नवीन लेखन...

दिवाळी अंक आणि मराठी माणूस

मराठी भाषेचा, मराठी माणसांचा किंवा महाराष्ट्राचा सर्वात मोठा साहित्योत्सव कोणता? यात मतभेद होण्याची शक्यताच नाही. सर्वांचं एका आवाजात उत्तर येईल – ‘दिवाळी अंक’. या उत्सवाचा ‘दिवाळी मुहूर्त’ कायम आहे हे त्याचं आणखी एक वेगळेपण. मराठीत ‘मनोरंजन’ मासिकाचा पहिला दिवाळी अंक १९०९ मध्ये प्रकाशित झाला. दिवाळी अंक म्हणजे मराठी भाषे अक्षर वैभव ! १०६ वर्षे मराठी भाषेचा हा साहित्यजागर होत आहे आणि यापुढेही होत राहील. […]

भारतीय स्त्री वैज्ञानिक असीमा चटर्जी

असीमा चॅटर्जी  या भारतीय सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ होत्या  ज्या  सेंद्रिय रसायनशास्त्र आणि फायटोमेडिसिन क्षेत्रात त्यांचा कामासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांचे  सर्वात उल्लेखनीय काम म्हणजे विंका अल्कलॉइड्सवरील संशोधन, एपिलेप्टिक औषधांचा विकास आणि मलेरियाविरोधी औषधांचा विकास आहे. त्यानी  भारतीय उपखंडातील औषधी वनस्पतींवर देखील मोठ्या प्रमाणात काम केले. भारतीय विद्यापीठातून डॉक्टरेट ऑफ सायन्स मिळविणारी त्या  पहिल्या महिला होत्या. […]

स्मरणगाथा : ३ 

मे महिन्याचे दिवस होते . चार दीपावली अंकांना लघुकथा पाठवून झाल्या होत्या . एका दीपावली अंकासाठी दीर्घकथा लेखन चालू होते . आणि अचानक मेनका च्या संपादकांचा – राजाभाऊ बेहरे – यांचा फोन आला . ” मेनकासाठी भुईचाफा कथा मिळाली . आता जत्रा दीपावली अंकासाठी विनोदी कथा हवी आहे . सांगायला उशीर झाला आहे , पण कितीही […]

भारतीय स्त्रीशास्त्रज्ञ शिना राणी

५७ वर्षीय शीना राणी ह्या  हैदराबादमधील डीआरडीओच्या हाय-टेक लॅबमध्ये शास्त्रज्ञ आहेत . त्या  १९९९ पासून अग्नि मालिकेतील सर्व क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपण नियंत्रण प्रणालींवर काम करत आहेत. पंतप्रधान मोदींनी संपूर्ण मोहिमेला ‘मिशन दिव्यास्त्र’ असे नाव दिले होते. […]

तीन घटना

जगात बर्‍याच घटना घडतात. परंतु स्थानिक घटना, चांगल्या किंवा वाईट, या दूरवर होणार्‍या घटनांपेक्षा आपल्यावर अधिक परिणाम करतात. बर्‍याच घटना अगदी कमी कालावधीसाठी आपल्या मनात राहतात, काही थोडा जास्त काळ. केवळ काही गोष्टी चिरस्मरणात राहतात. […]

प्राचीन भारतांतील विमाने

कोणत्याही ज्ञानशाखेचा विषय निघाला की, ही शाखा आमच्या पूर्वजांना पूर्णपणें माहिती होती असें सांगणारे कांही लोक भेटतात. तर काहींचें म्हणणे असें असतें की, भारतांत असणारें ज्ञान है परभृत आहे. भारतीयांनी त्यांत स्वतःची अशी कोणतीहि भर घातली नाही. त्यांनी स्वतः काहीहि नवीन निर्माण केलें नाही. विचारांच्या या दोन्ही टोकांपैकी एकांत भारताच्या अभिनिवेशी अतिगौरवाचा भाग असतो, तर दुसऱ्यांतून न्यूनगंडाने पछाडलेल्या दुबळ्या मनोवृत्तीचें दिग्दर्शन असतें. परंतु कोणत्याहि परिस्थितीचें वास्तव ज्ञान हें प्रगतीला पोषक असतें. या वास्तवज्ञानाचा एक भाग म्हणून आज प्राचीन भारतांत असलेल्या काही विमानांचा परिचय घडविण्याचें ठरविलें आहे. […]

पाकिस्तानात डोकावणारा भारत

पर्यटकाच्या रूपानं एखादा लेखक जेव्हा देशा- परदेशात प्रवास करतो, तेव्हा त्याच्या मनात अनेक गोष्टींचा कल्लोळ उठतो. त्याच्या मनातला लेखक अनेक नव्या गोष्टींचा तिथे शोध घेऊ लागतो. या नव्या देशात, नव्या भागांत जेव्हा तो तिथल्या वैशिष्ट्यांची माहिती घेत असतो, तेव्हा त्यात स्वदेशाचं कुठं दर्शन घडतयं का, ते उलगडून पाहू लागतो. पाकिस्तान हा देश कधीकाळी आपल्या देशाचा अविभाज्य घटक होता, या भावनेनं त्याचं मन उचंबळून येतं. […]

अंशुमन गायकवाड – क्रिकेटमधला लढवय्या सरदार

उंच आणि चष्मिस अंशुमनचा कॉलेजमध्ये असतानाच १७ व्या वर्षी बडोद्याच्या रणजी संघात समावेश झाला. बडोदा आणि पश्चिम विभागासाठी ६ वर्षे धावांच्या राशी ओतल्यावर अखेर डिसेंबर १९७४ मध्ये अंशुमनचा वेस्ट इंडिजविरुद्ध कलकत्ता कसोटीसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला. […]

‘ऑगस्ट’चे अधिपती’ (ऑगस्ट महिन्यात जन्मलेले प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू )

‘ऑगस्ट’ महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या नेतृत्वगुण असलेल्या, विचारी, प्रभावी संवादकौशल्य जपणाऱ्या असल्याचे मानले जाते. ‘ऑगस्ट’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया. […]

भारतीय स्त्री वैज्ञानिक मंजू शर्मा

मंजू शर्मा या भारतीय जैवतंत्रज्ञानी आणि भारतातील अनेक वैज्ञानिक संशोधन आणि धोरण-निर्धारण संस्थांच्या प्रशासक आहेत. त्या   गुजरातमधील गांधीनगर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड रिसर्चच्या अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक होत्या. त्या  भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयात जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव होत्या   आणि २००७ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. […]

1 13 14 15 16 17 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..