गणेशोत्सव २०२३ – गणपती बाप्पा मोरया!
नारायणाच्या अंगात जसं लग्न संचारत ना तसं माझ्या अंगात गणेशोत्सव संचारतो. एरवी सण- सनावळीच्या बाबतीत निष्क्रीय किंवा अजगरासारखी सुस्तावलेली मी, गणेश चतुर्थी तोंडावर आली की कुठून हरिणाची चपळता आणि उत्साह येतो अंगात हे त्या गणोबालाच माहीत! प्रत्येक मराठी माणसाच्या अंगात हा उत्साह संचारतो. […]