नवीन लेखन...

ऐका गोष्ट बाराची

12/12/12/12/12

बारा हा जुन्या लोकांचा प्रिय अंक…
मोजण्यासाठी द्वादशमान
पध्दती… १२ ची
फूट म्हणजे १२ इंच
एक डझन म्हणजे १२ नग.
वर्षाचे महिने १२,
नवग्रहांच्या राशी १२
गुरू, शनी, मंगळ हानिकारक समजले जातात… १२ वे
तप… १२ वर्षाचे,
गुरुगृही अध्ययन… १२ वर्षे
घड्याळात आकडे… १२,
दिवसाचे तास… १२,
रात्रीचे तास… १२,
मध्यरात्र म्हणजे रात्रीचे… १२
मध्यान्ह म्हणजे दुपारचे… १२
एकादी गोष्ट तुटली फुटली म्हणजे तिचे वाजले… १२
सकाळच्या बाजारात उरला सुरला माल १२ च्या भावात काढतात…
पूर्वी मुलीचा विवाह १२ व्या वर्षी करत…
इंग्लंडमध्ये १२ पेन्सचा १ शिलिंग
बाळाचे नामकरण १२ व्या दिवशी केले जाते
मृत व्यक्तीचे धार्मिक विधीही १२ दिवसांचे…
बलुतेदार, बारभाई, बारावाटा… सगळे १२,
बेरकी माणूस म्हणजे १२ गावचं पाणी प्यायलेला
तसेच कोणाचेही न ऐकणारी रगेल व रंगेल व्यक्तीला १२ चा आहे असे म्हणतात.
ज्योतिर्लिंग… १२ आहेत,
कृष्ण जन्म… रात्री १२
राम जन्म दुपारी… १२,
मराठी भाषेत स्वर… १२ त्याला म्हणतात… बाराखडी
१२ गावचा मुखीया,
जमिनीचा उतारा ७/१२चा
इंजिनिअरींग, मेडीकल, किंवा ईतर कोर्सेससाठी १२ वी नंतर प्रवेश
खायापिया कुछ नही, गिलास फोडा बारा आना
बारडोलीचा सत्याग्रह
पळून गेला ——पो’बारा’
पुन्हा पुन्हा ——-दो’बारा’
एक गाव, १२ भानगडी
लग्न वऱ्हाडी ——— ‘बारा’ती
अशी आहे ही १२ चीं किमया…
शरद पवारांचा जन्म… १२/१२
त्यांचे गांव… बारामती
आणि सर्वात महत्त्वाचे…
MH12 अर्थात… पुणे☺️
असे भन्नाट शोध फक्त आणि फक्त पुणेकर लावू शकतात
राज्यपालांनी लटकवून ठेवलेल्या आमदारांची संख्या = 12
आता सस्पेंड झालेले आमदारांची संख्या = 12 🤔😀😄🤪🙄
काही लोकांच्या तोंडावर नेहमीच वाजलेले असतात ते पण 12 😂
कोणालाच दोष देऊन उपयोग नाही…
हा महिनाच “बारावा” आहे…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..