स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
सुहास्यवदन प्रकट स्वरुप रक्त कांती तेज
अजाणबाहू तुम्ही स्वामी राजाधिराज..!१!
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
सकळ भक्तजनांची तुम्ही बाप माय
चालविला संसार जगाचा तुम्ही स्वामीराय!!२!!
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
शिरी मुकुट पितांबर वस्त्र भरजरी शोभे
कमंडलू हातात समोरी स्वामीराज उभे!३!
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
स्वामी तुमच्या नामाची माला गुंफता
मस्तकी हात तुम्ही प्रेमाने ठेविता..!!४!!
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
कृपा सदैव तुमची भक्तांच्या पाठी
जन्म मरणाच्या अनन्य सुटल्या हो गाठी!!५!!
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
तुमच्या संगती होते निर्भय मन
शांत निश्चल शुद्ध होते अंतर्मन!!६!!
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
कर दोन्ही जुळती पदकमलावरी
स्वामी ध्यास लागो जन्मजन्मांतरी!!७!!
पदोपदी स्वामी अनुभूती यथार्थ
जीवनास अर्थ देती स्वामी समर्थ!!८!!
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@ प्रतिभा


Leave a Reply