नवीन लेखन...

लंडन आपलंसं होताना (माझी लंडनवारी – 16)

आज सोमवार (2 Aug 2004).. मी जरा लवकरच ऑफीस मध्ये गेले. माझं राहण्याच भवितव्य आज ठरणार होत. ऑफीस मधे पोचल्या पोचल्या मेल्स चेक केल्या. मला हवी होती ती मेल आली होती. अजून २ आठवडे मी RCA मध्येच रहावे असे त्यात नमूद केले होते. चला आता officially, मी रूम बुक करू शकते. लगेच RCA ला फोन लावला. Receptionist आत्तापर्यंत ओळखीचा झाला होता. त्याला मला परत ३०५ रूम ब्लॉक करायला सांगितली. आणि संध्याकाळी मी परत माझ्या रूम मध्ये होते. त्याच्याशी बोलून उमेशची पण रूम चेंज करून घेतली. एक तर ती आधीची रूम सेकंड फ्लोअरला होती आणि फारच लहान होती. आता २ आठवडे तरी आम्ही सगळे एकाच फ्लोअर वर होतो.
परत रेग्युलरऑफीस रूटीन चालू झाले. एक दिवस इथे मोठा पाऊस पडला. मुंबईच्या मनाने टीचभर! तस लंडनला पाऊस नवीन नाही.आधे मध्ये भुरू भूरू पडत असतो. पण ही थोडी मोठी सर होती. वातावरण एकदम बदललं. थंड झाल. सगळ ऑफीस टेरेस मध्ये थंडीला वेलकम करायला आणि पाऊस बघायला. खूपच मज्जा वाटली. Then we exchanged few words with our colleagues on Mumbai rains..

मधेच एक दिवस आम्ही लंच करून ग्रीनपार्कला फिरायला गेलो. त्या थंड वातावरणात गवतावर खाली बसलो आणि चक्क थंडी वाजली. आजुबाजुला फुलांचे ताटवे, हिरवळ, रांगेने लावलेले आणि लंडनच्या शिस्तीत वाढलेले डेरेदार वृक्ष. मध्ये मध्ये बसण्यासाठी ठेवलेले बंचेस. किती सुख डोळ्यांना…

आम्ही ग्रीन पार्क पासून पुढे बकिंगहॅम पॅलेसला गेलो. तो पूर्ण रस्ता दोन्ही बाजूला दाट वृक्षराजी, जस काही आमच्यावर छत्र चामर ढाळत होती. रस्त्यावर पानांचा आणि रंगीबिरंगी फुलांचा सडा पायघड्या घालून आमचे स्वागत करीत होती. समोर पॅलेसच काळ मोठ्ठं गेट होत, ज्यावर सोनेरी रंगात पॅलेसचा सिम्बॉल होता. पूर्ण दृश्य पाहून मला कॉम्प्युटरवर असणाऱ्या सेनिक स्क्रीन सेव्हरची आठवण झाली. तिथे इतके सुंदर व्ह्यूज् असतात. इथूनच उचलला असेल तो व्ह्यू. गेट जवळ पोहचलो तेंव्हा Change of Guards चालू होते. एका बाजूने duty संपणाऱ्या गार्ड्सचा ताफा कवायत करत येत होता,दुसऱ्या बाजूने duty resume करणाऱ्या guards चा ताफा मारचींग करत येत होता. इतकी लयबध्द, शिस्तबध्द, एकसारखी हालचाल होती, एखादा पिक्चर बघतोय असेच वाटत होते. त्यांच्या hand over formalities चालू होत्या. आम्हाला ऑफीस मधे पोहचायला उशीर होत होता म्हणून आम्ही तसेच माघारी आलो.

आमचं विकेंडच प्लॅनिंग सुरू झालं. ह्या वीकेंडला आधी लांबचे स्पॉट्स बघून येवूयात, असे ठरले. माझ्याकडे आता मोजून ३ पूर्ण विकेंड आणि लास्ट विकेंडचा शनिवार असे ७ दिवस साईट सिईंगसाठी उरले होते. येणाऱ्या वीक इंडला लॉर्ड्स आणि विम्बल्डन बघुयात असे ठरले.

मी बिझनेस व्हिसावर आले होते आणि इतरांप्रमाणेच ७ आठवड्यांनी परत जावून work permit वर परत यायचे होते. पण ते अजून official नव्हते. Who knows next? म्हणून मी माझ्याकडे सुट्टीचे सात दिवसच आहेत असे धरून चालले होते.

आम्ही त्याप्रमाणे प्लॅनिंग करत होतो. आमच्या लिस्ट मध्ये लॉर्ड्स, विम्बल्डन, ब्रिटिश म्युझियम, मादाम तुसाद वॅक्स म्युझियम, Trafulgar Square, Bond Street, Regent’s Park, ग्रिनिवीच Mean Meridian Line… बाप रे! केवढी मोठी लिस्ट होती. केलं काय ४ आठवडे मी?

आता ह्या वीकेंडला जास्तीत जास्त प्लेसेस कव्हर करूयात असे ठरवून आम्ही वीकेंडची वाट पाहू लागलो.
उद्या सकाळी लवकर उठून विम्बल्डनला जावूया असे ठरले. विम्बल्डनला एक गणपती मंदिर आहे आणि सेंटर कोर्ट. आणि दोन्ही साठी खूप चालायला लागते. एक पूर्ण दिवस त्यात जाईल, म्हणून शनिवार दिवस तिथे घालवायचा ठरवले आणि मग जसा वेळ आणि उत्साह असेल त्याप्रमाणे झोन १ मध्ये येवून Trafulgar Square, बाँड स्ट्रीट, Piccadilly circle अशा छोट्या गोष्टी बघुयात असे ठरले. रविवारी ब्रिटिश म्युझियम, लॉर्ड्स किंवा मादाम तुसाद म्युझियम असे ठरले.

वा! मस्त प्लॅनिंग करून आम्ही लवकर झोपलो. मागच्या शनिवारी जागरण आणि नंतरचे मेंटल टेन्शन हा अनुभव लक्षात ठेवून ह्या शुक्रवारी लवकर झोपलो.

शनिवार सकाळ आठ-साडेआठ ची वेळ. परत रूम मधला फोन खणाणला. दचकून उठले आणि आता काय नवीन वाढून ठेवलंय पुढ्यात असा विचार करून धडपडत फोन उचलला.

समोरून शैलेशचा आवाज ऐकून हुश्श केलं. पण ते क्षणभंगुर होत. त्याने फोनवर जे सांगितलं, त्याने मी दोन मिनिट बधिरच झाले. मी काय करायचं मला काही सुधरलंच नाही.

माझी नणंद, शैलेशच्या मामाची मुलगी – प्रियांका, जी आमाच्याहून ८-१० वर्षे लहान होती,ती कुठल्या तरी एनसीसी ग्रुप बरोबर लंडनला आली होती ५-६ दिवसांसाठी. आणि काल रात्री परत जाणार होती. आयत्या वेळेस तिचा पासपोर्ट मिळालाच नाही, बाकी ग्रुपचा नाईलाज होता. ते निघून गेले. ही check-in काउंटरवर रडत उभी होती. Luckily, त्या काउंटरवर एक इंडियन लेडी होती. तिने तिची अडचण समजावून घेवून तिला २ तास तिथेच थांबायला लावले.मग तिची ड्युटी संपल्यावर प्रियांकाला घेवून ती घरी गेली. सोमवारी Indian Consulate उघडल्यावर Travel Document बनवून मग तू इंडियाला जा, असे तिने सांगितले.

तिकडे मामांचा शैलेशला फोन, अरे, असं झालंय. यशा तिकडे आहे ना अजून. तिला सांग, प्रियांकाला तिच्याबरोबर घेवून यायला. त्यांचा जीव वरखाली. अनोळखी घरात ती राहत आहे, कशी असतील लोकं?

हे सगळं ऐकून मी जरा सुन्नच झाले. काय काय होवू शकत ??……

मग मी शैलेश कडून पत्ता आणि फोन नंबर घेतला. ते Tooting Bec ला रहात होते. पटकन तयार होवून उमेशला सगळं सांगून निघाले. आता मी एक्स्पर्ट झाले होते.कुठल्या लाईन ने जायचे,कुठे चेंज करायचे बघून घेतले आणि ९.३० ला मी बाहेर पडले. सेंट्रल आणि नोर्दन लाईन असं करत मी तासाभरात Tooting Bec ला पोचले. एक 10 मिनिटे वॉक करून त्यांच्या घरी गेले.

आमची राम-भरत भेट झाली. त्या फॅमिलीशी ओळख झाली. खूप चांगली लोकं होती ती! मी गेल्यावर माझंही चांगलं अगत्य केलं. तिथूनच मामांना फोन लावला. मी तिथे पोहचले आणि प्रियांकाला इंडियाच्या प्लेनसाठी सी- ऑफ करेपर्यंत मी तिच्याबरोबर असेन ह्याची खात्री त्यांना पटली आणि त्यांच्या जीवात जीव आला.

आता पुढे काय? ती परत कशी जाणार? अशी चौकशी करता, मि. पटेल म्हणाले, आज तर Embassy बंद असेल. पण मी तुम्हाला ती कुठे आहे दाखवतो. मग तुम्ही सोमवारी परत जा तिथे आणि ते सांगतील तसा फॉर्म भरा. पुढच्या सूचना ते देतील तुम्हाला.

त्यांची गाडी एकदम मूव्हीमधे दाखवतात तशी परपल कलरची स्पोर्ट कार होती. मग आम्ही प्रियांकाचे सामान घेवून मि. पटेल ह्यांच्या बरोबर त्यांच्या गाडीतून Indian Consulate ला आलो. ते बंदच होत, पण आम्हाला लोकेशन तरी कळल. त्यांचे परत एकदा आभार मानून आम्ही RCA चा रस्ता धरला.

लंडन शहर मुळातच सुंदर होते, मी तिथल्या वातावरणाच्या, पार्क्सच्या, शिस्तप्रिय वागणुकीच्या प्रेमात पडले होते. परक्या देशात एका अडचणीत सापडलेल्या मुलीला मदत करून लंडन शहराने अजूनच आपलंसं बनवलं.

काही आठड्यांपूर्वी मी अशीच एकटी Padington ला उतरले होते आणि मला माझ्या ग्रुपचा आधार मिळाला होता. आता मी कोणाचं तरी आधार बनू शकले, इतकी मी लंडनची आणि लंडन आपलंसं झालं होतं.

— यशश्री पाटील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..