नवीन लेखन...

एक परीस स्पर्श ( भाग – ५२)

आज विजयने एक ज्योतिषी आणि वास्तुतज्ञाची हत्या त्याच्या अनुयायांनीच केल्याची बातमी वाचली. त्यावर फेसबुकवर टिपण्णी करणाऱ्यांनी प्रश्न विचारला होता की  ते ज्योतिषी होते तर त्यांना त्याचा मृत्यू कसा कळला नाही. त्यावर काय उत्तर द्यावे ते विजयला कळलेच नाही… एखादया ज्योतिष्याला एखाद्याला मृत्यू सांगता येत असला तरी त्याने तो सांगू नये असा अलिखित नियम आहे. तो नियम बहुसंख्य ज्योतिषी पाळतात … पण लग्नासाठी फक्त पत्रिका जुळविणाऱ्या ज्योतिष्यांना मात्र कोणाचाही मृत्यू सांगता येत नाही. जे ज्योतिषी ज्योतिषशास्त्राचा धंदा करत असतात त्यांच्याकडून खऱ्या भविष्याचीही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. लग्नासाठी पत्रिका जुळविणाऱ्या अभ्यासू ज्योतिष्याला समोर व्यक्तीच्या पत्रिकेत असणारे घटस्फोटाचे, अनैतिक संबंधाचे अथवा लैंगिक समस्यांचे योग सहज दिसतात पण ते ते समोरच्याला सांगत नाहीत फक्त गुण जुळत आहेत म्हणजे पत्रिका जुळते आहे सांगून दक्षिणा घेऊन मोकळे होतात. नेस्ट्राडेमस सारखे काही ज्योतिषी मृत्यू सांगत होते पण त्यांच्यात प्रत्यक्षात भविष्यकाळात ते जाऊन पाहण्याची क्षमता होती म्हणून ते शक्य होत होते. ज्योतिष्याने अर्धवट ज्ञानाच्या आधारावर कोणालाही मृत्यूचे भाकीत करायला नको ! कारण त्यामुळे त्याचे जगणे अवघड होईल…माणसाला मृत्यू अगोदर काळाला तर जगण्याला उत्साह निघून जाईल अथवा तो जास्तच वाढेल. ज्योतिष्यावर विश्वास ठेवायला हवा पण त्या ज्योतिष्याचा त्या विषयाचा अभ्यास किती आहे आहे ते ही एकदा तपासून पाहायला हवा ! विजयने ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करण्यापूर्वी म्हणजे काही वर्षांपूर्वी परदेशातील एका प्रसिद्ध ज्योतिषी महिलेला त्याच्या जन्माची माहिती दिल्यावर तिने भविष्य वर्तवले होते की तुझा विवाह होणारच नाही आणि झाला तर तो टिकणार नाही ! लग्नाबाबत नकारात्मक विचाराचा किडा  त्या ज्योतिषी महिलेनेच पहिल्यांदा त्याच्या डोक्यात सोडला होता… त्या किड्यामुळेच विजय ज्योतिष शस्त्राचा अभ्यास करायला लागला आणि त्याच्या लक्षात आले की ज्योतिष शास्त्र हे पूर्णतः थोतांड नाही.. त्याच्या बाबतीत ज्योतिष शास्त्रातील बरेच नियम प्रत्यक्षात बरोबर ठरलेले होते.जसे की तो कवी लेखक होण्याचे योग त्याच्या पत्रिकेत स्पष्ट दिसत होते. लग्न हे त्याच्यासाठी लाभदायक ठरेल पण त्यातून त्याला फार सुख मिळणार नाही कारण ते सुख तो मिळवित राहिला तर त्याला आर्थिक सुख मिळणार नाही. विजयला भविष्यात घडणाऱ्या काही गोष्टींचे संकेत अगोदरच मिळतात आणि त्याच्या तोडून सहज निघालेली वचने कित्येकदा खरी होतात पण त्यात त्याच्या ज्योतिष शस्त्राच्या अभ्यासाचा काही हातभार नाही. भविष्य कोणालाही बदलता येत नाही. गंडे दोरे आणि हाताच्या बोटात खड्याच्या अंगठ्या घालून काहीही होत नाही. काही महिन्यापूर्वी विजयच्या आई वडिलांनी विजयची व्यतिपात योगाची शांती करून घेतली होती.  ती शांती करणाऱ्या ज्योतिष्याने आत्मविश्वासाने सांगितले होते की ही शांती करणाऱ्याचा विवाह सहा महिन्यात होतो. पण विजयच्या बाबतीत दहा महिने झाले तरी तसे काहीही झाले नाही… विजयच लग्न तर झाले नाहीच , त्याच्या आयुष्यातही कोणी आली नाही उलट त्याच्या आयुष्यात असलेली अनामिकाही त्याच्या आयुष्यातून कायमची जाण्याची चिन्हे दिसत आहेत. विजयने त्याच्या आई वडिलांना अगोदरच सांगितले होते की ही शांती वगैरे करून काहीही होणार नाही .. कारण अनामिकेच्या प्रेमात असे पर्यत त्याने दुसऱ्या कोणाशी लग्नाचा विचार करणेही अशक्य होते. उलट त्या शान्ति नंतर त्याचे पायाचे दुखणे बळावले त्याला त्याची वर्तमान नोकरी सोडावी लागली, त्याच्यावर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीत त्याने लग्न करणे तर सोडा त्याचा विचार करणेही अशक्य आहे.. सांगायचे तात्पर्य इतकेच होते की या शांत्या लोकांना फक्त आर्थिक खड्ड्यात घालतात.

विजयचा एक मित्र आहे . विजय जवळ जवळ रोज त्याच्यासोबत चर्चा करतो. विजयचा ज्योतिष शस्त्राचा आणि संबंधित विषयांचा बऱ्यापैकी अभ्यास असल्यामुळे तो विजयच्या कानावर त्याच्या बऱ्याच समस्या घालत असतो. त्याला त्याच्या जन्माची खरी वेळ माहित नव्हती. विजयने अंदाजे त्याच्या जन्मवेळच्या परिस्थितीवरून त्याची एक जन्मपत्रिका टायर केली आणि ती त्याच्या आयुष्यातील घटनांशी जुळवून पहिली तर ती बरोबर असल्याचे त्याच्या लक्षात आले. विजयच्या या मित्राचा प्रेमविवाह झालेला होता. म्हणजे त्याने पत्रिका ना जुळवित विवाह केला होता. त्याच्या पत्नीच्या पत्रिकेत मंगळ दोष होता. त्याच्या पत्नीच्या पत्रिकेत घटस्फोटाचे योगही होते पण ते त्याने त्या मित्राला सांगितले नाही. त्या दोघांच्याही पत्रिकेत संततीबाबत समस्या स्पष्ट दिसत होत्या. त्याच्या पत्नीचा दोनदा गर्भपात झालेला होता. आता लग्नाला सहा – सात वर्षे झाली तरी त्यांना संतती नव्हती. त्याची पत्नी मंगळाची असल्यामुळे तिने या गोष्टीचे फार टेन्शन घेतलेले नव्हते. ती तिच्यात काही दोष आहे हे मान्य करायला तयार  नव्हती. आणि विजयचा तो मित्र त्याला संतती हवी म्हणून तो प्रयत्नशील होता. त्याने त्याच्या लहान भावाच्या पत्नीची पत्रिका विजयला दाखवली तर विजयला त्या पत्रिकेत अनैतिक संबंधाचे योग दिसाले जे खरे होते. विजयच्या त्या मित्राने विजयने न सांगताही शांत्या वगैरे करून घेतल्या पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. एकदा त्याच्यात आणि त्याच्या पत्नीत भांडण होऊन ते घटस्फोटाच्या निर्णयापर्यत पोहचले होते पण सुदैवाने ते सावरले. त्या मित्राच्या आयुष्यातही त्या पत्नीच्या अगोदर आणखी तीन स्त्रिया येऊन गेल्या होत्या ज्यांच्याशी त्याचे शारीरिक संबंधही आले होते. त्याबद्दल त्याच्या पत्नीलाही कळले होते. त्यामुळे तिचा त्याच्यावरचा विश्वासही डळमळीत झाला होता. विजयने त्याला पत्रिकापाहून सांगितले की तुझ्या पत्रिकेत राहत्या घरापासून दूर जाण्याचे योग आहेत आणि काही महिन्यात त्या मित्राने त्याचे राहते घर सोडले आणि तो आपल्या पत्नीसोबत दुसरीकडे भाड्याने राहायला लागला. त्यांनतर त्याच्या भावाच्या बायकोने आपले दागिने गहाण ठेवून आपल्या मित्राला आर्थिक मदत केली आणि चोरी झाल्याचा बनाव केला. त्या टेन्शनने त्याचे वडील आजारी पडले आणि त्यांचा आजार बळावत गेला… त्यानंतर त्याच्या आजारपणात होणाऱ्या खर्चामुळे विजयचा तो मित्र आर्थिक खड्ड्यात जाऊ लागला.

त्याला नेहमी एक प्रश्न पडतो हे सर्व टाळता आले असते का ? तर त्याचे विजयने दिलेले उत्तर होते नाही ! कारण भविष्य कोणालाही बदलता येत नाही. त्याने ते बदलण्यासाठी लाख भर रुपये खर्च केले तांत्रिक आणि मांत्रिकाकडे पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यांच्या राहत्या जागेत दोष होता. त्यांनी ती जागा वेळीच सोडायला हवी होती. पण माणसाचा मोह त्याच्या भावभावना आडव्या येतात. त्यात त्याच्या कुटूंबात कोणीही देवाधर्माचे काहीही करत नव्हते. फक्त संकट आले म्हणून त्यांना देवाची आठवण येत होती. त्याच्याकडून कधीही कोणताही दानधर्म घडलेला नव्हता. त्यात त्याच्या कुटुंबात आलेल्या सुना त्याही नास्तिक होत्या. कोणाकडूनच काही शुभ कार्य घडत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर अशी संकटे घोंगावत होती. विजयने त्याच्या मित्राला स्पष्ट सांगितले होते. तुझे वडील त्यांच्या कर्माची म्हणजे प्रारब्धाने दिलेली शिक्षा भोगत आहेत…त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही कोणतेच दानधर्म कर्म केलेले नाही. तुझ्या आईनेही ते केले नाही कारण ते दोघेही फक्त भौतिक सुखे मिळविण्यात गुंतलेले होते.. त्याच्या मुलांनीही पुण्य कर्म करण्या ऐवजी तुम्हीही तेच कर्म करत राहिलात जे तारुण्याच्या जोशात केले जातात… नियतीनेही तुमच्या कर्म प्रमाणेच तुम्हाला जोडीदार दिले. आता तुमच्या हातात संकटाना आनंदाने सामोरं जाण्याखेरीज काहीच पर्याय नाही. पण त्याच्या मित्राने विजयाचा सल्ला फार मनावर घेतल्याचे दिसत नाही कारण तो ही त्याच्या वडिलांसारखाच पैशाने सर्व सुखे मिळतात या गैरसमजात आहे. त्यामुळे त्याच्या भविष्यात जे वाढून ठेवलेले आहे ते विजयला स्पष्ट दिसत असताही तो त्याला सावध करत नाही कारण तो अजूनही भविष्य कोणालाही बदलता येत नाही हे मानायलाच तयार नाही. विजयने त्याला स्पष्ट शब्दात सांगितले होते की तुझ्या वडिलांच्या आजाराला ते स्वतः जबाबदार आहेत ! कारण तुला मुलं होत नाहीत याचे टेन्शन त्यांना घेण्याची गरज नव्हती. तुझ्या लहान भावाचे लग्न भलेही त्यांनी जुळवून आणले असले तरी त्यांची काहीही चूक माही कारण नारळ आणि सून कशी निघेल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे त्यात त्यांचा दोष नव्हता त्यामुळे त्याचे टेन्शनही त्यांना घायची गरज नव्हती… तुझी आई  तिला तुझा प्रेमविवाह न आवडण्याचे काही कारण नव्हते पण तुला संतती झाली नाही याचा मनात राग धरून ती दोन सुनांमध्ये  भेदभाव करू लागली. पण दुसऱ्या सुनेने गुण लक्षात येऊनही ती लाडाची असणे हे तर्कसंगत नाही. त्यामुळे एकंदरीत तुमच्या सगळ्यांचे भविष्य फार आशादायक नाही हे सत्य कोणालाही बदलता येणार नाही..

— निलेश बामणे.

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..