नवीन लेखन...

मराठी भाषा आणि संस्कृतीविषयी लेख..

माय मराठी

नुकताच ‘जागतिक मराठी भाषा दिन ‘ झाला अन आम्ही झोपेतून ( कि गुंगीतून ) सपाटून जागे झालो . “मराठी वाचवा ” असे आवाहन करण्यात आले . मराठीचा -बचाव -बचाव असा आक्रोश स्पष्ट एकू येवू लागला . आम्ही बेचॆन झालो . ‘मराठी वाचलीच पाहिजे ‘ (क्रिया आणि क्रियापद दोन्ही )याचा साक्षात्कार झाला ! […]

माय मराठी : (लघुकाव्य-संच)

(मराठी भाषा दिनाच्या निमित्तानें)   (१) मराठी-भाषा-दिवस करूं या साजरा माय मराठीला करूं मानाचा मुजरा चला, आज  मराठीचे गोडवे गाऊं उद्या  तिच्या उन्नतीचें विसरून जाऊं  ।। – (२)     भेटला ज्ञानया जसा ‘देश्य’ भाषेला भेटला शिवाजी काल महाराष्ट्राला करील पुनरुत्थान, हरील हताशा कोण असा, पाहील मराठी भाषा ? – (३)     संकर झाला, होऊं द्या की , मराठी […]

शब्दांची पालखी – भाग दोन

‘लोकसत्ते’मुळे लागलेली वाचनाच्या गोडीला ‘चांदोबा’ने खतपाणी घातलं. वाचावं कसं, ते मला चांदोबाने शिकवलं. चांदोबाने माझं भावविश्व समृद्ध केलं. ….चांदोबातून ओळखीच्या झालेल्या रामायण, महाभारत, शिवलिलामृत, वेताळ पंचविशीतील कथा पुढे थोड्याशा मोठ्या वयात संपूर्ण वाचून काढल्या, त्या याच पद्धतीेने. कळत फार नव्हतंच, परंतू त्यातलं नाट्य मात्र मोहवत होतं. […]

शब्दांची पालखी – भाग एक

मला अगदी मी वाचायला शिकलो, त्या वेळेपासूनच वाचायची आवड लागली होती. तेंव्हा परिस्थिती यथातथाच. आमचीच नव्हे, तर बहुतेक सर्वच कुटूंब गरीब म्हणता येतील अशीच. वाचायची आवड शाळेच्या पुस्तकांवर भागवायची कारण इतर पुस्तकं मिळणं अशक्यच होतं. संस्कृतीत सण ही एकच गोष्ट असायची, वाचन वैगेरेही संस्कृतीचा भाग आहे, हे कुणाच्या गांवीही नसायचं. पुस्तकं सोडा, रोजचा पेपर मिळणंही दुरापास्त असायचं. पेपर न घेणं यासाठी, परवडत नाही हे एकच कारण असायचं. […]

बालभारतीचा इतिहास पुस्तक आणि फिल्मच्या रूपात

राज्याच्या शैक्षणिक जडणघडणीत आणि प्रगतीत `बालभारती`ची भूमिका मोलाची आहे. बालभारतीच्या या वैभवशाली इतिहासाचे दस्तऐवजीकरण होणे गरजेचे होतं. ‘बालभारती’च्या सुवर्णमहोत्सवाचे निमित्त साधून संस्थेच्या इतिहासाचा-वाटचालीचा दस्तऐवज (डाॅक्युमेंटेशन) करण्याचं ठरलं. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त साकारलेलं हे पुस्तक बालभारतीच्या तसेच राज्याच्या शैक्षणिक-सामाजिक वाटचालीचा महत्वाचा दस्तऐवज ठरणार आहे. […]

सिंधुदुर्गातले सुपुत्र – “बाबी कलिंगण”

दळणवळणाची अपुरी साधने आणि शेतीवर पोट असलेल्या या कलावंतांने अखेरपर्यंत कलेची कास सोडली नाही. काही वर्षांपूर्वीच पडद्याआड गेलेले बाबी नालंग आणि बाबी कलिंगण हे दोन दशावतारी कलेचे शिलेदार होते. “श्री. बाबी कलिंगण यांना राज्यस्तरीय लोककला पुरस्काराने गौरविण्यात आले होते “.सिंधुदूर्गात दशावतारी म्हणजे ” रात्री राजा आणि सकाळी कपाळावर बोजा ” अशी स्थिती एके काळी होती. त्या वेळपासून लोककलेची सेवा हाच परमधर्म असे समजून हा कलाकार राबला त्याची शासनाने दखल घेतली हे बरं झालं. […]

शृंगार मराठीचा

शृंगार मराठीचा नववधू परी, अनुस्वाराचं कुंकू भाळावरी. प्रश्न चिन्हांचे डूल डुलती कानी, स्वल्पविरामाची नथ भर घाली. काना काना जोडून राणी हार केला, वेलांटीचा पदर शोभे तिला. मात्र्यात गुंफिले चाफ्याचे फूल वेणीत माळता पडे भूल उद् गारवाचक छल्ला असे कमरेला अवतरणाची लट खुलवी मुखड्याला उकाराची पैंजण छुमछुम करी पूर्णविरामाची तीट गालावरी. — WhatsApp वरुन 

भारतीय नावाचे “बेगडी” राष्ट्रीयत्व

एका ओळखीच्या मराठी कुटुंबाच्या घरी गेलो असतांना त्यांचा गोड लहान मुलगा दिसला. त्याला जवळ घेऊन थोडी मस्ती करतांना त्याला त्याच्या वर्गातील एखादी गोष्ट सांगण्यास सांगितले … लगेच त्याच्या “मम्मीने” मागून त्या मुलाला सुचना केली “टेल स्टोरी इन इंग्लिश” ….. […]

1 6 7 8 9 10 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..