हा मूळ अरबी शब्द फारसीद्वारें भारतात शिरलेला आहे. ग़ज़लच्या अखेरच्या शेरला मक़्ता कां म्हणतात ? तर, यानंतर गज़लाच शेवट होतो, आणि त्यानंतर शायर व श्रोते यांची ताटातूट होते. उर्दूतील हल्लीची प्रथा अशी आहे की, शायरचें गुंफलेल्या शेरला ‘मक़्ता’ म्हणतात, आणि शायरचें नांव नसलें तर त्याला केवळ ‘आ.खरी शेर’ असें म्हणतात. […]
1924 साली स्वातंत्र्यवीरांनी,भाषाशुध्दीचं आंदोलन सुरू केलं.तेव्हाच त्यांनी भाषाशुध्दि ही पुस्तिका लिहीली. या पुस्तिकेत अ ची बाराखडी तर वापरली आहेच, शिवाय अर्धा (लंगडा)र,अैवजी र् हे चिन्ह वापरलं आहे.
गीर्वाण,तुर्क,सर्वांची हे शब्द ..अर् धा, गीर् वाण, तुर् क, सर् वांची…असे लिहीले आहेत. (माझ्या संगणकावर हा र् नीट लिहीता आला नाही. प्रिंटवर हातानं दुरूस्ती करावी लागेल.). […]
बरेच साहित्यिक सुध्दा यमक जुळवण्यासाठी व्याकरणाची वाट लावतात. मला कुणावर टीका करायची नाहीये. पण असे शब्द वापरल्याने ते रूढ होत जातात आणि पुढच्या पिढीवर त्याचा दुष्परिणाम आढळतो. परिणामी भाषा बिघडते. पूर्वी थोडंसं शिक्षण घेणाऱ्यांचे सुध्दा भाषा आणि लिखाण व्याकरणदृष्ट्या अचूक आणि उत्कृष्ट असायचे. आता पदवीधरांचे सुध्दा नसते. […]
ज्या दिवशी माझी मातृभाषा मराठी ही माझी अस्मिता ठरेल आणि या अस्मितेचे पावित्र्य अबाधित राहण्यासाठी आपण प्रत्येक जण जीवापाड प्रयत्न करू करत राहू अगदी वर्षातल्या प्रत्येक दिवशी तरच, आपण ठामपणे म्हणू शकतो की मी मराठी माणूस आहे आणि मी महाराष्ट्रीयन आहे. माझी भाषा माझी अस्मिता आहे आणि या अस्मितेच्या रक्षणासाठी मी अविरत प्रयत्न करीन. तरच मराठी माणूस असल्याचा मला अभिमान आहे. असे आपण म्हणू शकतो. […]
आमची भाषा टिकेल, हें ठीक. पण मग आतां स्वस्थ बसायचं कां? आपल्या जनजीवनात, व्यापार-व्यवहारात इंग्रजीच्या तुलनेने आपल्या मातृभाषेला दुय्यम स्थान मिळूं नये, असं आम्हाला जर वाटत असेल, तर आपण त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या भाषांना आधुनिक संदर्भात समृद्ध बनविण्यासाठी झटलं पाहिजे. त्यासाठी करायच्या काही गोष्टींकडे आपण एक नजर टाकू. […]
एक गोष्ट आम्ही ध्यानात घेत नाहीं, अन् ती ही की भारताचा एकएक प्रांत युरोपातल्या एकएक देशाएवढा आहे. युरोपात एखादी भाषा जेवढ्या लोकांची मातृभाषा आहे, तेवढ्याच, किंवा संख्येने त्याहून अधिक लोकांची कुठलीही एक भारतीय भाषा ही मातृभाषा आहे. […]
भारतीय भाषांचा विचार करतांना, भारतीयांचं बहुभाषिकत्वही विचारात घ्यायला हवं. अगदी २००० वर्षांपूर्वी पाहिलं तरी, संस्कृतच्या बरोबरच पाली व अर्धमागधी व शौरसेनी, पैशाची, महाराष्ट्री ह्या भाषा अस्तित्वात होत्या. […]
आपण भाषेच्या शुद्धपणाचा परकीय भाषेच्या संदर्भात विचार केला. आतां आपण त्याचा विचार लोकभाषेच्या दृष्टीकोनातून करूं या. त्यावरून पाहूं या, इंग्रजी भारतीय भाषांचं अस्तित्व नाहीसं करून टाकील, असा निष्कर्ष निघतो कां तें. आपण आधी पाहिलंच आहे की जी लोकभाषा असते, ती टिकून राहते, कारण ती जनसामान्यांची भाषा असते. तिला प्रतिष्ठा असो वा नसो, पण तिचं अस्तित्व टिकून राहतं. […]