नवीन लेखन...

पुणे ते मुंबई – आगामी चित्रपटासाठी फॉर्म्युला

एका कल्पक दिग्दर्शकाने आपल्या आगामी चित्रपटासाठी पुढील फॉर्म्युला तयार केला आहे. आजकालच्या लोकप्रिय चित्रपटांना आवश्यक असा सर्व मसाला त्यात आहे. पुणे ते मुंबई या आगगाडीच्या एका प्रवासात हा बोलपट काढता येतो. या चित्रपटाचे कथानक व शूटिंग पुणे स्टेशनवर सुरू झाले असून बोरीबंदर स्टेशनवर ते संपले आहे. […]

पेशावरमधले थरारक स्वागत

लाहोरमध्ये एक रात्र काढून पेशावरकडे जायचं असल्यानं हॉटेल शाहताजवर सामानाची उचकाउचकी करत बसलो नाही. खालच्या मजल्यावर असलेल्या हॉटेल व्यवस्थापकाकडे पेशावरला कसं जाता येईल, या संदर्भात माहिती घ्यायला मी गेलो. तो मला म्हणाला, ‘आत्ता रात्री आठनंतर पेशावरला जाणाऱ्या बऱ्याच बसेस पलीकडून सुटतात. त्यांपैकी कोणतीही घेतलीत तरी पेशावरला जाता येईल. […]

स्मरणगाथा : ५

धन्य होण्याचे आणि कृतकृत्य होण्याचे, गुरू ऋण अंशतः फेडण्याचे योग आयुष्यात अपवादानेच येतात. असे योग माझ्याही आयुष्यात आले . ज्यांनी माझ्या वाङ्मयीन कारकिर्दीला आशीर्वाद दिला , त्या स्वामी स्वरूपानंद महाराजांचं चरित्र लिहिण्यासाठी सेवा मंडळाकडून विचारणा झाली होती . स्वामीजींचं चरित्र लिहायचं आणि तेही अत्यंत कमी शब्दात… हे खरंतर खूप मोठं आव्हान होतं. ज्यांच्याविषयी लिहायचं ती व्यक्ती […]

भारतीय स्त्री वैज्ञानिक डॉ. मंजू बन्सल

डॉ. मंजू बन्सल  या आण्विक बायोफिजिक्स क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्या बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या आण्विक बायोफिजिक्स युनिटमध्ये सैद्धांतिक बायोफिजिक्स ग्रुपमध्ये प्राध्यापक होत्या . त्या बंगळुरू येथील इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल इन्फॉर्मेटिक्स अँड अप्लाइड बायोटेक्नॉलॉजीच्या संस्थापक संचालक आहेत. […]

तीन बाळ

रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळील जांभिवली हे माझ्या वाडवडिलांचे गाव. मला कळायला लागल्यापासूनच्या जास्त आठवणी या गावाशी निगडित आहेत. […]

श्रीमान बाळासाहेब खुशालराव – ऐसपैस

बाळासाहेब खुशालराव ऐसपैस हा गृहस्थ गावांत सर्वांना माहीत आहे. हे गृहस्थ माहीत असण्यासारखेच आहेत. गावांत ज्यांना बाळासाहेब माहीत नाहीत, त्यांना छत्रपति शिवाजीमहाराज कोण हेही माहीत नाही असे खुशाल समजावे. या गावातल्या लोकांना एक वेळ गांधी माहीत नसले तरी चालेल. […]

पाकिस्तानमधला प्रवेश

१९९६ च्या सुरुवातीच्या काळात जेव्हा मी खरंच पेशावरमध्ये तिच्या घरी जाऊन उभा राहिलो, तेव्हा रझियाचा स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास बसेना. ‘गोखलेसाब आप? ‘ म्हणतानाचे तिच्या डोळ्यांतले अत्यानंदाचे ते भाव आणि न्यूयॉर्क सोडतानाचा तो चेहरा यात बरंच अंतर होतं. रझियाच्या भावांनी तर अगदी आलिंगन देऊन स्वागत केलं. मी त्यांच्या शेजारी बसलो. फोटो काढले, म्हटलं पाहा, ‘तुमच्या माझ्यात काही फरक आहे का? ‘ त्यांच्याबरोबर जेवलो. पेशावरमध्ये फिरलो. यात कुठेही दोन राष्ट्रांतल्या शत्रुत्वाची दरी नव्हती. […]

कारगिल पर्व आणि ‘ ते ‘

गेले तीन तास तो बंकरमध्ये उभा होता. दुर्बिणीतून आसमंत न्याहाळत होता. सगळीकडे शांत होतं ,कसलीही हालचाल जाणवत नव्हती , तरीही पापणी लवू न देता तो कर्तव्य बजावत होता. अंग बधीर होत होतं ,पण भारतमातेच्या संरक्षणाची जाणीव त्याला अकल्पित ऊब पुरवीत होती. समुद्रसपाटीपासून अठरा हजार फूट उंचीवरच्या कारगिल क्षेत्रात तो उभा होता . त्याचा दुसरा सहकारी विश्रांती […]

भारतीय स्त्री वैज्ञानिक जानकी अम्मल

अम्मल ह्या  एक प्रसिद्ध वनस्पतिशास्त्रज्ञ आणि पेशी शास्त्रज्ञ होत्या  ज्यांनी अनुवंशशास्त्र, उत्क्रांती, वनस्पति भूगोल आणि मानववंशशास्त्र या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. पद्मश्री पुरस्कार विजेत्या जानकी अम्मल या भारतीय विज्ञान अकादमीच्या संस्थापक फेलो आहेत. […]

स्मरणगाथा : ४ 

समजा , तुम्ही लेखक किंवा लेखिका आहात . तुमचं पहिलंच पुस्तक चांगलं झालंय . तुम्हाला मानधन मिळालंय . आणि प्रकाशक सांगतोय की आणखी काही लेखन करा , आपण तुमची सगळी पुस्तकं प्रकाशित करू . तर तुम्ही काय कराल ? हातातली सगळी कामं दूर ठेवून लेखनकामाठी करायला लागाल की चक्क लेखनसंन्यास घ्याल ? तेच तर सांगतोय ना […]

1 12 13 14 15 16 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..