नवीन लेखन...

याने ठरते भारतीयांची ओळख

विविधतेत एकता जपलेला भारत देश म्हणजे जगासाठी ज्ञानाचा एक अथांग महासागर आहे. या देशाच्या इतिहास, परंपरा आणि वर्तमानातून जगाला घेण्या सारख्या बऱ्याच काही गोष्टी आहेत. असंख्य क्षेत्रातील या देशाची वैशिष्ट्ये आणि ज्ञानाचा खजिना कदाचित भारतीयांना देखील माहीत नसेल. काही क्षेत्रानुसार आणि विषयवार अभ्यास केला तर आपल्याला आपल्या देशाच्या अमूल्य गोष्टी लक्षात येतील. विषय तर अनेक आहेत मात्र त्यातील काही निवडक गोष्टींचा घेतलेला हा धावता आढावा. […]

मी मुंबईची लोकल बोलतेय

आमची मुंबईच्या प्रिय मुंबईकरांनो मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. बोलायचं कारण म्हणजे आज मला मनातुन खूप भरून आले आहे. आणि भरून येण्याचे कारण म्हणजे मला लवकरच तुमच्या सेवेत पूर्ण क्षमतेने सामावून घेण्याची चर्चा माझ्या कानापर्यंत पोहचली आहे. […]

संवाद हृदयाशी

हृदयाशी संवाद साधणे म्हणजे नेमके काय? हृदयाशी संवाद साधणे म्हणजे दोन गोष्टी तपासणे. एक तर तांत्रिकदृष्ट्या आपले हृदय आणि त्याचे कार्य उत्तम स्थिती मध्ये आहे का हे तपासणे. आणि दुसरे म्हणजे भावनिक तसेच मानसिक दृष्ट्या दैनंदिन जीवनातील घडामोडींना सामोरे जाताना त्या घडामोडींचा आपल्या मनावर म्हणजेच नकळत आपल्या हृदयावर आपण कितपत परिणाम करून घेतोत? […]

ऑन टाईम डिलिव्हरी

आजकाल कोणतीही वस्तु विकत घेण्यासाठी घराबाहेर पडून बाजारात जावेच लागते असे काही नाही. आजच्या डिजिटल युगात टाचणी पासुन फ्रिज पर्यन्त जवळपास सर्व गोष्टी ऑनलाईन घरी मागवणे शक्य झाले आहे. अगदी हॉटेल मध्ये जाऊन जेवण्याची जरी इच्छा झाली तरी ऑनलाईन जेवणच घरी मागवणे शक्य आहे आज. […]

सोळाव वरीस धोक्याच

सोळावे वर्ष हे असे वर्षे असते जिथे विद्यार्थ्यांच्या मन आणि शरीरात अमुलाग्र बदल होत असतात. सोळावे वर्ष हे आपण तारुण्याच्या पदार्पनाचे वर्ष मानतोत. शाळेच्या कडक शिस्ती मधून विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या मुक्त जीवनामध्ये प्रवेश केलेला असतो. जिथे बारावीला उत्तम मार्क घेऊन पुढील आयुष्याच्या दिशा ठरवायच्या असतात त्याच क्षणी या वयात विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी भुरळ घालण्याचा प्रयत्न करत असतात. […]

कोरोनास पत्र

तू एकमेव असा जीव नाहीयेस जो मानव जातीवर संकट बनून चालून आलास. तुझ्या आधीही तुझ्या सारखेच काही सूक्ष्म जीव संकट बनुन प्रहार करत होते पण वेळोवेळी मानवाने त्या सर्वांना मात दिली. त्यामुळे तुलाही एक दिवस हार पत्करावी लागणार हे नक्की. […]

फोटोग्राफी मदतीची

असे म्हणतात की डाव्या हाताने केलेले दान हे उजव्या हाताला देखील कधी माहित होऊ नये. दान हे नेहमी गुप्त असावे. पण मला वाटते दान गुप्त असावे यापेक्षा ते प्रेरणा देणारे असावे. त्यामुळे अन्नदान असो किंवा इतर कुठल्याही प्रकारचे मानवतेला मदत करणारे दान असो त्याचा प्रचार, प्रसार करणे मला अगदीच चुकीचे वाटत नाही. […]

एक किंवा दोन बस्स

गेल्या काही दशकात आपण एकत्र कुटुंब पद्धती कडून अलिप्त कुटुंब पद्धतीकडे वळालो. आता अलिप्त कुटुंब पद्धतीत देखील छोटेखानी कुटुंबाला प्राधान्य आहे. काळानुसार हा बदल घडताना भौतिक सुख सोयी वाढत आहेत आणि घरातील माणसांचा संवाद कमी होत आहे. आई, वडील आणि मुल अशा तीन माणसांच्या छोटेखानी कुटुंबात जर आई आणि वडील सतत बाहेर व्यस्त असतील तर त्या मुलाने संवाद साधायचा कोणाशी? […]

निमित्त एक पण आपत्ती मात्र अनेक

इथून पुढे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवी प्रगती साधताना जिथे जिथे निसर्गाला धक्का लागेल तिथे तिथे ति झीज भरून काढण्याची जिम्मेदारी देखील आपल्याला उचलावी लागेल. आपण तंत्रज्ञान विकसित करण्यासोबत निसर्गाचा आदर राखायला लागलो की मग आपल्यावर देखील वेगवेगळ्या आपत्तीच्या निमित्ताने घरात बंदिस्त होण्याची वेळ येणार नाही. […]

शोध “डाऊन टु अर्थ” जोडीदाराचा

नुकतीच वयाची पंचवीस वर्षे पूर्ण केली होती त्याने. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून आता जॉब मध्ये देखील तो स्थिर स्थावर झाला होता. त्याच्या आई-वडिलांना आता त्याच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात करायची होती. स्थळ बघायला सुरुवात करण्याआधी वडिलांनी मित्रत्वाच्या भावनेने त्याला एकदा विचारून घेतले की त्याच्या मनात कोणी आहे का? […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..