सिंधुदुर्गातले सुपुत्र – “बाबी कलिंगण”

‘ रात्री राजा., आणि दिवसा डोक्यावर बोजा..’ असे समिकरण बनलेल्या दशावतारी नाट्यकलेला बाबी कलिंगण यांनीच खर्‍या अर्थाने मूर्तस्वरूप दिले.

महादेव रामचंद्र ऊर्फ बाबी कलिंगण यांनी प्रथम दशावतारी कंपनीत बोजेवाल्याचेच काम केले. दळणवळणाची अपुरी साधने आणि शेतीवर पोट असलेल्या या कलावंतांने अखेरपर्यंत कलेची कास सोडली नाही. काही वर्षांपूर्वीच पडद्याआड गेलेले बाबी नालंग आणि बाबी कलिंगण हे दोन दशावतारी कलेचे शिलेदार होते. “श्री. बाबी कलिंगण यांना राज्यस्तरीय लोककला पुरस्काराने गौरविण्यात आले होते “.सिंधुदूर्गात दशावतारी म्हणजे ” रात्री राजा आणि सकाळी कपाळावर बोजा ” अशी स्थिती एके काळी होती. त्या वेळपासून लोककलेची सेवा हाच परमधर्म असे समजून हा कलाकार राबला त्याची शासनाने दखल घेतली हे बरं झालं.

बाबी कलिंगण यांचा जन्म कुडाळ तालुक्यातील नेरूर गावातील देसाईवाडीत झाला. लहानपणापासून त्यांना या कलेची आवड होती. पार्सेकर दशावतारी कंपनीत सुरूवातीला त्यांनी पेटारा उचलण्याचे काम सावळाराम नेरूरकर यांच्यासोबत केले. हे करत असताना इतर कलाकारांचे सादरीकरण पाहत ते घडत गेले आणि नेरूर येथे एका नाटकात कैकयीच्या भूमिकेतून त्यांनी नाट्यकलेस प्रारंभ केला. त्यानंतर साकारलेल्या अनेक भूमिका त्यांनी जीवंत केल्या.

वालावलकर दशावतार नाट्यकंपनीतून त्यांनी खर्‍या अर्थाने आपल्या नाट्यकारकीर्दीचा प्रारंभ केला. त्यानंतर खानोलकर, मामा मोचेमाडकर, नाईक मोचेमाडकर या दशावतारी कंपनीत त्यांनी काम केले. काही वर्षापूर्वीच त्यांनी कलेश्‍वर दशावतार नाट्यकंपनी ही स्वतंत्र नाट्यसंस्था स्थापन केली होती. त्यांच्या विशेष गाजलेल्या ‘मारूती’ शंकराच्या भूमिका विशेष गाजल्या. बाबी कलिंगण यांचा दशावतारी नाटकातील राजा जसा भारदस्त होता, तसा धनगर, कोळी, गरूड या भूमिकाही तेवढ्याच ताकदीने ते साकारत.लिखित नाट्यसंहिता नसतानाही प्रसंगानुरूप हावभाव आणि संवाद फेकण्याचे सामर्थ्य खर्‍या कलावंतात असते, ते बाबी कलिंगण यांच्यात होते.

बोजा घेऊन रोज १४ – १५ कि.मी. पायी प्रवास करायचा आणि मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर पुन्हा प्रयोगाची तयारी करायची,आपणच आपला मेकअप करायचा, वस्त्र परिधान करायची आणि थंडीत कुडकुडतच प्रवेशावर प्रवेश करत रहायचे ते थेट सकाळ पर्यत.. पुन्हा तेच ” कपाळावर बोजा “…बरं या प्रयोगाची कथा, संवाद वैगरे त्यानीच ठरवलेली, लोकांच्या आग्रहास्तव कोणतेही आख्यान लावायला हि मंडळी केव्हाही तयार…कोणतिही संहिता नसताना ५- ६ तास चालणारे दशावताराचे प्रयोग म्हणजे एक आच्छर्य आहे. ती एक पर्वणीच असते.

बाबी कलिंगण वयाच्या १५ व्या वर्षापासून आजतागायत ७५ व्या वर्षी सुध्दा दशावताराचे प्रयोग करीत आहेत १५ व्या वर्षी २५ पैसे रोजंदारीवर पार्सेकर दशावतारी मंडळात काम करणारे बाबी कलिंगण नंतर खानोलकर, आजगावकर, मामा मोचेमाडकर, नाईक मोचेमाडकर, असा प्रवास करत पुन्हा पार्सेकर कंपनीत आले.नंतर कलेश्वर दशावतारी मंडळ ही कंपनी स्थापन केली. पण बाबी कलिंगण कुठेही असुदे त्याच्या नाटकाचा जो बोर्ड लागातो तो “स्वतः बाबी कलिंगण.. ” अशी जाहिरात असलेलाच.., मग नाटकाला तुफान गर्दी होते. प्रत्यक्ष परमेश्वर अवतरणार असे समजून मालवणी जनता जनार्दनाचा ओघ जत्रेच्या ठिकाणी सुरू होतो.

” स्वतः बाबी कलिंगण ” हा आता मालवणीतील वाक् प्रचार झाला आहे. श्री. कलिंगण यांना यापूर्वी १९९४
मध्ये अखिल भारतीय नाट्यपरिषदेचा पुरस्कार मिळाला आहेच. या प्रसंगी पद्मश्री बाबी नालंग यांचीही आठवण येते. या दोन्ही कलावंतानी मच्छींद्र कांबळी प्रमाणेच दशावतार सुध्दा सातासमुद्रापलीकडे नेला. कर्नाटकातील ‘यक्षगान’ या लोककलेशी साधर्म्य असलेला दशावतार आज अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला.
बाबी कलिंगण यांच्या नावातच जादू होती. त्यांच्या नाट्यप्रयोगांना प्रेक्षकांची एकच गर्दी व्हायची. या कलेची सेवा करतानाच चंदगड येथे त्यांची प्राणज्योत मालवली. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी नाट्यकलेसाठी घालविले.

“तूझा सनसनता..माझा सनसनता ..
लोकां म्हणतत.. काय सनसनता ..”
पायातला जोडाव्या सनसनता…
आशा वोव्यात त्यांचा कोण हात धरू शकत नव्हता त्यामुळे त्यांचा ख़ास असा प्रेक्षक वर्ग तयार झाला होता ‘अरे वा ‘म्हणत ते प्रेक्षकांत नजर फिरवीत केवळ शब्द समर्थांने व नजरेने देहभाषेने प्रेक्षकांना बांधुन ठेवायच कसब त्यांच्याकडे होत.

वयाच्या ७८व्या वर्षी त्यांच निधन झाल.”आपल्याला वरूनच बोलावण आलंय..! असे संकेत बाबी कलिंगण यांना मिळले असतील म्हणुनच त्यांना नाटक सुरू असतनाच देवांनी आपल्याकडे बोलावून नेले.
अशा या पुथ्विवरच्या गंधर्वांला कोटी कोटी प्रणाम…!!

— गणेश कदम,
कुडाळ सिंधूदुर्ग

About गणेश कदम 48 Articles
पुणे येथे वास्तव्य असलेले गणेश कदम हे विविध विषयांवर समाजमाध्यमांतून लिहित असतात. ते टेक महिंद्र या कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

महाभारतकालीन कुंतलनगर काटोल

महाभारत काळात कुंतलनगर या नावाने काटोल प्रसिध्द होते. कुंतीच्या नावावरुन ...

Loading…