नवीन लेखन...

डाएट पॅन – एक वरदान

Diet Pan A Blessing for Health

डाएट पॅन हा १८ – १० स्टिल पासून बनवलेला असतो. यात १८% क्रोमियम व १०% निकेल असते ज्यामुळे याचा पृष्ठभाग इतर स्टिल प्रमाणे सछिद्र नसतो तर तो एकसंघ (नॉनपोरस) असतो, त्यामुळे खाद्यपदार्थ या पॅनला सहसा चिकटत नाही.

या प्रकारच्या स्टिलला सर्जिकल स्टिलपण म्हणतात. हे अत्यंत उच्चदर्जाचे स्टिल असते. सर्व प्रगत देशांत याच स्टिलची भांडी वापरतात. इतर नॉनस्टिक भांड्याप्रमाणे याला टेफलॉनचे कोटींग नसते, त्यामुळे ही भांडी रोजच्या स्वयंपाकासाठी वापरता येतात. कारण नॉनस्टिक प्रमाणे या भांड्यांचे आयुष्य मर्यादित नसते.

डाएट पॅनचा तळ हा थर्मोइन कॅप्सुलेटेड असतो. यातील धातू उष्णता शोषून तो साठवून ठेवतो व आवश्यकतेप्रमाणे ती उष्णता आतील पदार्थांना समप्रमाणात पुरवली जाते. गॅस बंद केल्यावरही १० ते १५ मिनीटे पदार्थ शिजतो. गॅसची बचत तर होतेच व तेलाचा थेंबही न वापरता पदार्थ न करपता शिजतो.

डाएट पॅनचे झाकण हे टफनग्लास पासून बनवलेले असते. ज्यावर उष्णतेचा परिणाम होत नाही. झाकणाच्या विशिष्ट रचनेमुळे पदार्थ शिजताना निघालेल्या वाफेचे त्वरीत पाण्यात रूपांतर होवून ते पाणी परत त्या पदार्थावर पडून त्याच पाण्यात तो पदार्थ शिजतो व त्यामुळे पदार्थातील नैसर्गिक अन्नसत्वे, चव, रंग, सुवास कायम रहातात म्हणून डाएट पॅन मध्ये भाज्या, मटण, चिकन इत्यादी बाहेरील पाणी न वापरता पदार्थाच्या अंगच्या पाण्यात शिजवता येतात.

डाएट पॅन वापरताना घेण्याची काळजी

१) डाएट पॅन वापरताना गॅस नेहमी सिम ( कमी) ठेवावा, थर्मोइन कॅप्सुलेटेड बेसमूळे उष्णता सर्वत्र एकसारखी पसरते म्हणून गॅस सिमवर ठेवूनच स्वयंपाक करावा.

२) मोकळा पॅन १ मिनीटापेक्षा जास्त वेळ तापवू नये.

३) पॅनसाठी लाकडी उलाटनेच वापरावे

४) भांडी धुताना नायलॉन स्क्रबर वापरावा.

५) जास्त उष्णतेने एखादा पदार्थ पॅनला चिकटला असल्यास किंवा करपला असल्यास पॅन मध्ये पाणी टाकून थोडा तापवावा व ५ मिनीटे भिजू द्यावे नंतर स्क्रबरने घासावे.

६) पॅनला डागपडल्यास गरम पाण्यात व्हिनिगर/लिंबू टाकुन घासावे.

७) गरम पॅन लगेच सिंकखाली धुण्यास ठेवू नये

८) जे पदार्थ पॅनमध्ये झाकण लावून शिजवले जातात ते पदार्थ शिजत आले की गॅस बंद करावा व नंतर कमीत कमी १० मिनीटे झाकण काढू नये, नाहीतर बेसच्या उष्णतेवर शिजवण्याची क्रिया खंडित होते. पदार्थातील आद्रतेचे संतुलन बिघडते

भाज्या शिजवताना प्रथम त्या चिराव्यात, बटाटे साल काढून फोडी कराव्यात नंतर भाज्या धुवून पॅन मध्ये ठेवाव्यात, एकावेळेस दोन, तीन प्रकारच्या भाज्या शिजवता येतात पण पॅन अर्ध्यापेक्षा जास्त भरू नये. भाज्या पॅनमध्ये ठेवून मंद गॅसवर झाकण लावून १० ते १५ मिनीटे ( भाजीचा प्रकार व प्रमाणावर अवलंबून) शिजू द्यावे. नंतर गॅस बंद करून १० ते १५ मिनीटांनी झाकण उघडावे.

Avatar
About सौ. निलीमा प्रधान 21 Articles
सौ. निलीमा प्रधान या खाद्यसंस्कृती, वास्तुशास्त्र आणि इतर अनेक विषयांवर लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..