नवीन लेखन...

कल्हईवाला – जुनी आठवण

स्टीलच्या, हिंडालियमच्या भांड्यांची चलती असली तरी या जमान्यात पितळी भांडीसुद्धा वापरली जातात. साहजिकच कल्हई करणे आले. दारी येणारा कल्हईवाला तात्काळ सेवा देणारा असतो. […]

पाकिस्तान : माझी साहसयात्रा

मी पहिला मराठी पत्रकार असेन की ज्याने एका मराठी वृत्तपत्रासाठी बेनझीर भुट्टो यांची मुलाखत घेतली. त्यांच्या बंगल्यात जाऊन त्यांच्यासमोर एका भारतीयाने बसणे हेच ज्या काळात दुर्मिळ दृश्य होते, ते मला घडवता आले. अर्थात त्याचे सर्व श्रेय माझे कराचीचे मित्र रकिब पुनावाला यांना मी देतो. ते नेहमी पुण्यात यायचे तेव्हा मला भेटायचे. ते माझे मित्र बनले होते. कराचीत गेल्यावर त्यांना मी फोन केला, तेव्हा ते तातडीने मी ज्या ‘वायएमसीए’च्या अतिथीगृहात उतरलो होतो तिथे आले. त्यांनी मला कराचीचे संपूर्ण दर्शन घडवले. […]

स्मरणगाथा : २

— सकाळचे साडेसहा वाजले होते . नुकताच मी मॉर्निंग वॉकला जाऊन आलो होतो . आणि भल्या सकाळी दारावरची घंटा वाजली . दार उघडलं तर समोर आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातील ओळखीचा शिपाई उभा होता . त्याच्या हातात एक कागद आणि गुलाबाचं फूल होतं . “गोविंद मोकाशी साहेबांनी तुम्हाला द्यायला सांगितलं आहे . ” त्यानं सांगितलं . मी त्याला […]

दिवाळी अंक साकारताना… भाग पहिला

मराठी वाचनानंदात मग्न असलेल्याला दिवाळी अंक नाहीत नाही, असं होऊच शकत नाही. ही चटक काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी १९०९मधे लावली आणि दिवाळी अंकाचे हे लोण इतकं पसरत गेलं आहे की, त्याची व्याप्ती आकाराच्या बाबतीत मोजायची झाली तर ती रामायण-महाभारतालादेखील मागे सारील! […]

मराठीतील कोशवाङ्मय

मराठीमध्ये कोशवाङ्मयाची समृद्ध परंपरा आहे. मराठी भाषेत कोशरचना सुरू होऊन आता सुमारे १५० वर्षे लोटली आहेत. मराठीत १९व्या शतकात जी कोशरचना झाली ती सामान्यतः शब्दकोश-स्वरूपाची झाली. संस्कृतीच्या विकसनशील काळात आधी शब्दकोश निर्माण होतात; त्यानंतर ज्ञानकोशांची रचना होऊ लागते. अव्वल इंग्रजी काळात शब्दकोश रचनेमागच्या प्रमुख प्रेरणा इंग्रजी राज्यकर्त्यांची मराठी भाषा शिकण्याची गरज आणि ख्रिस्ती धर्मप्रचारकांची धर्मप्रसाराची गरज या होत्या. […]

माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव

राव यांच्या सरकारला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज मिळविण्यासाठी रुपयाचे अवमूल्यन तसेच खतांवरील सरकारी अनुदान कमी करणे असे काही निर्णय घ्यावे लागले. राव यांनी दहशतग्रस्त पंजाब राज्यातील निवडणुका घेतल्या. त्यानंतर पंजाबमध्ये शांतता निर्माण झाली. […]

भारतीय स्त्री वैज्ञानिक मेधा खोले

मेधा १ डिसेंबर २०११ पासून हवामानशास्त्र (हवामान अंदाज) विभागाच्या उपमहासंचालक आहेत. हवामानशास्त्र क्षेत्रात त्यांना २१ वर्षांचा अनुभव आहे , त्यानी हवामानशास्त्र खात्याच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले आहे. त्या  देशासाठी अल्पकालीन हवामान अंदाज सुधारण्यासाठी काम करत आहेत . अल्पकालीन अंदाज, ज्यामध्ये पुढील ४८ तासांसाठी अंदाज वर्तवले जातात, हा हवामानाच्या सर्वात महत्वाच्या पैलूंपैकी एक आहे असे त्या मानतात. […]

ड्रेसिंग टेबल

ड्रेसिंग टेबल तयार करण्याआधी आपल्या कोणत्या वस्तू तिथे ठेवायच्या आहेत त्याची नीट यादी करावी. आज पुरुष, लहान मुलेदेखील फॅशनच्या बाबतीत विशेष जागरूक असतात. त्यामुळे घरातील किती व्यक्तींचे कोणकोणते सामान तिथे ठेवायचे आहे हे सुरुवातीस ठरवून घ्यावे. त्यानुसार वेगळे कप्पे, ड्रॉवर्स करता येतात. त्यामुळे वस्तूंची सरमिसळ होत नाही. स्त्रियांचे सेमी प्रेशियस दागिने ठेवण्यासाठी इथे एखादा बंद ज्याला लॉक आहे असा ड्रॉवरही करता येतो. […]

कुतुब मिनार – भारताच्या इतिहासावरील दरोड्याचा साक्षीदार

तथाकथित मशीद म्हणून दाखवल्या जाणाऱ्या या इमारतीच्या बाजूला एक बांधकाम उभे आहे त्याला ‘सराई’ म्हटले जाते. ‘सराई’ हा हिंदी-उर्दू शब्द सोडला तर त्या इमारतीत ‘मुस्लीम’ म्हणण्यासारखे काहीच नाही. ‘सराई’ म्हणजे यात्रेकरू किंवा प्रवाशांसाठी बांधलेला निवारा – धर्मशाळा. आपण महाराष्ट्रात त्यांना ‘ओवऱ्या’ म्हणतो. […]

नावात काय नाही?

भारतात गाजणारा एक विषय आहे तो म्हणजे नामांतराचा, जे नाव सध्या आहे ते बदलण्याच्या मागणीचा. हे नाव कशाचेही असू शकते. रस्ता, चौक, बाग, शहर, जिल्हा, राज्य यांचे वा बस स्टँड, रेल्वे स्टेशन, विमानतळ यांचे वा विद्यापीठ, आस्थापना यांचे. स्वतःचे नाव बदलणारांची दखल बाकीच्यांनी घ्यायची गरज नसते. पण या सार्वजनिक ठिकाणांची नावे बदलण्यासाठी जनमताचा कौल घ्यावा लागतो. नाव बदलण्याचा आग्रह धरणारे ‘नावात काय नाही’ ची वाट धरणारे असतात. […]

1 14 15 16 17 18 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..