नवीन लेखन...

मराठी भाषा आणि संस्कृतीविषयी लेख..

वर्‍हाडातली गाणी – १८

हत्तीच्या सोंडेवर पेरीला मगर मगरच्या राजाने शाळा मस्त केली शाळेच्या राजाचे चंदनाचे गोटे एवढ्या रातरी धून कोण धुते धून धुय ग बाई चंदन गोटयावरी वाळू घाल ग बाई रंगीत खुंटी वरी आला चेंडू गेला चेंडू लाल चेंडू गुलाबी आपण सारे हत्ती घोडे हत्ती घोडे रवे रवे रव्याचे भाऊ वाणीला गेले एक गेला खारीला एक गेला खोबरीला […]

ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची आवश्यकता

मानव अभिव्यक्तीप्रधान प्राणी आहे. आपले अस्तित्व सिध्द करण्यासाठी त्याची धडपड असते.ते झाले तर जीवनात सफलता येते. जगण्यात जीवंतपणा येतो. आपली संस्कृती जतन करता येते. भावभावना आणि सृजनाचा मुक्त आविष्कार होत असतो. प्रबोधन होते. संस्कार होतात. समाज घडतो. सामाजिक घडामोडींचे प्रतिबिंब साहित्यात उतरत असते. तद्वतच साहित्य जगण्याचे नवे भान देते. वेदना, आक्रोश, प्रेम, शौर्य, विद्रोह, हर्ष यासम […]

वर्‍हाडातली गाणी – १७

एक लिंब झेलू बाई दोन लिंब झेलू दोन लिंब झेलू बाई तीन लिंब झेलू तीन लिंब झेलू बाई चार लिंब झेलू चार लिंब झेलू बाई पाच लिंब झेलू पाचाचा पानोडा माय गेली हन्मंता हन्मंताचे ————————– —————येता जाता कंबर मोडी नीज रे नीज रे तान्ह्या बाळा मी तर जातो सोनार वाडा सोनार वाड्यातून काय काय आणले —————————————- […]

वर्‍हाडातली गाणी – १६

पहिल्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा सरता सरता नंदन घराच्या नंदन घराच्या बगिच्या वरी चिंचा बहुत लागल्या भुलाबाई राणीचे डोहाळे तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी पलंग फिरे चौक फिरे शंकर बसिले शेजारी ।।१।। ……………………………………. दुसऱ्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा सरता सरता नंदन घराच्या नंदन घराच्या बगिच्या वरी पेरू बहुत लागले […]

वर्‍हाडातली गाणी – १५

झापर कुत्र सोडा ग बाई सोडा ग बाई चारी दरवाजे लावा ग बाई लावा ग बाई कोण पाव्हणे आले ग बाई आले ग बाई सासरे पाव्हणे आले ग बाई आले ग बाई झापर कुत्र बांधा ग बाई बांधा ग बाई चारी दरवाजे उघडा ग बाई उघडा ग बाई कोण पाव्हणे आले ग बाई आले ग बाई […]

वर्‍हाडातली गाणी – १४

चादण्या रात्री आम्ही भुलाबाई जागवल्या जागवल्या सासू म्हणते सुने सुने तो पाटल्यांचा जोड काय केला काय केला हरवला हरवला, तुमच काय जाते माझ्या बाबाने घडवला घडवला चादण्या रात्री आम्ही भुलाबाई जागवल्या जागवल्या

वर्‍हाडातली गाणी – १३

यादवरा या राणी रुसून बैसली कैसी सासूरवाशीण सून घरात येना कैसी सासू गेली समजावयाला चला चला सुनबाई अपुल्या घराला मी नाही यायची तुमच्या घराला माझा पाटल्यांचा जोड देते तुम्हाला तुमचा पाटल्यांचा जोड नको मजला मी नाही यायची तुमच्या घराला यादवरा या राणी रुसून बैसली कैसी सासरे गेले समजावयाला चला चला सुनबाई अपुल्या घराला मी नाही यायची […]

वर्‍हाडातली गाणी – १२

कारल्याची बी पेर ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा कारल्याची बी पेरली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना कारल्याला कोंब येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा कारल्याला कोंब आल हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना कारल्याला वेल येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा कारल्याला वेल […]

वर्‍हाडातली गाणी – ११

अक्कण माती चिक्कण माती अशी माती सुरेख बाई जातss ते टाकाव अस जात सुरेख बाई गहू ते वल्वावे असे गहू सुरेख बाई रवा तो पाडावा असा रवा सुरेख बाई करंज्या भराव्या अशा करंज्या सुरेख बाई तबकात ठेवाव्या अस तबक सुरेख बाई शालुनी झाकाव असा शालू सुरेख बाई खेळायला सापडते अस सासर द्वाड बाई कोंडू कोंडू मारीते […]

वर्‍हाडातली गाणी – १०

आमचे मामा व्यापारी व्यापारी तोंडात चिक्कण सुपारी सुपारी सुपारी काही फुटेना फुटेना मामा काही उठेना उठेना सुपारी गेले गडगडत गडगडत मामा आले बडबडत बडबडत सुपारी गेली फुटून फुटून मामा आले उठून उठून

1 8 9 10 11 12 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..