नवीन लेखन...

माहेर

मेहंदीच्या हातावर उमटली दाट नक्षी माहेरच्या आठवांचा उभा अंगणात पक्षी.. उभा अंगणात पक्षी त्याला मोकळे आभाळ परतून माहेराला जाते मन किती काळ.. जाते मन किती काळ सोयरीक साधण्यास झोका जाई वरखाली कसे सावरु मनास? कसे सावरू मनास दाटे मनी हूरहूर पाखरांनो सांगा आता लेक भेटाया आतूर -प्रतिभा

मार्मोरिस प्रवासगाथा: ओडिशा – संस्कृती, समुद्र आणि अध्यात्माची जादू

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले ओडिशा राज्य म्हणजे इतिहास, परंपरा, कला, आध्यात्म आणि निसर्गाचा अद्भुत संगम. बंगालच्या उपसागरात मिसळणारा वारा, हजारो वर्षांची वारसा जपणारी मंदिरे, आदिवासी लोक-संस्कृती आणि समुद्र किनाऱ्यांची शांतता – असे हे ओडिशा पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव देणारे गंतव्य आहे. […]

वीरगाथा – मेजर प्रदीप ताथवडे

समाजसेवा आणि देशसेवेच्या प्रेरणेने तसेच खाकी वर्दीच्या आकर्षणाने अनेक धाडसी तरुण पोलीस दलात आणि सैन्यात दाखल होत असतात. महाराष्ट्रातून अनेक शूरवीर तरुण पोलीस आणि सैन्यदलात भरती होऊन विशेष उल्लेखनीय सेवा देत असतात. त्यातील काहींनी भारतमातेच्या संरक्षणासाठी प्राणार्पणही केले आहे. यातीलच एक विशे […]

इंद्रधनुषी रंग नदीचे…

पावसाळा संपत आला की पक्षपंधरवाड्याची सुरुवात होते.खेड्यापाडयातून पितरांच्या सर्वत्र वावरणा-या भुकेलेल्या आत्म्यांना दरवर्षी पिंडदान करून तृप्त करण्याची प्रथा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे.शेवटी ही पिंडे नदीकाठावर कावळ्याच्या प्रतिक्षेत ठेवली जातात किंवा नदीच्या पाण्यात मासे खातील यासाठी अलगद सोडली जातात. त्यानंतर सुरु होते ती घराची स्वच्छता व शुद्धता करणे,घराच्या भिंती मातीच्याच असायच्या त्या मातीनेच सारवून स्वच्छ करायच्या.पावसाळाभर पावसाने […]

राजकीय स्त्रिया – सुचेता कृपालानी

सुचेता कृपलानी भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी होत्या. त्या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या, १९६३ ते १९६७ पर्यंत उत्तर प्रदेश सरकारच्या प्रमुख म्हणून काम करत. […]

रिवर्सल मंत्र

ज्यांनी मधुमेहाचे जीवघेणे अनुभव सोसले, वडिलांच्या मधुमेहाचा दीर्घ लढा पाहिला असे गोल्ड मेडलिस्ट डॉ. चंद्रकांत कणसे यांनी अनुभवातून जाणले की मधुमेह हा केवळ औषध व इंजेक्शन घेऊन बरा करता येत नाही, तो जीवन शैलीशी निगडित आहे. युट्युब वरील त्यांच्या अनेक व्याख्यानामधून व इतरत्र झालेल्या अनेक व्याख्यानांमधून ते सडेतोडपणे काय करायला पाहिजे ते सांगतात. सगळं संपलं आहे असं वाटणाऱ्यांना व नैराश्य आलेल्यांना हे पुस्तक मधुमेहातून नक्कीच बाहेर काढेल. […]

राजकीय स्त्रिया – विजयालक्ष्मी पंडित

विजय लक्ष्मी पंडित भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजनयिका  आणि राजकारणी होत्या. १९५३ ते १९५४ पर्यंत त्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८ व्या अध्यक्षा होत्या , या पदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला आणि एकमेव भारतीय होत्या. १९६२ ते १९६४ पर्यंत त्या महाराष्ट्राच्या तिसऱ्या राज्यपाल देखील होत्या . […]

मैत्रगंध

उंच उंच नारळाच्या बागा आणि त्या झावळ्या वर बसलेले पक्षी,किनाऱ्यावर पोहचताच होणारा तो वाळूचा स्पर्श,गलबताकडे धाव घेणारी कोळ्यांची पोरं. समुद्राच्या भोवताली असलेल्या किनाऱ्यावर तासनतास घालवलेला वेळ, आल्हाददायक होणारा हवेचा स्पर्श, त्यातून मिळणारा आनंद; अपर्णाला कायमच शहरातून तिच्या छोट्याश्या समुद्रकिनारी असणाऱ्या गावात ओढून आणायचा. दोन दिवसांनी ती पुन्हा तिच्या कामात व्यस्त असायची.. तिच्या नोकरीच्या निमित्ताने तिला पुन्हा […]

दृष्टादृष्ट

भरून राहिला! कंठ दिगंबरा! दत्त योगेश्वरा ! गुरू दत्ता!!१!! दर्शनास जीव! आतुर भक्ताचा! दत्त दर्शनाचा! वाटे हेवा!२!! त्रिगुण धारक ! तुम्ही योगीराज! चिंतनाने आज ! बोलावले!!३!! आलो दत्ता ठायीं! भेटही सुखाची! घडो नयनांची ! दृष्टादृष्ट!!४!! गुरूंचा आधार! दत्त नाम ओठी! सुटतील गाठी! संभ्रमांती!!५!! गुरू बळ लाभे ! जन्माची पुण्याई! समजावें आई! बाळबोध!!६!! परमोच्च क्षण ! भक्तीचा […]

स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सुहास्यवदन प्रकट स्वरुप रक्त कांती तेज अजाणबाहू तुम्ही स्वामी राजाधिराज..!१! स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सकळ भक्तजनांची तुम्ही बाप माय चालविला संसार जगाचा तुम्ही स्वामीराय!!२!! स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शिरी मुकुट पितांबर वस्त्र भरजरी शोभे कमंडलू हातात समोरी स्वामीराज उभे!३! स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी […]

1 2 3 4 5 6 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..