नवीन लेखन...

ने मजसि ने (माझी लंडनवारी – 29)

आता माझे फक्त ३ दिवस राहिले होते लंडनच्या पूर्वार्धामधले.अचानक लक्षात  आलं की, सोमवारी म्हणजे ३० ऑगस्टला लंडनमधे सुट्टी आहे.म्हणजे लॉंग विकेंड आहे  तर! आपण स्कॉटलंडला जावूयात असं ग्रुपच मत पडलं. मला सुचवण्यात  आल कि, तु तिकिट ३ दिवसांनी पोस्टपोनड् कर! पण त्या क्षणी स्कॉटलॅंडपेक्षा मदरलॅंडचं पारडं जडं ठरलं. आणि 3 दिवस काय 3 तास पण मी postponed करणार नाही माझं तिकीट. ह्या माझ्या निर्णयावर मी ठाम राहिले. कधी घरी जातोय, अस झालं होत मला.

शुक्रवारी ते लोक ऑफिसमधून परस्पर जाणार होते त्यामुळे ऑफिस मधेच निरोपा – निरोपी झाली आणि भेटू लवकरच, अस म्हणत त्या मुक्कामातला त्यांचा निरोप घेतला. निघताना मार्टिन, नील सगळ्यांना भेटले. जाताना मार्टिनने विचारलेच, तू नाही का जात आहेस स्कॉटलंडला. मी नाही सांगितल्यावर त्याने मला एक मोठ्ठ स्माईल दिले. त्याच्या हाव-भाव आणि चेहर्यावरुन मला असे वाटले की, त्याला मी स्कॉटलंडला न जाता इंडियाला जाणार हे अपेक्षित असावं. खूप उत्साहाने आणि आनंदाने त्याने मला हॅपी जर्नी आणि लवकरचं भेटू असे म्हणून अलविदा केले.

आता मी घरी एकटीच आले. वॉव! आता एव्हढ्या मोठ्ठया घरात मी पूर्ण एकटीच होते. मस्त चहा घेत बॅकयार्ड मध्ये बसले. आधी घरातल्या सगळ्या खिडक्या बंद आहेत का नाही ते चेक केलं. दोन दिवस आता घरावर माझच राज्य होत. मनासारखं घर आवरलं. जेवण केलं. आणि पत्ते खेळत, गाणी ऐकत टाइम पास केला.

मग वरती जाऊन झोपले. माझ्या बेडरूमची खिडकी रस्त्याच्या साइडला होती. साधारण 12-1 चा सुमार असेल, जोरजोरात आरडा-ओरडा, शिवीगाळ कानावर पडली आणि त्या भयाण शांततेत तो आवाज अगदी बाजूनेच येतोय अस भासत होत. मी दचकून उठले, घामाघूम झाले होते. घरात तरी सगळं ऑल वेल होत. मग हा आवाज कुठून येतोय?

खिडकीचा पडदा बाजूला करून पाहिलं आणि समोरच्या घराच्या दाराबाहेर एक गोरा दारू पिऊन तर्र झालेल्या अवस्थेत घराचं दार जोर जोरात ठोठावत होता आणि कोणी दार उघडत नाही म्हंटल्यावर शिवी गाळ करत होता.म्हणजे असे प्रकार इथे पण घडतात तर… हा सगळा प्रकार 15-20 मिनिटे चालला असेल. तेवढ्यात पोलिस गाडीचा सायरन वाजला. लगेच पोलिस येवून त्या माणसाला घेवून गेले. सगळं बघून मला कुठली झोप लागायला? खूप वेळाने बऱ्याच प्रयत्नानंतर झोप लागली. दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्यामुळे बर झाल. आरामात उठले. दिवसभर पॅकिंग, बाहेर भटकणे, असा वेळ घालवला.

आता मात्र मला एक एक तास एक एक दिवसासारखा वाटायला लागला. आणि डोळ्यात प्राण आणून मी रविवार दुपारची वाट बघायला लागले.

— यशश्री पाटील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..