भरून राहिला! कंठ दिगंबरा!
दत्त योगेश्वरा ! गुरू दत्ता!!१!!
दर्शनास जीव! आतुर भक्ताचा!
दत्त दर्शनाचा! वाटे हेवा!२!!
त्रिगुण धारक ! तुम्ही योगीराज!
चिंतनाने आज ! बोलावले!!३!!
आलो दत्ता ठायीं! भेटही सुखाची!
घडो नयनांची ! दृष्टादृष्ट!!४!!
गुरूंचा आधार! दत्त नाम ओठी!
सुटतील गाठी! संभ्रमांती!!५!!
गुरू बळ लाभे ! जन्माची पुण्याई!
समजावें आई! बाळबोध!!६!!
परमोच्च क्षण ! भक्तीचा संगम!
आत्म्याच्या उगम! दत्तात्रय!!७!!
@ काव्य प्रतिभा
प्रतिभा महादेव चौगले
कोल्हापूर`


Leave a Reply