22 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो
आज प्रपोज डे. खरतर भारतीय संस्कृतीत अश्या प्रकारचे कुठले डे साजरी होत नाही. हे दिवस मानवावे कि नाही ह्यावर मोठी डिबेट होऊ शकते. परंतु आजचा युवा ह्या कळत नकळत हे दिवस साजरी करत असतो. काही प्रत्यक्षात साजरी करीत नाही परंतु मनात कुठेतरी सुप्त इच्छा असते. ती ह्या वयाची, युवा आवस्थेची किमया आहे.
प्रपोज डे च्या दिवशी मुल-मुली एकमेकांना प्रपोज करतात. प्रपोज मुलानेच करावा अशी एक पुरुषी परंपरा ह्या प्रकरणात सुद्धा बघायला मिळते. क्वचितच मुली मुलांना प्रथम प्रपोज करतात. आता हि प्रपोज करणे म्हणजे नेमकी काय भानगड आहे? सर्वसाधारण अशी कल्पना आहे कि ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे हे तिला/त्यला सांगणे. म्हणजेच आय लव यु म्हणणे म्हणजे प्रपोज करणे. ह्याची अनेक मध्यम असतात. प्रत्यक्ष जाऊन सांगणे, लवलेटर लिहिणे, इमेल लिहिणे, whats app करणे इत्यादी अनेक मार्ग आहेत. आपल्या सोयीप्रमाणे आणि हिम्मती प्रमाणे मुल आपला मार्ग निवडतात.
प्रपोज करतांना मुलांना ह्याची कल्पना सुद्धा नसते कि आपण काय करतोय? तुझ माझ्यावर प्रेम आहे. म्हणजे नेमक काय आहे? असा प्रश्न समोरच्याने विचारल्यास बोबडी वळते. आपली प्रेमाची व्याख्या नेमकी काय आहे? आपल खरच प्रेम आहे का? कि फक्त त्याची गर्लफ्रेंड आहे म्हणून माझीपण हवी. ह्यावर विचार मंथन होणे आवश्यक आहे.
बऱ्याचदा प्रेम हे एकतर्फा असते. समोरच्याला कल्पनाही नसते. बऱ्याचदा दोन्ही कडे असते पण कस सांगू हा प्रश्न असतो. आपण एखाद्या व्यक्ती समोर तिच्या/त्याच्या विषयीच्या आपल्या भावना व्यक्त करतो तेव्हा त्यला/तिला आपल्याबद्दल काय समज होईल ती/तो काय म्हणेल असे सगळे विचार सुरु असतात. कशी तरी हिम्मत करून प्रपोज होतो. कधी होकार येतो तर कधी नकार येतो. होकार आला तर ह्यांचा आनंद गगनात मावत नाही परंतु नकार आला तर हे त्यांना नैराश्यात ढकलते. खाण-पीण सोडण्यापासून, आत्म्हत्येची धमकी पासून तर थेट आत्महत्या करे पर्यंत हे प्रकरण जाऊ शकते. काहींना नकार मिळाल्यास हा त्यांचा अपमान वाटतो आणि त्यांच्यात सूड भावना निर्माण होते. अस हे गंभीर प्रकरण आहे.
नकार आल्यास वाईट वाटणे स्वाभाविक आहे. परन्तु नकार मिळाला म्हणजे सगळ संपल अस नाही. प्रत्येकाला आपण आवडूच हे काही कम्पलसरी नाही. त्या व्यक्तीन आपल्याला नाकारलं म्हणजे आपल संपूर्ण व्यक्तिमत्वच नाकारलं अस नाही. आपण पूर्णतः वाईट आहोत असा त्याचा अर्थ नाही. म्हणून आता जागून उपयोग नाही, मी बघून घेईल, बदला घेईल असा निरर्थक विचार करणे चुकीचे ठरेल. आपल प्रेम आहे कि आकर्षण हे आधी तपासा. प्रपोज चा पर्पज आधी ध्यानात घ्या आणि मगच करा.
आज मुल घरी आल्यावर चेहरा उतरवून आले असतील, गुमसुम दिसत असतील किंवा अति उत्साही दिसत असतील, गालातल्या गालात हस्त असतील तर पालकांनी समजावे काहीतरी गडबड आहे. ह्या निमित्याने सतर्क पालकांनी ह्या सर्व डे च्या काय भानगडी आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे. पालकांनी मुलाशी मित्रातापुर्वक संवाद साधा. मैत्रिपुर्वक नात ठेवा. नैराश्यात असतील तर त्यांचे सांत्वन करा त्यांना आधार द्या. उत्साहात असतील तरीही त्यांना समजावा आणि योग्य मार्गदर्शन करा.
–वैद्य भूषण मनोहर देव.
ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय


Leave a Reply