नवीन लेखन...

‘द’त्तू ‘फ’डकर : ‘द’मदार ‘फ’र्जंद

(भारताचे एक उत्कृष्ठ अष्टपैलू मराठमोळे क्रिकेटपटू “दत्तू फडकर” यांची १२-१२-२०२५ रोजी जन्मशताब्दी पूर्ण होतेय. त्यानिमित्ताने त्यांना मानवंदना म्हणून, त्यांच्यावर २०२३ च्या “शिवतेज” दिवाळी अंकात लिहिलेला लेख आपणांसमोर सादर)       कपिलदेव हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला सर्वोत्कृष्ट महान अष्टपैलू खेळाडू मानला जातो, आणि त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली कामगिरी ही मान्यता सिद्धही करते. परंतु कपिलच्या ३० वर्षं आधी भारतीय […]

पंचायत – सभ्यतेचे निकष पाळणारा राजकीय प्रयोग

हिंदीमध्ये “पंचायत” ही राजकारणावरील वेबसिरीज प्रदर्शित झाली. ४ सीजनद्वारे प्रदर्शित झालेल्या राजकारणा वरील या वेबसिरीजला दर्शकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. राजकीय विषय प्रत्येकाला आवडतातच असे नाही मात्र पंचायत वेब सिरीजमध्ये मांडलेले राजकारण कदाचित तुम्हाला आणि एकत्रित कुटुंबालाही मनातून आवडू शकते. […]

‘डिसेंबर’चे दादा

‘डिसेंबर’मध्ये जन्मलेल्या व्यक्ती ह्या “दृढनिश्चयी, समजूतदार, महत्त्वाकांक्षी व शिस्तप्रिय”   मानल्या जातात. चालू ‘डिसेंबर’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया. […]

तेजस्विनी

दोन वर्षांपूर्वी वनिताने आपल्या आईला आजारपणामुळे गमावलं होतं.ती त्यावेळी नुकतीच दहा वर्षांची असेल. एवढी जाणती नसताना देखील तिने वडीलांच्या दुसऱ्या लग्नाला जायच्या वेळी कसलाही दंगा किंवा रडून गोंधळ केला नाही. एरवी आईच्या आठवणीत आजीकडे जाऊन ती खूपदा रडायची पण सगळ्यांनी तिच्याशी प्रेमाने वागणारी आई आता परत येणार हे सांगितले तेव्हा पासून ती शांत होती. एकुलती एक […]

बाळगुटी एक वरदान भाग ४- सागरगोटा

शास्त्रीय नाव सीसॅल्पिनिया बोंड्यूसेला कुल-लेग्युमिनोसी. ही मोठी आणि काटेरी शिंबावंत (शेंगा येणारी) वेल [महालता] कुंपणावर किंवा क्वचित दुसऱ्या मोठ्या झाडावर चढलेली आढळते. हे एक काटेरी झुडूप किंवा वेल असते. याला बोराच्या आकाराची, टणक आणि गोलसर फळे लागतात. […]

मार्मोरिस प्रवासगाथा – वाराणसी: काशीची दिव्यता आणि अद्भुत आध्यात्मिक प्रवास

भारतातील हजारो शहरांमध्ये काही शहरे फक्त वास्तूंच्या आणि रस्त्यांच्या ओळखीवरून जिवंत राहत नाहीत; ती शहरं जन्माला येतात श्रद्धेतून, संस्कृतितून आणि अध्यात्मातून. अशीच एक नगरी म्हणजे वाराणसी किंवा काशी. “जीवन आणि मृत्यू यांच्या मधील पडदा सर्वात पातळ जिथे आहे, ते ठिकाण म्हणजे काशी” – असे अद्वैत वेदान्तात सांगितले जाते. […]

स्वामिनी

हातातल्या कंकणाचे कपाळावरील कुंकवाचे सरणाऱ्या पदराचे भान कसे राखावे? रोखणाऱ्या नजरांचे स्पर्शणाऱ्या हातांचे विकृत विचारांचे क्षण असे टाळावे? आखलेल्या मर्यादांचे दिसणाऱ्या सौंदर्याचे अस्तित्व हे बंधनांचे कुठवर मी पाळावे? बाईपण जगण्याचे वडे हे गिरवायचे तिच्या विवंचनेचे कोणीही पाढे वाचावे? मोकळ्या श्वासाचे तिच्या स्वाभिमानाचे मोल तिच्या जगण्याचे तिचे तिनेच करावे. @ प्रतिभा

सत्व

पहा तरी कसे उरलात सुंदर काया कि निर्मळ माया.. काळाच्या या आरशात कशी दिसते तुमची छाया.. पुसले का तुम्ही कोणाचे ओघळणारे अश्रू.. आणले का कधी तुम्ही कोणाच्या चेहऱ्यावर हसू.. समाधान थोडे तरी आहे का गाठीशी.. किती जण जमले तुमच्या पाठीशी. व्यर्थ जगण्याची केली असेल घाई.. कर्माआधी फळ कोणाला मिळायचे नाही.

ठाण्याचा ढाण्या वाघ : मेजर मनीष पितांबरे

आपल्या सैन्यदलातील शूर जवान आपल्या प्राणांची पर्वा न करता शत्रूशी लढा देत असतात, ज्यामुळे आपल्यासारखे सामान्य लोक सुखरूप राहतात आणि दैनंदिन आयुष्य निर्धोकपणे जगू शकतात. याच शूर परंपरेतील एक लखलखते मराठी नाव म्हणजे हुतात्मा ‘मेजर मनीष हिराजी पितांबरे’! त्यांच्या अतुलनीय धैर्य, नेतृत्व आणि सर्वोच्च बलिदानासाठी मेजर मनीष यांना ‘कीर्तीचक्र’ देऊन गौरविण्यात आले. कीर्तीचक्र हा शौर्यासाठीचा देशाचा दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे. […]

1 2 3 4 5 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..