आणि हसतमुखाने न चिडता करत होतो ..सरांनी काल दिलेल्या प्रश्नानुसार मी येथे राहताना थेरेपीजच्या वेळा सोडून एक दिनक्रम लिहिला होता ..त्यात सकाळी पीटी झाल्यावर सूर्यनमस्कार ..दुपारी वाचन ..सायंकाळी मोकळ्या वेळात ..थोडा वेळ हास्यविनोदात सामील होणे ..थोडा वेळ कॅरम खेळणे ..टी.व्ही पाहणे ..आणि रात्री झोपण्यापूर्वी येथे जे जे शिकतो आहे त्याबाबत डायरीत नोंदी ठेवणे सगळे लिहिले होते .

आज समूह उपचारांच्या वेळी सरांनी ‘ फक्त आजचा दिवस मधील शेवटची तीन वाक्ये फळ्यावर लिहिली .

१० ) फक्त आज मी स्वतःसाठी अर्धा तास देईन ..या अर्ध्या तासात मी माझ्या आयुष्याचा चांगला अर्थ घेण्याचा प्रयत्न करेन .

११ ) जे चांगले आहे ..सुंदर आहे त्याचा आस्वाद घेण्यास मी घाबरणार नाही

१२ ) मी ज्या प्रमाणे जगाला देईन ..त्या प्रमाणे जग मला देईल ..यावर मी विश्वास ठेवेन .

रोजच्या रोज स्वताच्या जिवनाबद्दलच्या चिंतना साठी दहावी सूचना आहे असे सांगत सर म्हणाले ..दिवसभरात केव्हाही मोकळा वेळ असेल तेव्हा आपण किमान अर्धा तास तरी चिंतन केले पाहजे ..म्हणजे आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा घेणे ..माझे दिवसभराचे वर्तन तपासणे ..मी कोणाशी कसा वागलो ..काय बोललो याचे परीक्षण करणे होय ..तसा प्रत्येक माणूस नकळत असे चिंतन करतच असतो ..मात्र बहुधा असे चिंतन करताना तो दिवसभरात स्वताच्या मनाविरुद्ध घडलेल्या घटना आठवतो ..अपमान जनक प्रसंगांची उजळणी करतो ..इतरांनी त्याच्याशी केलेल्या वाईट वर्तनाचा विचार करून स्वताचे काय चुकले आहे हे न समजून घेता …इतरांच्या चुका शोधून ..एकतर रागाची ..बदल्याची ..किवा निराशेची भावना मनात जोपासतो ..त्या ऐवजी माझ्या आयुष्याचा चांगला अर्थ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे ..दिवसभरात घडलेल्या घटनांमधून मी काही सकारात्मक शिकतोय का ? मला भेटलेल्या व्यक्तींच्या वागणुकीतून मी काही धडा घेतोय का ?तसेच मी केलेल्या चुका उद्या कशा टाळता येतील ..आसपासच्या सर्वांशी आपुलकीचे संबंध कसे जोपासता येतील ..याचा विचार करणे म्हणजे सकारात्मक चिंतन होईल ..

‘ जे चांगले आहे ..सुंदर आहे त्याचा आस्वाद घेण्यास मी घाबरणार नाही ‘ हे वाक्य वाचल्यावर बहुतेक लोकांच्या मनात सुंदरता म्हणजे ‘ स्त्री ‘ चे सौंदर्य येवू शकते ..या सूचनेत सुंदरता या संकल्पनेत अनेक गोष्टी येतात ..तसेच या वाक्याचा असा ही अर्थ निघतो की ‘ जे वाईट आहे ..गलिच्छ आहे त्याचा आस्वाद घेण्यास मी घाबरेन ‘ म्हणजेच ज्या ज्या गोष्टीना समाजाने ..नैतिकतेने ..अथवा आपल्या संस्काराने वाईट म्हंटले आहे त्या सर्व गोष्टींपासून मी दूर राहीन .. समाज ज्याला चांगले म्हणतो ..सुंदर म्हणतो त्याचा आस्वाद घेईन ..यात विविध कलांचा आस्वाद ..निसर्गसौंदर्य ..भूतदया ..चांगल्या प्रकारच्या खाण्याच्या विविध गोष्टी ..संगीत ..वाचन ..समाजसेवा ..वगैरे गोष्टी येतात ..आपण व्यसन करत असताना नेमके ‘ जे वाईट आहे ..गलिच्छ आहे ‘ अश्या गोष्टी करत गेलो ..त्या ऐवजी आता चांगल्या आणि सुंदर गोष्टीत रस घेणे अपेक्षित आहे …

शेवटचे वाक्य होते ‘ मी ज्या प्रमाणे जगाला देईन ..त्या प्रमाणे जग मला देईल यावर मी विश्वास ठेवेन ‘ म्हणजे क्रिया -प्रतिक्रियेच्या सिद्धांतावर माझा विश्वास असला पाहिजे ..मी जर जगाला प्रेम ..आपुलकी ..माया ..दया ..करुणा …देत गेलो तर नक्कीच या गोष्टी मलाही मिळतील ..मात्र मी जर द्वेष ..तिरस्कार ..राग ..वंचना ..फसवणूक ..निर्भत्सना ..कटुता देत गेलो तर मलाही कधीतरी असेच मिळेल जगाकडून हे आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे ..आपल्या चांगल्या कर्मांनीच आपले भविष्य घडत जाते ..हे लक्षात ठेवून आपली भावना आणि कर्मे याप्रती जागरूक राहणे महत्वाचे आहे …

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..