गोव्यातील रम्य सकाळ ! (स्मरणगाथा : १)
प्रचंड उत्साहात आणि गर्दीत निघालेली साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी. उत्साह, उत्सुकता, अभिमान आणि साहित्य संमेलनाच्या वेळी असणारे चैतन्य , दिंडीच्या वेळी जाणवत होते. माऊलींची प्रतिमा ठेवलेली पालखी विविध फुलांच्या गजऱ्यांनी , फुलांच्या माळानी सजवलेली . अवघा आसमंत सुगंधाने , अभंगांच्या गजराने आणि कोकणी गीतांनी भारून गेलेला . […]
