आमची संस्कृती नष्ट होत चालली आहे असं आमचे विचारवंत म्हणतात. पण इतिहास वेगळंच चित्र दाखवतो. परदेशी विद्वानही म्हणतात की भारतीय वांशिक समुह आपल्या संस्कृतीचं वेगळेपण नेहमी जपत असतो. म्हणूनच आमची संस्कृती व आमची भाषाही नष्ट होण्याचा पुढलया शतकात तरी कांहींहीं संभव दिसत नाहीं. […]
ज्या इंग्रजीच्या आक्रमणाची आपल्याला एवढी धास्ती वाटते, तिचंच उदाहरण पाहूं. इंग्रजीनं अनेक शब्द इतर भाषांमधून मुक्तपणे घेतले आहेत आणि त्यामुळे इंग्रजी भाषेची प्रगतीच झालेली आहे […]
तुम्हाला नवल वाटेल की फक्त फारसीतूनच भारतीय भाषांमध्ये शब्द आले आहेत असं नाहीं, तर संस्कृतमधूनही फारसीत अनेक शब्द गेलेले आहेत. या विषयावरील श्री. राजेश कोचर यांचे लेख माझ्या वाचनात आले आहेत. मुंबईचे श्री. प्रकाश वैद्य यांनीही मौलिक संशोधन केलं आहे (आणि थोडंफार मी स्वतःसुद्धां ). […]
टीप – १९९०च्या दशकाच्या मध्यावर , वडोदरा — बड़ोदा — येथें भरलेल्या ‘गुजरात मराठी साहित्य संमेलना’त, प्रस्तुत लेखकानें हा ‘पेपर’ — प्रबंध — वाचला होता. आज पंचवीसएक वर्षांनंतर, त्यावर, आजच्या परिस्थितीनुसार भाष्य करण्यांसाठी एक नवीन लेख यथावकाश लिहिला जाईल. तूर्तास, ही पुनर्भेट.. […]
“इंग्रजी बोलता येत नसेल तर लाज बाळगण्याचे काहीच कारण नाही” कारण “लाज त्याने बाळगावी ज्याला स्वतःची मातृभाषाच येत नाही.” सतत इतरांना फुकटचे सल्ले देताना जर कुणी म्हणत असेल की, मराठी भाषा टिकवा तर त्यांना माझे इतकेच सांगणे आहे की, मराठी भाषा टिकवा नव्हे ! तर आपण सर्वांनी मिळून टिकवूया असेच म्हणावे लागेल. […]
यंदाच्या यवतमाळात होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नामवंत कवयित्री अरुणा ढेरे यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे मराठी संमेलनाला लागलेला वादाचा शाप यावेळी पुसला जाणार, असे वाटत असतानाच उद्घाटकांच्या निमंत्रणावरून संमेलनाच्या सहा दिवस आधी निर्माण झालेल्या वादाने सगळ्या उत्साहावर पाणी फिरवले आहे. […]
अ पासून अ: पर्यंतचे बारा स्वर आणि क पासून क: पर्यंतचा बारा व्यंजनांचा संच असतो म्हणून देवनागरी वर्णमालेत बाराखडी आहे असं समजतात. अिंग्रजीच्या आक्रमणानंतर, अॅ आणिऑ या स्वरांची तसंच कॅ अणि कॉ वगैरे व्यंजनांची सोय करणं आवश्यक होतं. या दोन अक्षरचिन्हांचा समावेश केला की देवनागरीची चौदाखडी होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, १९२४ च्या सुमारास भाषाशुद्धीची चळवळ सुरू केली. त्यात थोडी लिपीशुद्धीही होती. त्यांची तर्कशुध्द विचारसरणी म्हणजे….क ला वेलांटी […]
महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याने नीटची परीक्षा देत असताना परीक्षा अर्ज भरतानाच मराठी ही उत्तराची भाषा निवडण्याची काळजी घ्यावी असे केल्यास मिळणारे मोठे यश पुढील वर्षी निकाला नंतर मला कळवावे हे आवाहन ! […]
नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आणि विदर्भाची राजधानी. नागपूरची मराठी हिंदीमिश्रित आहे. नागपूरहून यवतमाळला आलं की या मराठीचं स्वरूप बदलतं. बुलढाण्यातली मराठी मात्र या दोन्हीपेक्षा आणखीनच वेगळी आहे. बुलढाण्यातल्या बोलीतही हिंदी शब्दांचा सर्रास वापर केला जातो. प्रमाण मराठीपेक्षा इथली बोली फार वेगळी आहे. […]