नवीन लेखन...

मराठी भाषा आणि संस्कृतीविषयी लेख..

मराठी आपली आई,धर्म आपली माता

आचार्य विनोबा भावे म्हणतात, ‘मराठी आपली आई,धर्म आपली माता.आपण खरे मातृपूजक आहोत. दुसऱ्याच्या मातेची निंदा करणारे नव्हेत.’ आपली मराठी भाषा किती ओजस्वी,प्रसादपूर्ण,सहजबोधआहे हे यशवंतराव चव्हाण असं समाजातून सांगतात. ‘मराठीत भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांची जुळणी पहा कशी आपोआप सहज होऊ लागते.तुम्ही आपल्या भाषेवर अपार प्रेम करावं, नाहीतर तुमची ऐनवेळी बोलताना फजिती होईन! आचार्य विनोबांनी देवनागरीचा लिपी म्हणून […]

एक होतं गाव

एक होतं गाव. “महाराष्ट्र” त्याचं नाव. गाव खूप छान होतं, लोक खूप चांगले होते. “मराठी” भाषा बोलत होते, गुण्यागोविंदानं नांदत होते. त्यांचं मन  खूप मोठ्ठं होतं. वृत्ती खूप दयाळू होती. दुखलं- खुपलं तर एकमेकांच्या हाकेसरशी धावून जायचे. आल्या-गेल्याला सांभाळून घ्यायचे. एकमेकांना साथ देऊन जगण्याचं गाणं शिकवायचे, महाराष्ट्रात होता एक भाग. “मुंबई” त्याचं नाव. मुंबईसुद्धा छान होती; महाराष्ट्राची […]

महाराष्ट्र मोल्सवर्थचे ऋण विसरलाय का?

मोल्सवर्थचा मराठी – इंग्रजी शब्दकोश (१८३१)  ऐकूनही माहीत नाही असा मराठी माणूस सापडणं कठीण. पण हा मोल्सवर्थ नेमका कोण हे माहीत असणारी मराठी माणसंही तशी कमीच. मोल्सवर्थची मराठी-इंग्रजी डिक्शनरी प्रथम १८३१ मध्ये प्रकाशित झाली. तिची दुसरी सुधारित आवृत्ती १८५७ मध्ये छापली गेली. आजही सुमारे १००० पानांचा मोल्सवर्थचा हा शब्दकोश मराठीतला सर्वांत मोठा शब्दकोश आहे. महाराष्ट्रातल्या न्यायालयात जेव्हा […]

शुद्ध कोण ; अशुद्ध कोण

शुद्ध मराठीचा आग्रह हा दुराग्रह होऊ नये, कारण त्यामुळे कदाचित सामान्य माणूस भाषेपासून दूर पळण्याचा धोका आहे. आजची तरुण पिढी अशुद्ध मराठी लिहिते असा नेहमीच आरोप केला जातो. पण असे का याचा विचार कोणी केलाय का? […]

शब्द, अक्षर, भाषा : कृपया ‘चारोळी’ म्हणूं नका

चार ओळींच्या काव्याला ‘चारोळी’ म्हणून संबोधण्याची पद्धत गेली कांहीं वर्षें बळावली आहे. कुण्या कवीनें तें नांव चार ओळींच्या (विनोदी व हलक्याफुलक्या) कवितेला दिलें, व योगायोगानें तेंच नांव मराठीत रूढ झाले. चारोळी म्हणजे अर्थातच, ‘चार ओळी’ . तसेंच, चारोळी हा पदार्थ बदाम-पिस्ते-काजू यांच्यासारखा सुका मेवा. खाण्याच्या अनेक पदार्थांमध्ये चारोळी वापरतात. त्या संदर्भातील अर्थ , काव्याचें ‘चारोळी’ हें […]

महाराष्ट्र, महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी

महाराष्ट्र, महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी, एक चिंतन- वेडी स्वप्न पाहायची आणि सनदशीर मार्गाने वाटेल ते करून ती पूर्ण करायची हे मराठी माणसाच्या रक्तात आहे. त्यालाठी पडतील ते कष्ट करायची, संयमाने वाट पाहायची त्याची तयारी आहे. महाराष्ट्रात जन्मलेला माणूस ‘मराठी’ असुनही त्याला केवळ ‘मराठी’ हे ‘प्रांतिय’ लेबल लावलेलं आवडत नाही कारण देशातील इतर कोणत्याही प्रांतापेक्षा […]

महाराष्ट्राची ‘मराठी परंपरा’

आज महाराष्ट्र दिन..सर्वचजण एकमेकांना शुभेच्छा देतील..परंतू या शुभेच्छा देताना काही गोष्टींची, विशषतः महाराष्ट्राच्या ‘मराठी परंपरे’ची, आठवण करून देण्यासाठी खालील उतारा लिहीला आहे. थोडा वेळ काढून जरूर वाचावा ही विनंती.. ‘..मुघल काय किंवा इंग्रज काय, कुणाही परकीयांच्या हातून भारताला स्वतंत्र करण्यासाठी जे जे प्रयत्न झाले त्यांत ‘मराठी रक्त’ जितके सांडले तितके अन्य प्रांतातील रक्त सांडले नाही, याची […]

1 7 8 9 10 11 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..