स्वयंपाकघरातील वेळेचे नियोजन
ओट्याशी उभं राहिल्यावर स्वयंपाक करताना वेळेचे नियोजन करुन आपल्याला वेळ वाचविता येतो. हा वेळ वाचविला तो प्रत्यक्ष सा्वयंपाक करताना पण स्वयंपाक करायच्या आधी बरीच पूर्वतयारी करावी लागते. त्यासाठी देखील बराच वेळ जातो. सकाळच्या वेळी हा वेळ पूर्णपणे वाचवता आला तर? फारच सुखाचं होईल. स्वयंपाकापूर्वीची बरीचशी तयारी आदल्या दिवशी रात्री टी.व्ही. पाहाता पाहाता आपण सहजपणे करु शकतो. […]