नवीन लेखन...

ब्रेन रॉट – ३ : लोच्या झाला रे

पण बेसिन जवळच्या ज्येष्ठ नागरिक म्हणता येईल अशा माणसाकडे ते पहात होते . गेली सात ते आठ मिनिटे तो माणूस चेहरा धूत होता . नॅपकिन ने कोरडा करत होता . स्वतःभोवती सगळीकडे फिरून चेहरा निरखित होता . पुन्हा चेहरा धूत होता . पुन्हा कोरडा करत होता . पुन्हा… पुन्हा… […]

आज फिर जीने की तमन्ना है

“आज फिर जीने की तमन्ना हैं, आज फिर मरने का इरादा हैं.” बाल्कनीतल्या झोपाळ्यावर बसून पावसाला बघत कॉफी पिताना ती गुणगुणत होती. चाळीशी गाठली होती तिने गेल्याच आठवड्यात; पण तसं कोणतंच लक्षण तिच्या अंगभर कुठेही दिसत नव्हतं. […]

एक भेट सुरेश भटांची

महाराष्ट्राचे जे चार काल्पनिक भाग मानले जातात, त्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या भागांचा समावेश केला जातो. या चारीही विभागांत अनेक मान्यवर कवी, साहित्यिक, वाङ्मयकार, वक्ते यांची फार मोठी मांदियाळी आहे. आज सुरेश भट या मान्यवर वैदर्भीय कवि-गझलकार यांच्या कामगिरीचा ताळेबंद मांडताना त्याच विदर्भातल्या कवी अनिल, (आर. रा. देशपांडे), कुसुमताई देशपांडे, ग. ल्यं. माडखोलकर, प्राचार्य राम शेवाळकर, मधुकर केंचे, पु. भा. भावे अशा किती तरी नामवंत साहित्यिक वाङ्मयकारांची नावं नजरेसमोर येतात. या नावांमध्ये ठसठशीतपणानं दिसणारं एक नाव म्हणजे सुरेश भट. […]

यत्र तत्र सर्वत्र

तू पहाटेचा सोहळा तिमिरातील किरण.. घंटेचा निनाद आभाळाच तोरणं.. तू सागराची गाज शांततेची लाट.. क्षितीजाच टोक नदीवरचा घाट.. तू वाऱ्याचा वेग समतोल पृथा.. निसर्गाचे दान नियमांची प्रथा तू अग्नीच्या ज्वाळा ऊर्जेचे वरदान.. जल पृथ्वी वायू अग्नी आकाशाची खाण.. तू यत्र तंत्र सर्वत्र भविष्य भूत वर्तमान सखोल अंतर्मनातले समाधानाचे मूळ ज्ञान.. तू गतीची परिक्रमा परमोच्च बिंदू अमृत […]

समाजसेवा आणि भुतदया

थंडी खूपच पडली होती. संध्याकाळच्या वेळेस तर बाहेर पडणे शक्यच नव्हते. घरांतील बाहेरची कामे सकाळीच उरकून टाकण्याची आता सवयच झाली होती. गेले दोन महिने थंडीने कहरच केला होता. भाजी आणण्यासाठी सुद्धा उन्हाच्या वेळेत जाणे भाग पडत होते. एकतर अशा कडाक्याच्या थंडीत उन्हात चालायला मजा येते. दुपारच्या वेळेस तर रहदारीही कमी असते. त्यामुळे जरा आजूबाजूला नजर ही टाकता येते. […]

डाऊन टू मेमरी लेन

‘जिंदगी’ एक रेस है रफ्तार के सिवा कुछ नही. आपल्या सगळ्यांची जगण्याची ही एक पध्दतीच झाली आहे. आयुष्यभर या रेस बरोबर आपण धावतच असतो. आला दिवस गेला दिवस रुटीनच्या नावाने फक्त जगतच असतो. काही कारणांनी या रुटीनमध्ये जेव्हा खंड पडतो किंवा बदल होतो तेव्हा लक्षात येते की अरे त्या रेस बरोबर आपण धावत पळत कुठपर्यंत पुढे निघून आलो. […]

ऐका गोष्ट बाराची

12/12/12/12/12 बारा हा जुन्या लोकांचा प्रिय अंक… मोजण्यासाठी द्वादशमान पध्दती… १२ ची फूट म्हणजे १२ इंच एक डझन म्हणजे १२ नग. वर्षाचे महिने १२, नवग्रहांच्या राशी १२ गुरू, शनी, मंगळ हानिकारक समजले जातात… १२ वे तप… १२ वर्षाचे, गुरुगृही अध्ययन… १२ वर्षे घड्याळात आकडे… १२, दिवसाचे तास… १२, रात्रीचे तास… १२, मध्यरात्र म्हणजे रात्रीचे… १२ मध्यान्ह […]

मॉर्निंग वॉक

नुकताच आमच्या अहोंच्या ‘बायपास’ नंतर हा चालू झाला. आमच्या दोघांच्याही मनावर भयंकर भीतीचे दडपण होते. ऐन उन्हाळ्याचे दिवस सकाळी उठून देवाचे नाव घेऊन आम्ही आपले निघालो. पहिल्याच दिवशी सोसायटीच्या गल्लीतले कुत्रे ‘भसाभसा’ भुंकत अंगावर आले. ते ही बिचारे काय करणार? रात्रभर गल्लीचा पहारा देऊन थकले असावे किंवा कायम गाडीतून जाणारी माणसं त्याच्या रस्त्यावर अतिक्रमण करायला आली असे बहुतेक त्याला वाटले असावे. […]

प्रपोज डे

आज प्रपोज डे. खरतर भारतीय संस्कृतीत अश्या प्रकारचे कुठले डे साजरी होत नाही. हे दिवस मानवावे कि नाही ह्यावर मोठी डिबेट होऊ शकते. परंतु आजचा युवा ह्या कळत नकळत हे दिवस साजरी करत असतो. काही प्रत्यक्षात साजरी करीत नाही परंतु मनात कुठेतरी सुप्त इच्छा असते. ती ह्या वयाची, युवा आवस्थेची किमया आहे. […]

1 2 3 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..