दडपे पोहे

Dadape Pohe

साहित्य –

एक खवलेला नारळ
दोन पेले पातळ पोहे
मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर
एक बारीक चिरलेला कांदा
एका लिंबाचा रस
एक चमचा किसलेली कैरी
तीन चमचे साखर
चार हिरव्या मिरच्या
मोहरी
चिमूटभर हळद
हिंग
तेल
चवीपुरतं मीठ

कृती 

एक ओला नारळ फोडून त्यातील पाणी बाजूला काढावे. नारळ खवून घ्यावा. कांदा, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. एका लिंबाचा रस काढावा. हिरव्या मिरच्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करावे. कैरी किसून घ्यावी.

एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लिंबाचा रस, खवलेला नारळ, साखर, चवीपुरते मीठ,चमचाभर कैरीचा किस, नारळातील पाणी सर्व एकत्र करून सारखे करावे. ५ – १० मिनिटे तसेच झाकून ठेवावे.

छोट्या कढईत डावभर तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग आणि चिमूटभर हळद घालावी. मिरच्यांचे तुकडे घालून गॅस बंद करावा.

या मिश्रणात २ पेले पातळ पोहे घालून कालवावे. नंतर त्यावर तयार केलेली फोडणी घालावी. सर्व एकत्र कालवून अर्धा तास दडपून झाकून ठेवावे.

सर्व्ह करताना डिशमध्ये हे दडपे पोहे घालून वरून थोडी कोथिंबीर घालावी

 

— निलिमा प्रधान
९८२०३१०८३० 

Avatar
About सौ. निलीमा प्रधान 19 Articles
सौ. निलीमा प्रधान या खाद्यसंस्कृती, वास्तुशास्त्र आणि इतर अनेक विषयांवर लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…