नवीन लेखन...

पंचायत – सभ्यतेचे निकष पाळणारा राजकीय प्रयोग

१९१३ हे भारतीय चित्रपटसृष्टीच्या जन्माचे वर्ष आहे. “राजा हरिश्चंद्र” या मूकपटाद्वारे दादासाहेब फाळके या मराठी व्यक्तीने भारतीय चित्रपटसृष्टीची पायाभरणी केली. पुढील वर्षीच म्हणजे १९१४ साली “राजा हरिश्चंद्र” या चित्रपटाचे ब्रिटनमध्ये देखील प्रदर्शन झाले होते. भारतीय चित्रपटसृष्टीचा उदय झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात बहुतांश मूकपट हे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारेच होते.

राजकीय विषयावरील चित्रपटाचा पहिला प्रयोग १९२१ साली “भक्त विदुर” या चित्रपटाद्वारे झाला. १९३१ साली “आलम आरा” या चित्रपटाद्वारे भारतीय बोलपटाची सुरुवात झाल्यानंतर १९३४ साली “मजदूर” हा राजकीय विषयावरील पहिला बोलपट प्रदर्शित झाला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मात्र राजकीय विषयावर बरेच चित्रपट येण्यास सुरुवात झाली. मात्र राजकीय विषयावरील सर्वात जास्त यश मिळालेला पहिला भारतीय चित्रपट म्हणजे “गरम हवा”. हा चित्रपट १९७४ साली प्रदर्शित झाला होता भारत पाकिस्तानच्या फाळणीवर आधारित राजकारणावर होता.

जेव्हा कॉमेडी चित्रपटांचा काळ चालु झाला तेव्हा मराठी मध्ये “गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा” या राजकीय कॉमेडीचा प्रयोग करण्यात आला. या राजकीय कॉमेडीला मराठी चित्रपटसृष्टी मध्ये प्रचंड यश मिळाले. खेडेगावातील गंभीर समस्या या चित्रपटामध्ये गमतीशीर पद्धतीने मांडण्यात आल्या होत्या. साधारणतः या चित्रपटा समानच धागा घेऊन हिंदीमध्ये “पंचायत” ही राजकारणावरील वेबसिरीज प्रदर्शित झाली. ४ सीजनद्वारे प्रदर्शित झालेल्या राजकारणा वरील या वेबसिरीजला दर्शकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

बहुतांश राजकीय चित्रपटात कलाकारांची देहबोली गंभीर दाखवली जाते. चित्रपटातील नेता अशा अविर्भावात वावरत असतो की जे राजकारण मला कळते ते तुम्हाला कोणालाच कळत नाही. मात्र पंचायत या वेब सिरीजमध्ये “फुलेरा” या खेडेगावातील गंभीर आणि गमतीशीर अशा दोन्ही प्रकारच्या राजकीय समस्या मांडल्या आहेत. गंभीर राजकीय प्रसंगांना कलाकारांची गंभीर देहबोली तर गमतीशीर राजकीय प्रसंगांना कलाकारांची हलकी-फुलकी देहबोली असे उत्तम मिश्रण या वेब सिरीजमध्ये दाखवण्यात आले आहे.

खेडेगावातील समस्या ह्या शहरातील समस्यांपेक्षा वेगळ्या असतात. काही समस्या जश्या गंभीर असतात तशाच खेडेगावात काही समस्या गमतीशीर देखील असु शकतात. पंचायत वेब सिरीजमध्ये दिग्दर्शकाने नेमकी हीच गोष्ट अचूकपणे हेरली आहे. खेडेगावातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरातील कार्य ही त्या संपुर्ण गावाची जिम्मेदारी असते. ही जिम्मेदारी कशा प्रकारे पार पाडली जाते आणि पार पडताना काय काय हेवेदावे होतात हे तुम्ही पंचायत वेब सिरीजमध्ये बघा. एखादया मुक्या प्राणी आणि पक्षावरून देखील राजकारण कसे रंगू शकते? आणि या राजकारणाला गंभीर तसेच गमतीशीर वळण कसे लागु शकते हे तुम्ही पंचायत वेब सिरीजमध्ये बघा.

एका खुर्चीला पाय आणि दुसऱ्या खुर्चीला चाक असा प्रकार एकाच ग्रामपंचायत कार्यालयात घडला तर यावरून काय काय चर्चा घडू शकतात हे तुम्ही पंचायतमध्ये बघा. २ गावातील नेत्यांमध्ये वैमनस्य निर्माण झाले तर ती २ गावे देखील एकमेकांची दुश्मनच असतात आणि ही दुश्मनी कशी निर्माण होते हे तुम्ही पंचायत मध्ये बघा. एखादया स्त्रीला घटनात्मक अधिकारांद्वारे गावाचे प्रमुख पद मिळते. मात्र खरंच त्या स्त्रीने केलेला शासकीय कारभार त्या घरातील पुरुषाला आणि गावाला आवडू शकतो का याचे वास्तवदर्शी दर्शन पंचायत मध्ये घडते.

खेडेगावातील एक प्रमुख रस्ता करण्याएवढे तरी आर्थिक उत्पन्न एखादया ग्रामपंचायतचे असु शकते का याचे देखील उत्तर पंचायत मधुन मिळते. शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यायचा याचे ज्ञान खरंतर शहरातील व्यक्तींपेक्षाही खेडेगावातील व्यक्तींना जास्त असते. नेमके कसे ते पंचायत मध्ये बघा. पारावरील गप्पा ही गोष्ट तुम्ही मराठीमध्ये ऐकली असेल. मात्र पारावरील गप्पांचे खरे दर्शन घडते पंचायत मध्ये.

राजकारणावरील वेब सिरीज म्हणले की कंबरे खालील भाषा, हिंसाचार, धटिंग शाही, भ्रष्टाचार सहसा अशाच गोष्टी दाखवल्या जातात. मात्र पंचायत वेबसिरीजने या सर्व गोष्टी एका सभ्यतेच्या पातळीवर दाखवल्या आहेत. संपुर्ण कुटुंब एकत्रितपणे बसून जर ही वेब सिरीज बघत असाल तर मध्येच एखादया सदस्याने उठुन जावे असा कुठलाच प्रसंग या वेब सिरीजमध्ये बघण्यात येत नाही. सभ्यतेचे बहुतांश निकष पाळत पंचायत वेब सिरीजमध्ये राजकीय विषय फारच कुशलतेने हाताळण्यात आला आहे. तुम्ही ही वेबसिरीज फक्त राजकीय विषयासाठी म्हणुन नव्हे तर खेडेगावातील गंभीर/गमतीशीर समस्या काय असतात हे जाणुन घेण्यासाठी सुद्धा बघु शकतात.

राजकीय विषय प्रत्येकाला आवडतातच असे नाही मात्र पंचायत वेब सिरीजमध्ये मांडलेले राजकारण कदाचित तुम्हाला आणि एकत्रित कुटुंबालाही मनातून आवडू शकते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..