नवीन लेखन...

मराठी भाषा आणि संस्कृतीविषयी लेख..

कृष्णावळ

कृष्णावळ – अर्थाच्या दृष्टीने अतिशय लक्षणीय असा हा शब्द आजकाल कोणीही वापरत नाही. कृष्णावळ चा अर्थ कांदा ! कांद्याला असे म्हणण्याचे कारण गंमतशीर आहे. कांदा उभा चिरला, तर तो शंखाकृती दिसतो आणि आडवा चिरला, तर तो चक्राकृती दिसतो. शंख आणि चक्र ही दोन्ही श्रीकृष्णाची आयुधे आहेत. ही दोन्ही आयुधे एका कांद्यात पहायला मिळतात, म्हणून गमतीने कांद्याला […]

सुवर्णमहोत्सव राज्याचा : १ मे, २०१०

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त सहा वर्षांपूर्वी, १ मे २०१० रोजी लिहिलेलें हें काव्य आजही कालानुरूपच (रेलिव्हंट) वाटतें. १. सुवर्णमहोत्सव हा सुवर्णाक्षरांनी लिहा क्रमांक पहिला’ फलक वाहा असूं देत क्रम नऊ-दहा. ‘महाराष्ट्र हें राज्य महा’ फलद्रूप होईल मंत्र हा अनंत वाट पहा ।। २. नंभर-नंबरी सोनें नच हें , फक्त मुलामा वरचा घोडा-पहिला, कधीच झाला शर्यतीत शेवटचा […]

‘मी मराठी’ असल्याचा अभिमान

पु.ल.देशपांडे यांच्या लेखावर आधारित खालील उतारा ‘मी मराठी’ असल्याच्या कडव्या अभिमानाने व महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने प्रकाशित केला होता. तो आपल्यासाठी पुन्हा एकदा. महाराष्ट्र दिनाच्या सर्वचजण एकमेकांना शुभेच्छा देतात. परंतू या शुभेच्छा देताना काही गोष्टींची, विशेषतः महाराष्ट्राच्या ‘मराठी परंपरे’ची, आठवण करून देण्यासाठी खालील उतारा लिहीला आहे. थोडा वेळ काढून जरूर वाचावा ही विनंती.. ‘..मुघल काय किंवा इंग्रज […]

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

दरवर्षी महाराष्ट्र दिन अणि शिवजयंतीला हमखास वाजणारे महाराष्ट्र गौरव गीत म्हणजे “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” हे. कवी राजा बढे यांनी लिहिलेलं आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत शाहिर साबळे यांनी त्यांच्या खणखणीत आवाजानं अजरामर केलं. नंतरच्या काळात अनेकांनी ते गायलं पण शाहिर साबळे यांची सर कोणालाच आली नाही. जय जय […]

बहु असोत सुंदर संपन्न की महा

महाराष्ट्राचा गौरव करणारी अनेक गीते अनेक कवींनी लिहिलेली आहेत. यातली काही निवडक महाराष्ट्र गीते या मालिकेत सादर करत आहोत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेलं हे एक महाराष्ट्रगीत. बहु असोत सुंदर संपन्न की महा । प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।। गगनभेदी गिरीविण अणु नच जिथे उणे । आकांक्षांपुढती जिथे गगन ठेंगणे । अटकेवरी जेथिल तुरंगि […]

राजभाषेचे दिवस

गेले काही दिवस रस्त्यारस्त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लावलेली मोठमोठी होर्डिंग बघतो आहे. गुढीपाडव्याचा मनसेचा मेळावा शिवाजी पार्कला होणार आहे आणि त्याचं आमंत्रण देणार्‍या या होर्डिंग्सवर राजभाषेची आठवण करुन दिलेली आहे. लवकरच महाराष्ट्र दिवस येत आहे. मोठा गाजावाजा करत तो साजरा होईल. दर वर्षी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी जागतिक मराठी दिवस पाळला जातो. तोसुद्धा थाटामाटात पार पडतो. कार्यक्रम होतात, […]

बाजीराव-मस्तानी आणि मराठी अलंकार

बाजीराव-मस्तानी हा बिग बजेट हिंदी चित्रपट यावर्षीच्या चित्रपटांमधील एक भव्य-दिव्यपणे प्रदर्शित झालेला आहे. यात बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या प्रेमकथेचे चित्रण केले आहे. मराठी अलंकार हे या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य आहे. या पेशवेकालीन अलंकारातून त्यावेळच्या संस्कृतीची ओळख होते. या अलंकारांच्या निर्मितीसाठी पुण्याच्या सुप्रसिद्ध “पी एन गाडगीळ अॅन्ड सन्स” यांच्यावर जबाबदारी सोपवली गेली आणि ती त्यांनी सार्थपणे […]

शिवराय आणि बाजीरावाचा महाराष्ट्र

दादरा, नगर हवेली, वापी या भागात मी फिरलो आहे. चर्चगेट पासून ते वापी पर्यंत महाराष्ट्र गिळला गेला आहे. उंबरगाव महाराष्ट्रात सामील करण्याचा लढा संपला…. इतिहास जमा झाला. बेळगाव, कारवार, निपाणीचे लोक महाराष्ट्रात येण्यासाठी महाराष्ट्राच्या दरवाजावर अनेक वर्षे टक्कर देत आहेत. त्यांचा कपाळमोक्ष झाला. कानडी पोलिसांच्या लाठ्या काठ्या खावून त्यांची हाडे पीचली आहेत पण अजूनही ते लढत […]

मराठीचा पहिला ग्रंथ ‘विवेकसिंधू’ आजही उपेक्षाग्रस्त

मराठीतला पहिला ग्रंथ कोणता असा प्रश्न विचारला की पहिले उत्तर असते “ज्ञानेश्वरी”. मात्र ज्ञानेश्वरीच्याही आधी १०० वर्षांपूर्वी मराठीतला पहिला ग्रंथ लिहिला गेला तो होता “विवेकसिंधू” आणि त्याचे लेखक होते “मुकुंदराज”. ज्ञानेश्‍वरीच्या मोठेपणाला आव्हान देण्याचे कारण नाही. परंतु ज्ञानेश्‍वरी मराठीचा आद्यग्रंथ नक्कीच नाही असे मुकुंदराजांच्या अनुयायांचे म्हणणे आहे. मराठी जगतेय की मरतेय यावर तावातावाने चर्चा करणार्‍या आणि […]

मराठीतली विलोमपदे

Palindrome म्हणजे असा शब्द, वाक्प्रचार , वाक्य किंवा कोणतीही अर्थपूर्ण अक्षररचना जी शेवटाकडून सुरूवातीकडे वाचत गेलं तरी बदलत नाही. इंग्रजीत Palindrome ची रेलचेल आहे. पण मराठीत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच. लहानपणी तर दोन तीनच माहित होते. १) चिमा काय कामाची २) ती होडी जाडी होती. ३) रामाला भाला मारा. पण अलिकडे कळलं की मराठीत Palindrome ला ‘विलोमपद’ […]

1 9 10 11 12 13 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..