पहा तरी कसे उरलात
सुंदर काया कि निर्मळ माया..
काळाच्या या आरशात
कशी दिसते तुमची छाया..
पुसले का तुम्ही कोणाचे
ओघळणारे अश्रू..
आणले का कधी तुम्ही
कोणाच्या चेहऱ्यावर हसू..
समाधान थोडे तरी
आहे का गाठीशी..
किती जण जमले
तुमच्या पाठीशी.
व्यर्थ जगण्याची
केली असेल घाई..
कर्माआधी फळ
कोणाला मिळायचे नाही.


Leave a Reply