नवीन लेखन...

भूतांपरस्परे जडो (माझी लंडनवारी – 12)

आता ऑफिस सुरू होऊन चार पाच दिवस होऊन गेले होते. मी व्यवस्थित सेट झाले होते. पाच-साडेपाचला हॉटेलवर आले कि, चहा घेवून हाइड पार्क किंवा केंसिंग्टन गार्डन येथे एक छान मोठी राऊंड घेऊन साडेसहा पर्यंत घरी येत होते.

दूध आणल्यामुळे मी घरून आणलेल्या सोसायटी पावडरचा आपल्या स्टाईलचा चहा घरी करू लागले.  तोवर मी कॉफीवर समाधान मानत होते. टी बॅग्ज्च्या चहाने तसेही समाधान मिळत नव्हते. इथे दूध खूप चविष्ट असते.त्यामुळे चहा अप्रतिम लागायचा.  नुसतं दूध पण मी ग्लासच्या ग्लास संपवायचे. दूध कॅन मधे मिळत होते. त्यामुळे तापवून  ठेवणे वगैरे भानगड नाही. फ्रिज मधून काढा आणि वापरा.

मग थोडावेळ टीव्ही बघणे, स्वत:पुरते जेवण बनवणे असे करून मी दहा साडेदहा पर्यंत झोपत होते. पहाटे लवकर उठून मॉर्निंग वॉक – आज हे गार्डन, उद्या ते गार्डन गार्डन!  खूप फ्रेश वाटायचे .कितीही चालले तरी थकल्यासारखे वाटत नव्हते, कारण तिथली हवा छान प्रोत्साहन देणारी होती.खूप छान दिवस चालले होते.

मी काही दिवस ‘एकटा जीव सदाशिव’ हे जीवन खूप एन्जॉय केले. पण भारतात असताना सतत नातेवाईक आणि फ्रेंड सर्कल मध्ये रमणाऱ्या मला आता थोडा कंटाळा यायला लागला होता.

मी उमेशच्या वर्क परमिट फॉर्मॅलिटी पूर्ण होऊन, तो येण्याची वाट बघत होते. कारण आम्ही ठरवले होते, लंडन साईट सिंग एकत्र करायचे. तो आधी बिजनेस व्हिसावर आला होता. पण त्याने एखाद-दुसरी साईट बघितली होती. त्याची सोय ऑफिसने  ‘हॅरो ऑन हिल्स्’ला आमच्या इतर ऑफिस कलिग्ज बरोबर  केली  होती.(संतोष आणि गोपी). ते झोन ६ मध्ये होते. त्यामुळे तो जास्त फिरला नव्हता. त्यामुळेच आम्ही असे ठरवले होते की, तो इथे परत आल्यावर आम्ही एकत्र फिरू.

मी पहिल्या विकेंडला परेशच्या घरी सडबरी टाऊनला गेले. ते झोन ४ किंवा ५ मधे होते.परेश तिथे आमच्याच कंपनीतल्या पण वेगळ्या क्लायंटसाठी काम करत असलेल्या बाला आणि रितेश बरोबर रहात होता. त्यांच्याशी पण चांगली दोस्ती झाली. मुळात म्हणजे त्यांच्याकडे वॉशिंग मशिन होते. परेशने मला ऑफिस मधेच सांगितले होते की वीक एन्डला सगळे कपडे घेवुन ये इथे धुवायला. त्यामुळे माझे मोठ्ठे काम झाले होते. पहिले दोन आठवडे माझे कपडे धुण्याचे मोठ्ठे काम अनुक्रमे परेश आणि साक्षीच्या आजीकडे पार पडले.

आता ऑफिस मधला दुसरा आठवडा सुरू झाला होता.  मी एक दिवस लवकर निघून त्या ठरवलेल्या इटालियन कॉफी बार मध्ये गेले.  बाहेर टेबलवर बसून कॉफीचा आस्वाद आणि आजूबाजूच्या वातावरणाचा आनंद घेत कॉफी एन्जॉय केली. तो दिवस खूपच आनंददायी गेला.

ऑफिसमध्ये मला एक सेपरेट मोड्यूल असाइन केले गेले. इथे प्रत्येक मोड्यूल वाईज एक फंक्शनल कन्सल्टंट असाइन होतो. जो युजर रिक्वायरमेंट तुमच्यापर्यंत पोहचवतो. मग तुम्हाला फंक्शनल स्पेसिफिकेशन बनवून त्या ऍप्रुव्ह करुन त्यावरुन टेक्निकल स्पेसिफिकेशन बनवाव्या लागतात. नंतर ऍक्चुअल डेव्हलपमेंट सुरु होते.

तो कन्सल्टंट फ्रेंच होता. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तो येवुन मिटींग  करायचा. मग त्याप्रमाणे मी पुढचं काम करायचे. तो फ्रेंच कन्सल्टंट एवढा गोड बोलत होता की थोडं अजीर्ण होत होते. मे बी त्यांच्या भाषेमुळे त्याचा टोन तसा असेल.

अनलाईक ब्रिटिशर हा खूप बडबड्या होता. कामामधे त्याची सारखी बडबड, कधी कधी त्रासदायक वाटायची. But he was very kind and considerate though.

तो दिसायला ‘मॅट्रिक्स’ मूव्ही मधल्या निओ सारखा होता. त्यामुळे आम्ही त्याचे नाव निओच पाडले.

आमचा प्रोजेक्ट मॅनेजर’ मार्टिन लेमन’ एक क्युट बूढा बाबा होता. तो खूप प्रेमळ होता. उंचापुरा, गोरा, निळे- घारे डोळे, पांढरी शुभ्र लांब दाढी.  तो मला एखाद्या योग्या सारखा वाटायचा.

लवकरच मी त्याच्या गुड बुक्स् मधे गेले. त्यासाठी एक मोठे कारण घडले. मी जे पहिलेच युनिट डेव्हलप केले होते. त्यात सारखी एरर येत होती.  मी कोड पन्नास वेळा चेक केला कोड बरोबर होता.  मग मी त्या एरर च्या मुळाशी जाऊन चेक केले तर बेसिक डेटाबेस डिझाईन मध्येच चुक होती. मी मार्टिनला हे दाखवले. I also told him, which table, what key is wrong and what it should be. तो एकदम माझ्यावर खुश झाला. त्याने पुर्ण टिमला आणि सि.ई.ओ.ला ह्याबद्दल मेल टाकली, कॉंग्रच्युलेटींग मी!…

आणि त्या दिवसापासून मला स्पेशल अटेंशन / कंसिडरेशन मिळायला लागले.  मी जरा उशिरापर्यंत काम करताना दिसले की लगेच माझ्याजवळ येऊन, ‘अरे!  गो होम! य आर यु वेटिंग हियर. गो एन्ड सी लंडन’ असे सांगून मला पिटाळत असे. मला तर  घरी जाऊन काय करावे असा प्रश्न पडायचा. त्यापेक्षा इथे काम केलेलं बरं! म्हणून मी थोडा वेळ थांबायचे. पण त्याला असे वाटायचे की मी बाहेर फिरले पाहिजे.

दुसऱ्या वीकेंडला मी साक्षीच्या मामा आजोबांकडे गेले. ते गेले कित्येक वर्ष ईथेच रहातात. त्यांचं घर खूप सुंदर होत. तिथे त्यांच्या तिन्ही मुली, जावई, नातवंड असा सगळा गोतावळा मला भेटायला आला. नातेवाईकांमध्ये राहून मला खूप छान वाटले. रविवारी सकाळी आम्ही जवळच्या गार्डनमध्ये मॉर्निंग वॉकला गेलो. अशी सुंदर गार्डन्स मी खरच कुठे पाहिली नाही. नैसर्गिक सौंदर्याने तर ती पूर्ण नटली होतीच, पण खूप छान मेन्टेन ही होती. संडेला दुपारपर्यंत मी परत हॉटेलवर आले!

लंडनमधला तिसरा आठवडा नेहमीसारखा सुरू झाला.

मंगळवार, दिनांक 27 जुलै 2004, माझा बर्थडे, आज लंडनमध्ये साजरा(?) होणार होता. मी ऑफिसमध्ये गेले. सकाळी-सकाळी (त्यांच्या) घरच्यांनी फोन करून विश केले. माझा बर्थडे कोणाला तिथे माहित असण्याचा प्रश्नच नव्हता. दिवस नेहमी सारखा कामात गेला. हॉटेलवर आले. रूममध्ये एकटीच बसले होते. थोडी नर्व्हस झाले होते.

मी तयार होऊन गार्डनमध्ये फिरायला जाणार, तेवढ्यात परेश आणि संतोष केक घेऊन माझ्या रूम मध्ये आले. मला सरप्राईज! खूप आनंद झाला. येताना त्यांनी चिप्स्पण आणले होते. मग आम्ही केक कटिंग केले. चिप्स आणि केकवर ताव मारून नंतर छानपैकी कॉफी घेतली. थोडा वेळ गप्पा मारल्या. मग परेश उशीर होतोय म्हणून घरी गेला. संतोष सुद्धा त्याच्याबरोबर बाहेर पडला.

आठ-सव्वाआठची वेळ असेल, मी परत एकटीच गाणी ऐकत बसले होते आणि अचानक दारावर पुन्हा टकटक झाली. दार उघडले तर संतोष आणि अजून दोन अनोळखी चेहरे दारात उभे! मग संतोष आत आला. त्याने ओळख करून दिली, हा निलेश आणि हा कार्तिक! हे दोघेही आपल्या ऑफिसमध्ये आहेत आणि वेगळ्या क्लायंटकडे काम करतात. कुठे राहत असावेत?

माझ्याच फ्लोअरवर समोर!!  दोघे माझ्या समोर बाजूबाजूच्या रूममध्ये राहत होते. म्हणजे इतके दिवस मला माहितीच नव्हतं की,माझ्या ऑफिसमधल कोणीतरी माझ्या फ्लोअरवर आहे. इतरांनीही कोणी कधी काही सांगितले नाही.

अनफॉर्च्यूनइटली केक आणि चिप्स संपले होते. मग मी त्यांना कॉफी आणि बिस्कीट दिले. त्यांनाही संतोषकडून नव्यानेच कळले होते की, मी इथे राहते. मग त्यांनी सांगितले की तू वाढदिवसाच्या दिवशी एकटी नको राहूस. आमच्या रूममध्ये ये. गाणी ऐकू, पत्ते खेळू! तुला आवडतात का पत्ते?

आजच्या दिवसातली सर्वात मोठी गिफ्ट मला मिळाली होती. आम्ही सर्वजण मग निलेशच्या रूम मध्ये गेलो. तिथे ते म्हणाले की, तुला बर्थडेच्या दिवशी एकटे कसे टाकू? आणि इथेच आमच्या तारा जुळल्या.

मला एक मस्त ग्रुप मला मिळाला. त्या दिवसापासून रोज जितके दिवस मी हॉटेलवर होते तितके दिवस आम्ही एकत्र जेवण, चहा नाष्टा, गप्पा गोष्टी, गाणी, पत्ते करत होतो. त्यामुळे एकटेपणाची जाणीवच निघून गेली.

उमेशही त्यानंतर दोन-तीन दिवसात आला.  Now we are all set to go for sight seeing from this week end onwards…

Are we really set off …???

— यशश्री पाटील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..