नवीन लेखन...

‘टेक इट ईझी’ पॉलिसी (माझी लंडनवारी – 34)

पुढचं लंडनचं फ्लाईट टर्मिनल 2 वरून होत. तिथे जाऊनच फिरत बसावं असा विचार केला आणि टर्मिनल2 च्या दिशेने पुढे चालत होते. वाव! पुढचा प्रवास स्काय लाईनने करायचा होता. मस्त मजा येईल, अस म्हणत त्या छोट्या गाडीत बसले. मगाशी पाहिलेल्या त्या ट्रेनच्या खेळाचा आता मी हिस्सा झाले होते. ट्रेन एअर पोर्ट बिल्डिंगच्या बाहेर आली आणि खाली छोटी वाटणारी खूप प्लेनस् दिसली. थोड्या लांबवर काही प्लेनस् टॅक्सी वे न मिळाल्यामुळे लांबवर उभी असलेली दिसली. तिथंच कुठे तरी आमचं प्लेन असेल. खेळातली वाटावी अशी भरपूर प्लॅन्स हरखून बघत होते, तेवढ्यात टर्मिनल 2 आलं पण! जेमतेम 4-5 मिनिटांचा प्रवास. परत एक राऊंड घ्यावीशी वाटली पण आता माझ थंडी भरण्याच प्रमाण वाढायला लागलं. आधी गेट शोधून तिथल्या फूड आउटलेट मध्ये गरम गरम कॉफी घेतली आणि सँडविच घेतलं. थोड पोटात गेल्यावर जरा एनर्जी आल्यासारखं वाटलं. मग तिथल्या दुकानांमधून विंडो शॉपिंग केलं. बरिचशी दुकाने तिथल्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीने बनलेल्या नविन इलेकट्रॉनिक अप्लायंसेस आणि मोबाईलस् ची होती. हे बघता बघता मला जाणवलं की आपले पाय खूप दुखत आहेत आणि डोळ्यांची आग आग होत आहे. डोकं तर दुखतच होत. ही तर तापाची लक्षणे…

मुकाट्याने फिरणं आटोपते घेवून गेटवर येऊन बसले. तिथे लाँग रिलॅक्सिंग चेअर्स होत्या. फारशी लोकं नव्हती. सॅक डोक्याशी घेऊन आणि जॅकेट पांघरून पडून राहिले. तिथे अजून 3-4 लोक आरामात झोपली होती. त्यामुळे मलाही ऑकवर्ड झाले नाही. एक डुलकी काढल्यावर जरा बरे वाटले. पण अंगात कसं-कसं होतीच. माझ्याकडे क्रोसिन होती पण घरी जाऊनच घेऊयात असा विचार करून थांबायचं ठरवलं. प्रवास जेमतेम दीड-एक तासाचा होता. गेटवर रिक्वेस्ट करून बोर्डिंग सुरू झाल्या झाल्या प्लेन मध्ये जाऊन बसले. नशिबाने खिडकी मिळाली होती. आणि विशेष गर्दी पण नव्हती. गेल्या गेल्या एअर होस्टेस कडून ब्लँकेट मागून घेतले आणि झोपून गेले.त्यानंतर बोर्डिंग, टेक ऑफ, प्रवास काही कळलं नाही. डायरेक्ट लँडिंगच्या वेळेस जाग आली. कसं-कसं आणि डोके दुःखी होतीच. ह्यावेळेस खिडकी बाहेर बघितलं नाही आणि काही नाही. डोळे मिटून शांत पडून राहिले होते.

अशक्तपणा वाटत असल्यामुळे मी आरामात चालत ईमिग्रेशन काउंटरला पोहचले. पण मागच्या वेळेसारखे खूप चालणे नव्हते आणि ईमिग्रेशनची लाईनपण जास्त  नव्हती. देवच पावला! बाहेर येऊन टॅक्सी केली. आणि डायरेक्ट सडबरी टाऊनला गेले. शेजारी काकू असाव्यात असे वाटले. पण त्याही नेमक्या नव्हत्या. त्यांच्या केअर टेकरकडून किल्ली घेतली. घरी येऊन शूज न काढता सोफ्यावर आडवी झाले. तोपर्यंत लंडनचे दुपारचे 2 वाजले होते आणि पोटात कावळे ओरडत होते. उठायची अजिबात इच्छा नव्हती पण काही तरी पोटात ढकलून गोळी तर घ्यावीच लागणार होती. काय करावं काही सुचत नव्हत. फ्रिजमधे दूधसुद्धा नव्हतं. इतका रिकामा कसा काय फ्रिज? असो. मला ऊठून काही तरी करणे भाग होते.

मी तिथे सगळं मिळतं, काही फूड आयटेम्स नको अशी फुशारकी मारुन निम्म्या गोष्टी कमी केल्या होत्या. तेवढ्यात दिदीने मला रेडी टू इटचे चित्रान्नाचे काही पॅकेटस् दिले होते, ते आठवले. पाणी आणि ते एकत्र करुन १५ मिनिटे ऊकळायचे की भात तयार! मी उठून तो भात बनवला. पण जास्त गेलाच नाही. चार घास खाऊन, गोळी घेतली. जवळ जवळ 101 ताप भरला होता तोपर्यंत. गोळी घेऊन वरती जाऊन जी झोपले, ते डायरेक्ट 5.30 – 6 ला उमेश आला तेंव्हाच उठले. आता ताप उतरला होता. पण सर्दी खोकला सुरू झाला होता आणि त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाऊ शकले नाही.

संध्याकाळी ऊमेश येताना सगळं सामान घेऊन आला होता. आल्या आल्या त्याने मस्त आल्याचा चहा बनवून दिला मला. काहीच कसं काय नाही फ्रिजमधे? असं मी जरा नाराजीमधेच विचारलं त्याला. ‘आणि प्रिया कुठे आहे’?  मला असं कळलं की प्रियाला एक आठवडा आधीच परत पाठवल आणि तो आता एकटाच असल्यामुळे हॅरोला संतोषकडेच रहात होता. प्रियाला एअर पोर्टवर सोडून तो संतोषकडे गेला होता आणि मी मंगळवारी येणार म्हणून तो आज इकडे आला  होता. आणि येताना सगळं सामान घेऊन आला. त्याला काय कल्पना असणार ना मला असा ताप येईल अशी. ऊगीच मगाशी चिडले मी! त्या रात्री सगळ जेवण ऊमेशनेच बनवलं. ईतकचं नाही तर तो कट्टर सोवळा शाकाहारी असून परत बाहेर जाऊन माझ्यासाठी अंडी घेऊन आला आणि स्वत: ऊकडून/सोलून मला दिली. मगाशी मी त्याच्यावर मनातल्या मनात चिडल्याच खूप वाईट वाटलं. नाण्याला दोनबाजू असतात. दूसरी ऐकून न घेताच मत बनवणं किती चुकीचं असतं, हे प्रर्कषाने जाणवले.

एकूणच, केअरलेस आणि कॅज्युअल ऍटिट्युडचा चांगलाच धडा मिळाला होता मला!

— यशश्री पाटील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..