नवीन लेखन...

सिमेपलिकडची खवय्येगिरी! (माझी लंडनवारी – 22 )

प्रियांका सुखरूप भारतात पोहचली असा दुसऱ्या दिवशी सकाळी शैलेशचा निरोप मिळाला आणि टेन्शन, thrilled, exciting अनुभव देवून एक पर्व संपले.

आता नेहमीसारखे ऑफिसला जावून कामामध्ये जुंपले. मार्टिनने प्रियांकाची चौकशी करून त्याच्या सह्रदयतेची झलक दाखवली. खरंच किती caring माणसे भेटली मला पावला-पावलावर! माझ्या शेजारी Allan बसायचा. तो तर नेहमीच काही ना काही खाऊ आणून आम्हाला देत होता. कधी चॉकलेट्स, कधी प्रिंगल्स, कधी क्रोशंट. तो लंचसाठी बाहेरून सलाड्स, बर्गर काही तरी आणायचा स्वतःसाठी आणि आम्हाला काही ना काही ऑफर करायचा. आपले इंडियन पदार्थ त्याच्या पोटात जायचे. किती आवडत होते कोण जाणे? पण तो ते एन्जॉय करत असावा. एकदा दुधाची एक्सपायरी डेट जवळ येत चालली होती आणि बरच दूध राहिला होत. तर मी त्याची चक्क आटवून बासुंदी केली. आणि दुसऱ्या दिवशी ती ऑफिसमध्ये नेली. Allan ला ती इतकी आवडली, त्याने मिटक्या मारत संपवली. अर्थात त्या आटीव दुधाला साय नव्हती. त्यामुळे बासुंदी खाण्याची मजा, ती पिण्यात नसते हे त्याला कुठून कळणार?

ऑफिस मध्ये बऱ्यापैकी ओळखी व्हायला लागल्या होत्या. बाहेर कॉफी काउंटरवर थोडे संभाषण होत होते. तस ब्रिटिश लोक कोणाच्या खाजगी आयुष्यात जास्त डोकावत नाहीत. नाही स्वतःच्या आयुष्यात कोणाला डोकावूं देतात. पण प्रत्येकाच्या डेस्क वर फॅमिली फोटो आणि त्यांचे गार्डन ह्याचे फोटोज् आवर्जून असतात आणि खूप अभिमानाने त्यांचे गार्डन ते दाखवतात. असच एकदा गप्पा मारताना किंवा फोटो बघताना आमचा प्रोजेक्ट लीडर मला म्हणाला, तुमच्या कडे barbeque आहे का? काय उत्तर देणार? मनात म्हटलं आमच्याकडे फ्लॅटच इतके लहान असतात,कसलं गार्डन आणि कसलं barbeque? माझं नाही उत्तर ऐकून त्याने मला त्याच्या घरी barbeque party ला बोलावले. पण तेंव्हा मी इतकी कंफर्टेबल नव्हते म्हणा किंवा त्याच्याशी जास्त दोस्ती झाली नव्हती, मी ते नाकारलं. बोलताना इतक्या blunt पणे मी नकार दिला. मग माझं मलाच जाणवलं, मी थोडं नम्रपणे बोलू शकले असते. एस्पेशली ब्रिटनच्या सौजन्यपूर्ण पार्श्वभूमीवर ते ठळकपणे मला जाणवले. खर तर त्याने खूप चांगल्या हेतुने बोलावलं होतं. पण बोलावण अनपेक्षित असल्यामुळे ते पचनी नाही पडलं. म्हणून माझी अशी प्रतिक्रिया गेली असावी.

आणि आज अचानक अजून एक धक्का मेलच्या रूपाने माझ्या मेल बॉक्सवर येवून आदळला. पण हा सुखद धक्का होता. शनिवारी म्हणजे 14 ऑगस्टला एक मुलगी आमचं प्रोजेक्ट जॉईन करणार होती आणि ती माझ्याच flight ने लंडनला येवून मला किंवा उमेशला तिला Paddington स्टेशनवर घ्यायला जायचं होतं.

वा! Finally a girl in the group!!… तसा मला काही त्रास नव्हता. कारण मी बेसिकली मोकळ्या आणि ओपन minded लोकांमध्ये irrespective of gender आरामात वावरू शकते.तरी पण एक मुलगी येणार म्हणजे आपल्याला कंपनी मिळणार असा विचार मनात डोकावला.

तिचं नाव प्रिया होतं. आधी प्रियांका, आता प्रिया पुढच्या विक एंडला कोण प्रियदर्शिनी का? का प्रियांचे दर्शन? (भारतात जाण्याचे दिवस जवळ येत चालले असल्याची लक्षणे)

झालं! आता तर आम्ही वीकेंडचा काहीच प्लॅन ठरवला नाही. उद्या सकाळी बघुयात, अस ठरवून आज जरा गाण्याच्या भेंड्या, पत्ते खेळलो. परत एकदा जावून हाइड पार्कचा चंद्रमा बघून आलो. त्यानेही आम्हाला निराश नाही केले. ह्यावेळेस तर सुरेख नाजूक चंद्रकोर झडाआडून हळूच डोकावून बघत होती.

घरी आल्यावर चंद्राला साक्षी मानून सगळी चंद्रावरची मराठी, हिंदी गाणी म्हटली. नशीब आजूबाजूच्या कोणी कंप्लेंट नाही केली, नाही तर आम्हालाही चंद्रसारख तोंड लपवाव लागलं असतं. ती चंद्रकोर आता डोळ्यात उतरली होती आणि मी निद्रेच्या आधीन झाले.

— यशश्री पाटील

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..