ड्रेसिंग टेबल
ड्रेसिंग टेबल तयार करण्याआधी आपल्या कोणत्या वस्तू तिथे ठेवायच्या आहेत त्याची नीट यादी करावी. आज पुरुष, लहान मुलेदेखील फॅशनच्या बाबतीत विशेष जागरूक असतात. त्यामुळे घरातील किती व्यक्तींचे कोणकोणते सामान तिथे ठेवायचे आहे हे सुरुवातीस ठरवून घ्यावे. त्यानुसार वेगळे कप्पे, ड्रॉवर्स करता येतात. त्यामुळे वस्तूंची सरमिसळ होत नाही. स्त्रियांचे सेमी प्रेशियस दागिने ठेवण्यासाठी इथे एखादा बंद ज्याला लॉक आहे असा ड्रॉवरही करता येतो. […]
