नवीन लेखन...

अपूर्वाईचा पूर्वरंग – 1 (माझी लंडनवारी – 4)

10 जुलै 2004  (शनिवार)

इतके दिवस, या दिवशी  तू अमुक ठिकाणी असशील या गप्पांवरुनआता तू उद्या प्लेन मध्ये असशील यावर आलं. घोडा मैदान जवळ येत चाललं. सकाळी सकाळी देव दर्शन होऊन माझं सगळं सामान घेऊन मी, शैलेश आणि मम्मी निघालो. तुफान पाऊस सुरु झाला. अशा पावसात भिजायला किती मजा येते. लंडनमध्ये तर असा पाऊस मला मिळणं कठीण होतं आणि परत येईपर्यंत पावसाळा संपण्याची चिन्हे होती. पण पावसात भिजल्या पेक्षा पुढच्या कामांची यादी माझ्याकडे मोठी होती. मग गाडी सुचेतात ठेवून मी आणि शैलेश खरेदीला बाहेर पडलो. थोडेफार राहिलेले शॉपिंग कम्प्लिट केले. परत सुचेतात येईपर्यंत सौ आरती मामी आणि प्राजक्ता आले होते. माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही. डॅडींनी पुण्याहून अचानक येऊन खूप सुखद धक्का दिला. मग गप्पा मारत हसत खेळत जेवणे झाली. आता फायनल पॅकिंग सुरू झाले. बॅग चारवेळा भरुन पाचवेळा रिकामी झाली. प्रत्येक वेळेला वजन केल्यावर 2-4 गोष्टी कमी होऊ लागल्या. बॅगेत स्वयंपाकाला लागणारे सर्व सामान अगदी कुकर, पोळपाट लाटणे, भांडी , एक जणला लागणारे सर्व किराणा पासून माझं मेडिकल, कपडे असं सगळंच घेतलं होतं. कारण हॉटेलवर जेवण करण्याची सोय होती. शैलेश ने त्यातच धावपळ करून पोर्टेबल सीडी प्लेयर आणला.मला तिकडे काहीतरी टाईमपास म्हणून.

फायनली, आठ साडे आठला बॅग पॅकिंग झालं. मग सावकाश जेवणे गप्पा झाल्या आणि बारा वाजता झोपलो. मला अजूनही खरं वाटत नव्हतं की मी खरंच उद्या जाणार आहे!! माझं खूप वर्षांपासून जपलेले स्वप्न उद्या पूर्ण होणार होतं. खूप लहानपणापासून मला लंडनला जायची इच्छा होती आणि नुसते ट्रीप म्हणून फिरायला जायचे नव्हते तर तिथे जाऊन मला काम करायचे होते. असो! आता ते स्वप्न लवकरच पूर्ण होणार होते.

गादीवर पाठ टेकल्यावर माझ्या आता लक्षात यायला लागलं की, तिथे जाऊन मला काम करायचे आहे!! मग मनात अनेक शंका यायला लागल्या, मी तिकडे जाऊन काम करू शकेन ना?  तिथले काम, वातावारण मला जमेल ना? देवावर हवाला ठेवून मी झोपले.

11 जुलै 2004  (रविवार)

आणि तो दिवस उजाडला!

सकाळी चार वाजता उठलो. सर्व जण पटापट आवरून तयार झाले. सर्वांना नमस्कार करून निघाले. निघताना सर्वांचेच डोळे पाणावले.  दीड महिन्याचा काळ पटकन जाईल, असे एकमेकांना समजावत होतो.

मला एअरपोर्टवर सोडायला शैलेश, आई, बाबा,  मम्मी , डॅडीं, मावशी व आरती मामी अशी सर्व मंडळी आली होती. तिकडे एअरपोर्टवर अरुण काका व संध्या काकू यांनी अचानक येऊन आम्हाला सुखद धक्का दिला. शैलेश चा मित्र, मयुरेश पार्ल्याला राहतो तो ही यशाला सोडायला म्हणून एअरपोर्टवर आला.  मला हे  प्लेझंट सरप्राईज होते. आम्ही सर्वजण बाहेर कॉफी घेत असतानाच तिकडे मुकुंद( शैलेश चा मावस भाऊ) आला. तो एअर इंडिया मध्ये पायलट आहे. तो आला, त्यामुळे मला खूपच आधार मिळाला. त्याने मला आधीच कबूल केलं होतं की, तो मला प्लेन मध्ये बसवून देईल. त्या प्रमाणे प्लेनच्या दारापर्यंत तो माझ्यासोबत होता. सरतेशेवटी, सर्वांचा निरोप घेऊन मी चेक इन काउंटर कडे गेले मुकुंद ही बरोबर होता. त्याच्याबरोबर बोलण्याच्या नादात मी एकटीच आहे ही बोच जरा कमी झाली. इमिग्रेशन चेक करून परत सर्वांना भेटायला बाहेर आले. आता सर्वांना मी परत दीड महिन्यांनी भेटणार होते. निरोप घेताना सर्वांनी जरा वाईट वाटत होतं.

पण पहिल्या विमान प्रवासाची उत्सुकता, लंडनला जाण्याची ओढ यामुळे मनाला एक दिलासा होता. मग आम्ही सिक्युरिटी चेक केलं आणि गेटवर जाऊन पुढच्या अनाउन्समेंट ची वाट बघत बसलो. फायनली बोर्डिंग अनाउन्समेंट झाली आणि मी घाई घाई जायला निघाले. परंतु मुकुंद मला थांबवून म्हणाला, तिथे जाऊन लाईनीत उभा राहण्यापेक्षा शांतपणे बस. सगळ्यात शेवटी आत जा म्हणजे बॅग घेऊन तुला जास्त वेळ उभे राहिला नको. तुला घेतल्याशिवाय विमान काही जात नाही.

सिक्युरिटी गेट पाशी बसलो असताना माझ्या मनाची घालमेल मुकुंदला जाणवत होती. त्याने मला प्लेनचे मेकॅनिझम समजावून सांगितले. प्लेन मध्ये 5 फ्लांईंग मेकॅनिझम असतात. एक जरी खराब झालं तरी स्टँड बाय म्हणून इतर चार असतात. प्लस ऑटो पायलट मोड असतो. त्यामुळे पायलट ला काही झालं तरी प्लेन चालू शकत. त्यामुळे तू विमानाची भीती मनातून काढून टाक, असे त्याने समजावले आणि विमानात शिरण्याच्या दोन मिनिट आधी त्याने शैलेश ला फोन लावला. फोनवर शैलेश शी बोलताना आवरुन ठेवलेले अश्रू गालावर ओघऴलेच. परत मुकुंदने धीर दिला. अग, दीड महिना आत्ता जाईल. आणि तू ब्रेव्ह आहेस. एकटी जात आहेस. चिअर अप!! मग शैलेशला सी ऑफ करून फोन बंद केला.

फायनली, मुकुंदला ही अच्छा करून माझी एक बॅग आणि खांद्यावर एक सॅक घेऊन मी प्लेन मध्ये पाय ठेवला.  आयुष्यात पहिल्यांदा विमानात शिरत होते!! ज्या क्षणाची उत्सुकतेने वाट बघत होते, तो आता आला.

आतून प्लेन तर एकदम मस्त होते. एअर होस्टेस ने हसून स्वागत केले. त्यांनी बिस्किट ब्राऊन कलर ची युनिफॉर्म आणि रेड कॅप घातली होती. त्यांच्या गोऱ्या स्किनला ते छान मॅच होत होते. रेड कॅप मधून राईट साईडने एक जाळीदार, मखमली, सोनेरी स्कार्फ चा पट्टा मागे पाठीवर होता. या गेटप मुळे त्या प्लेनच्या क्वीन वाटत होत्या.विमानातील आतल्या बाजूचा रंग, सीट सर्व बिस्किट कलर ला मॅच होत होते. सर्वत्र उत्तम रंगसंगती साधली होती. अमिराती नावाला साजेशी आहे हे जाणवले. जागा शोधत सीट जवळ आले. मला विंडो सीट होती पण पंखावरचे. तरीही जरा पुढे मागे होऊन बाहेरचे दिसत होते.  माझ्या शेजारच्या सीटवर एक माणूस आधीच बसला होता. चेहऱ्यावरून सभ्य वाटत होता. मनात सुटकेचा निश्वास टाकला. गप्पा मारू अथवा ना मारो, त्रास तरी काही होणार नाही. त्याने उठून मला बॅग ठेवायला मदत केली. मी सीटवर बसल्यावर मला बेल्टची एक बाजू सापडेना. त्या माणसाने लगेच मला दुसरी बाजू शोधून दिली आणि बेल्ट कसा लावायचा हे दाखवले. मी सहज विचारले, दुबई का? तर तो म्हणाला नाही, लंडनला जाणार आहे. मग मी त्याला फ्लाईट डिटेल्स विचारले. तर तो माझ्याच फ्लाईट ने  लंडनला जाणार होता. मग मी त्याला म्हटले, मी याच फ्लाईट ने लंडनला जाणार आहे. मग आमचा संवाद सुरू झाला. त्याने विचारले, तू एकटीच आहेस का? आणि पहिल्यांदाच जात आहेस का? मी उत्तर दिले, हो! मी एकटीच आहे आणि विमानात बसायची माझी पहिलीच वेळ आहे.  त्याच्या चेहर्‍यावर एक मोठे विस्मय चिन्ह उमटलेले मला दिसले.

मग त्याने मला स्वतःहून प्लेन मधल्या सगळ्या फॅसिलिटीज दाखवून दिल्या. हेडफोन कसे लावावेत, एअर होस्टेसला बोलवण्यासाठी कुठले बटन दाबायचे,  लाईटस् आणि एअर ड्राफ्ट कसा एडजस्ट करायचा. समोर टीव्ही स्क्रीन होता. त्याचा रिमोट कसा ऑपरेट करायचा, असे सर्व छोटे-मोठे बारकावे त्याने समजावून सांगितले .मी त्याचे आभार मानून टी.व्ही.चॅनेल्स सर्फ करत राहीले. टीव्हीवर वेगवेगळे ऑडिओ आणि व्हिडिओ चॅनल होते. ऑडीओ चॅनल्स मध्ये अरेबिक, पॉप, सायलेंट हिंदी गझल्स असे वेगवेगळे जनोर होते. व्हिडिओमध्ये ही स्पोर्ट्स, डिस्कवरी, न्यूज, मूव्हीज चॅनल मध्ये इंग्लिश मूव्हीज, हिंदी सिनेमा चैनल सुद्धा होता, कार्टून चॅनेल्स, गेम्स अशा बऱ्याच गोष्टी होत्या. एक पूर्ण चॅनेल तुमच्या जर्नीसाठी असतो. त्यात फॉरवर्ड कॅमेरा, डाउनवर्ड  कॅमेरा डिटेल्स, बाहेरील टेंपरेचर, प्लेनची अल्टीट्यूड अशा बऱ्याच गोष्टी होत्या. मी फॉरवर्ड कॅमेरा ऑन केला. आता मला प्लॅनच्या समोरचं दृश्य पडद्यावर दिसत होतं. थोड्या वेळाने विमानाला छोटा धक्का बसला आणि विमान चालू झाले. ते रस्त्यावरून पाच दहा मिनिटे, कार जाते तसे जात होते. मग थोड्या वेळाने जरा स्पीड घेतला आणि रनवे  दिशेने जायला लागले. असे ते ऑलमोस्ट पाच मिनिटे गेले आणि थांबले. मी विचारात पडले, काय चाललंय काय? पहिल्यांदा जेव्हा प्लेन सुरू झाले तेव्हाच मी माझा श्वास रोखून धरला होता आणि खुर्चीच्या हातांना घट्ट धरुन ठेवले होते.

प्लेन थांबल्यावर ऑटोमॅटिकली रिलॅक्स झाले. आताही प्लेन परत थांबले आणि खूप मोठा आवाज सुरु झाला. आणि प्लेनने अचानक खूप हाय स्पीड घेतला. शेजारचा तो माणूस मला म्हणाला की, आता प्लेन टेक ऑफ घेईल. मी परत डोळे बंद, हात खुर्चीला घट्ट धरलेले आणि अटेंशन पोझिशन मध्ये बसले. तो म्हणाला, काळजी कशाला करतेस? बाहेर बघ छान वाटेल आणि असे इमॅजिन कर की तू टोरा-टोरा मध्ये बसली आहे. मग मी थोडे डेरिंग करून किलकिल्या डोळ्यांनी बाहेर पाहिले.

आता प्लेनने टेक ऑफ घेतला होता आणि त्याबरोबर माझ्या मनानेही…!!!

— यशश्री पाटील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..