नवीन लेखन...

बेवड्याची डायरी – भाग ३ – सुटकेसाठी बैचैन

चहा घेऊन झाला तसे मी लघवी ला जाण्यासाठी उठलो तर एकदम अशक्तपणा जाणवला .. तो मघाचा मुलगा लगेच पुढे झाला आणि त्याने माझा हात धरला ..मला ते आवडले नाही ..मी काही लगेच पडणार नव्हतो .मी त्याच्या हातातून हात सोडवून घेतला आणि त्याल सांगितले मला बाथरूम ला जायचे आहे ..त्यावर त्याने सरळ कोपऱ्याकडे बोट दाखवले ..मी सावकाश तिकडे जाऊ लागलो तेव्हा आसपासचे बरेच लोक माझ्याकडे पाहत होते ..प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव ..परत आलो आणि पलंगावर बसलो ..समोरच्या भिंतीवर मोठे घड्याळ होते त्यात साडेपाच वाजले होते ..बापरे म्हणजे मी जवळ जवळ पाच तास झोपलो होतो तर .. ! तो तरुण मुलगा आज्ञाधारक भाव चेहऱ्यावर घेऊन उभाच होता माझ्या समोर त्याला विचारले की येथील प्रमुख कोण आहेत ? मला त्यांना भेटायचे आहे .यावर तो नुसताच हसला ..मग म्हणाला ..सर् दुपारी लंचसाठी घरी जातात आता येतीलच संध्याकाळी ..तुमचे काय काम आहे ? .याला कशाला सांगू मी माझे काम ? ..ते मी सरांनाच सांगीन म्हणत चूप बसलो ..

जरा वेळाने कोणीतरी म्हणाले की सर् आलेत बहुतेक ..मी लगेच सावध झालो आणि उठून बाहेरच्या दाराकडे जाऊ लागलो तर मला एकाने अडवले म्हणाला ..कुठे जाताय ..तिकडे ऑफिस मध्ये जाता येणार नाही तुम्हाला ..माझी सटकलीच .साला मी काय चोर बीर आहे की काय ? ..मला सरांना भेटायचे आहे असे म्हणत त्याला बाजूला करून मी पुन्हा दाराकडे निघालो ..बाहेर ऑफिसला जाण्याचे दार बंद होते मात्र त्या दाराला मध्यभागी ऐक चौकट होती व त्यातून बाहेरच्या लोकांशी बोलता येईल से वाटले मी जवळ जाऊन सर् ..अहो सर् ..जरा मला तुमच्याशी बोलायचे आहे असे ओरडलो .तसे वार्ड मधले एकदोन जण धावत आले आणि ते मला पुन्हा पलंगाकडे नेऊ लागले ..

माझा आवाज एकून बाहेरून दार उघडले गेले आणि बाहेरच्या माणसाने मला धरलेल्या लोकांना सांगितले ..सोडा त्याला ..सर् त्याला बोलवत आहेत ..

मी पटकन बाहेर आलो ..सकाळचाच तो माणूस बसला होता खुर्चीवर ..प्रसन्नपणे हसत म्हणाला ‘ बोला विजयभाऊ ? कसे वाटतेय आता ? .. मला अलकाला जरा फोन करायचा आहे मी त्याला म्हणालो तसे हसला ‘ अहो त्या जाऊन जेमतेम पाच तास झालेत आणि लगेच तुम्हाला त्यांची इतकी आठवण यायला लागली की काय ? ..त्या उद्या येणार आहेत तुम्हाला भेटायला ” ..नाही पण मला जरा तिला महत्वाचा निरोप द्यायचा आहे ..मी माझी मागणी पुढे रेटली .म्हणाला ..ऐक काम करा तुम्ही तुमचा निरोप माझ्याजवळ द्या , मी त्यांना पोचवतो ..त्याने मला निरुत्तर केले ..मग म्हणाला तुम्ही फक्त ऐक दिवस धीर धरा उद्या नक्की तुमची भेट घालून देतो पत्नीशी . मी ठीक आहे अश्या अर्थाने मान हलवली व मागे वळलो…

मला खरे तर खूप वाद घालायचा होता ..इथे मला तुम्ही उगाच अडकवून ठेवले आहे ..माझी अजिबात उपचार घेण्याची इच्छा नाहीय …माझ्या बायकोच्या बोलण्याला भुलून मी इथवर आलो ..नुसती माहिती घ्यायची होती तर तुम्ही लोकांनी मला गोडीगुलाबीने फॉर्मवर माझी सही घेवून येथे दाखल करून घेतले आहे ..दारू ही माझी समस्याच नाहीय ..उगाच का कोणी दारू पिते ?काहीतरी टेन्शन्स असतात ..प्रोब्लेम्स असतात ..तुम्ही तर मला एखादा रस्त्यावरचा दारुडा समजत आहात ..हे ठीक नाही ..उद्या माझ्या नोकरीचे नुकसान झाले तर कोण जवाबदार ? वगैरे खूप शब्द मनातच राहिले ..त्या ऑफिस मधील माणसाचा प्रसन्न अन हसतमुख चेहरा पाहून मला मनातले बोलताच आले नाही .शिवाय तो माझ्याशी ज्या आपुलकीने बोलत होता त्यामुळे देखील असावे मला काही वाकडे तिकडे बोलणे प्रशस्त वाटले नाही ..

ऑफिस मधून नाईलाजाने वार्डात परतलो , मात्र मन खूप बैचेन झाले होते , कुठून आपल्याला इथे येण्याची दुर्बुद्धी सुचली असे झाले होते ..अलकाचा रागही येऊ लागला होता मला ..जगात कितीतरी लोक दारू पितात ..मी प्यायलो तर काय बिघडले होते तिचे ? .. बर किमान सकाळपासून मला इथे सोडून गेलीय ..निदान एखादा फोन तरी करायला हवा होता तिने मला .. हळू हळू माझी बैचेनी वाढत होती सारखा बाहेरच्या दाराकडे लक्ष होते माझे …टर्रर्र्र्र्र्र अश्या कर्कश्य आवाजात ऐक बेल वाजली तसे सगळे जण हॉल मध्ये सतरंजीवर जाऊन बसले , एकाला विचारले काय आहे हा प्रकार तर म्हणाला ‘ प्राणायाम ‘ ची वेळ झालीय आता , ऐक तास प्राणायाम करायचा आहे सगळ्यांना .बापरे ..प्राणायाम वगैरे प्रकार मी फक्त ऐकून होतो ..कधी कधी अलका रामदेव बाबांचे प्राणायाम टी.व्ही वर पाहत असे हे माहित होते ..पण आपल्याला हे करावे लागणार या विचाराने माझी अवस्थता अजून वाढली . पुन्हा तो मघाचा चुणचुणीत तरुण माझ्या जवळ येऊन म्हणाला ..’ तुम्हाला तीन दिवस आराम करायचा आहे , मग बरे वाटले की प्राणायाम करावा लागेल ‘ . .मी मनात म्हणालो ‘ बेट्या राहणारच नाहीय मी तुमच्याकडे तीन दिवस ..आता उद्या अलका भेटायला आली की जातो मी घरी ” .

माझ्या शेजारी अजून ऐक जण गादीवर झोपला होता ..त्याची तब्येत बरी नव्हती म्हणून तो प्राणायाम करत नव्हता ..त्याला विचारले की तो इथे किती दिवसापासून आहे तर म्हणाला ‘ उद्या ऐक महिना पूर्ण होईल मला ‘ . इतके दिवस हा इथे कसा राहू शकला याचे कुतूहल वाटले तर म्हणाला ‘ पहेले पहेले जरा बहोत गुस्सा आता है सबको , लेकिन बादमे सब ठीक हो जाता है ‘ मी मनातून जरा हादरलो होतो ..पण मला खात्री होती की अलका उद्या मला भेटायला येईल तेव्हा नक्की माझी सुटी होईल .आणि सरांनीही मला तसेच सांगितले होते ..हे मी त्याला सांगितले त्यावर तो मोठ्याने हसला ..माझ्या अज्ञानाची त्याला गम्मत वाटली असावी म्हणाला ‘ ऐसे सबको बोलते है सर् , लेकिन ऐक बार अंदर एन्ट्री होने कें बाद ऐक महिना रहेनाही पडता है सबको ‘ त्याचे हे उद्गार माझ्या जखमेवर मीठ चोळणारे होते ..मी नुसताच बावचळून त्याच्याकडे पाहत राहिलो . बाहेर हॉल मधून सर्वांचा ‘ श्वास जोरात बाहेर सोडल्याचा आवाज येत होता .. तो म्हणाला ‘ कपालभाती ‘ कर रहे है सब लोग ‘ . मी पुन्हा उठून बाहेर दाराकडे जायला निघालो तर तो तरुण मला अडवण्यासाठीच बाहेर थांबला होता जणू ..लगेच त्याने मला अडवले व म्हणाला ‘ सर् आता कामात आहेत , तुम्हाला बाहेर जाता येणार नाही .त्याने जरा ताकदीनेच माझा दंड पकडून हलकेच दाबला होता ते जाणवले ,गुपचूप परत फिरलो न पलंगावर येऊन बसलो …

खिडकीतून बाहेर पहिले ..अंधार दाटून येत होता .. आता माझे सगळे मित्र जमले असतील बार मध्ये ..मस्त सगळे मजा करत असतील आणि मी ..इथे जेलमध्ये असल्यासारखा मध्येच अडकलो होतो ..छे ! काहीतरी केले पाहिजे इथून बाहेर पाडण्यासाठी ..ऐक महिना मला राहणे शक्यच नव्हते ..एकतर माझी तेव्हढी रजा शिल्लक नव्हती ..कितीतरी कामे बाकी होती ..विम्याचा हप्ता ..विजेचे बिल .. .वर मी मित्रांकडून उधार पैसे घेतले होते ते देखील परत करायचे होते ..मी पुन्हा उठू लागलो तसे बाजूच्या माणूस म्हणाला ‘ यार ,बार बार बाहर मत जाओ आप , फालतू में कोई आपको डाटेंगा ‘ पुन्हा बसलो नुसती चीड चीड होत होती माझी ..थोड्या वेळाने तो तरुण बहुधा वार्डचा प्रमुख असावा तो हातात चार गोळ्या आणि एका ग्लासात काहीतरी घेऊन आला ..’ हे घ्या औषध ..हे घेतले की बरे वाटेल तुम्हाला ‘ मी त्याला म्हणालो ‘आधी मला सरांना भेटू द्या ,मग घेईन औषध ‘ ‘ अहो सर् आताच बाहेर गेलेत , ते आले की नक्की भेट घ्या तुम्ही ‘ तो बोलण्यात हुशार होता खूप …पुढे म्हणाला ‘ विजयभाऊ , अहो हे औषध घेतले तर तुमची बैचेनी कमी होईल न भूक ही लागेल , सकाळी तुम्ही जेवला देखील नव्हता ‘ त्याचा सहानुभूतीचा स्वर ऐकून जरा बरा वाटले …..

त्याने दिलेल्या गोळ्या हातात घेऊन तोंडात टाकल्या आणि त्याच्या हातातील ग्लास घेतला तर हात पुन्हा थरथर कापू लागला तो थरथरत्या हात कडे पाहतोय हे लक्षात येताच मी जरा शरमलो . ग्लास तोंडाला लावला .. ते पाणी गोड लागले ‘ ग्लुकोज ‘ घातले आहे त्यात ‘ ..त्याने माहिती पुरवली …औषध घेऊन पुन्हा पलंगावर आडवा झालो आणि डोळे मिटले ..असं कसा मी मुर्ख असे विचार मनात येऊ लागले ..कुठून हिच्या नादी लागलो ..अन इथे आलो . ..माझे दारू पिण्याचे प्रमाण आता वाढले होते हे मलाही जाणवत होते पूर्वी आठवड्यातून एकदा शनिवारी घेणारा मी आता रोजच घेत होतो ..अन सुटी असली तर मग दुपारी देखील हुक्की येई … . पण म्हणून काही अगदी व्यसनमुक्ती केंद्रात येण्याइतका पीत नव्हतो मी ..आणि मी जर ठरवले असते तर येथे न येताच सोडू शकलो असतो की …पूर्वी दोन तीन वेळा मी अनेक दिवस पिणे बंद केले होतेच पुन्हा एकाने हाक मारली म्हणून डोळे उघडले तर ऐक दुसराच माणूस मला हाक मारत होता ..त्याच्या हातात अन्नाचे ताट होते ‘ जेवून घ्या थोडेसे ‘ तो आपुलकीने म्हणाला तसा उठून असलो फारशी भूक नव्हतीच मला पण सकाळपासून काही खाल्ले नव्हते म्हणून जेवू लागलो थोडासा वरणभात खाल्ला …पोळी भाजीला हात लावला नाही .. त्या माणसाने आग्रह केला म्हणून ऐक पोळी खाल्ली . प्रार्थनेचा आवाज ऐकू आला सामुहिक प्रार्थना सुरु होती ..बहुतेक प्राणायाम संपला होता .तो सकाळचा मिस्कील म्हातारा पुन्हा माझ्या जवळ आला ‘ काय कसे वाटतेय ‘ त्याचा स्वर कुत्सित होता हे जाणवले मला .त्याच्याशी न बोलणेच शहाणपणाचे आहे असे वाटले ..नुसता ठीक आहे अश्या अर्थाने मान हलवली . आणि पुन्हा पलंगावर डोळे मिटून पडलो .

( बाकी पुढील भागात )

” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५

( माझ्या ‘ बेवड्याची डायरी ” या लेखमालेत मी आमच्या ‘ मैत्री व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद ‘ नागपूर ..येथे कसे वातावरण असते ..काय काय घडते …कशा गमती जमती तसेच गंभीर घटना घडतात ..याबाबत लिहिले आहे. यातील विजय हे व्यसनी पात्र काल्पनिक आहे ..हा विजय आमच्या केंद्रात उपचारांना दाखल झाल्यावर काय काय होते ते त्याने इथे डायरीद्वारे सांगितलेय ..यातील माॅनीटर म्हणजे आमचा निवासी कार्यकर्ता आहे ..तर ‘ सर ‘ असा जो उल्लेख आहे तो …तुषार नातू व रवी पाध्ये या प्रमुख समुपदेशकांसाठी आहे याची दखल घ्यावी .)

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..