नवीन लेखन...

मराठी भाषा आणि संस्कृतीविषयी लेख..

मराठीत “लागण्याची” गंमत बघा

मराठी भाषा अफाट आहे आणि पुलंसारख्यांनी तिची गोडी आणखीनच वाढवलेय.. एखादा शब्द किंवा क्रियापद घेउन किती सुंदर वाक्यरचना केली जाऊ शकते याचे हे उदाहरण […]

‘चार’ची गाथा …

आज ४ तारिख… चार (४) या आकड्याची आणखी गंमत बघा….. थोडी कडू थोडी गोड पण जिला नाही तोड अशी ही चौपदरी कथा आहे ! चारची खरी बाजू ‘ चार ‘ दिशेत आहे ! ‘ चार ‘ खांबांशिवाय घर बांधता येत नाही. ‘ चार ‘ गोष्टी शिकल्याशिवाय शहाणपणा येत नाही. ‘ चार ‘ चौघात जे बोलू नये ते […]

गंमत ४ ची

आज ४ तारिख… चार (४) या आकड्याची गंमत बघा….. 1) औषधोप४ २) मानसोप४ 3) प्रथमोप४ 1) समोप४ 2) पाहुण४ 3) सदवि४ 4) दूरवि४ 1) सं४ 2) वि४ 3) आ४ 4) प्र४ 5) ला४ 1) सदा४ 2) समा४ 3) शिष्टा४ 4) भ्रष्टा४ 5) अत्या४ 6) सुवि४ 7) उप४ 8) अवि४ 9) कुवि४ 10) हिंसा४

ळी या अक्षराने संपणारे दोन अक्षरी शब्द

_ ळी या अक्षराने संपणारे दोन अक्षरी शब्द (१) फूल उमलण्याआधीची अवस्था – कळी (२) पिकावर पडणारी किड — आळी (३) गालावर पडणारा खड्डा — खळी (४) साखर बनवल्यावर उरते- मळी (५) बंदूकीला असते — नळी (६) पंचपात्राची सोबतीण — पळी (७) एका हाताने वाजत नाही — टाळी (८) साडी सोबत असते — चोळी (९) बागेचा […]

सहज-सुलभ आणि गोड अशी नारायण पेठी बोली

असे म्हटले जाते की दर दहा कोसावर भाषा बदलते. त्यामुळेच आपल्याकडे बोली भाषांना महत्त्व असावे. मराठीच्या अनेक बोली भाषा आहेत. या नानाविध बोली भाषांनी मराठी भाषा समृद्ध झाली आहे. पुण्यातील शनिवार पेठ, नारायण पेठ आणि सदाशिव पेठ या पेठांमध्ये बोलली जाणारी भाषा शुद्ध असे एकेकाळी मानले जात होते. मात्र पुण्यातली नारायण पेठी म्हणजे प्रमाण भाषा हे […]

साहित्य संमेलनातील योगायोग

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या इतिहासात डोकावले तर अनेक मजेशीर गोष्टी लक्षात येतात. या संमेलनाच्या आयोजनातून अनेक योगायोगही जन्माला येत असतात. अशाच काही योगायोगांचा आढावा. पहिली पाच संमेलने ग्रंथकार संमेलने या नावाने भरली. या संमेलनांना स्वागताध्यक्ष नव्हता. १९०८ च्या पुणे संमेलनाला प्रथमच स्वागताध्यक्ष लाभले आणि ते होते वा.गो.आपटे. न्यायमूर्ती म.गो.रानडे १८७८ मध्ये पुण्यात भरलेल्या साहित्य संमेलनाचे […]

मराठी अक्षरानुक्रम – एक विचार

अंग्रजीत अे पासून झेड् पर्यंत 26 अक्षरे असल्यामुळे आणि त्यांना काना मात्रा वेलांटया नसल्यामुळे अक्षरानुक्रम पाळणे फार सोपे आहे. पण देवनागरीतील कोशवाङमयात बर्‍याच अडचणी येतात. देवनागरीतील वेगवेगळे कोश किंवा मराठी पुस्तकांच्या शेवटी असलेली सूची बघितली तर चटकन लक्षात येते की मराठीत अक्षरानुक्रम पाळण्यात अेकसूत्रता नाही. ती आणणे आणि अंग्रजीतून आलेले विज्ञानविषयक किंवा अतर शब्द सामावून घेण्यासाठी […]

बृहन्महाराष्ट्र व महाराष्ट्रीयत्व

बृहन्महाराष्ट्र हा जो शब्द आजकाल सर्वत्र वापरात आहे, त्याबद्दल प्रथमच एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, ती ही की, ‘महाराष्ट्र’ ही एक भौगोलिक, सांस्कृतिक, आणि आतां राजकीयही, संकल्पना आहे ; परंतु ‘बृहन्महाराष्ट्र’ ही केवळ सांस्कृतिक संज्ञा आहे. भूगोलाच्या दृष्टिकोनातून बघायचें झाल्यास, बृहन्महाराष्ट्रीय म्हणजे, ‘ज्यांनी किंवा ज्यांच्या पूर्वजांनी महाराष्ट्राबाहेरील प्रदेशात स्थलांतर केलेले आहे, असे महाराष्ट्रीय जन’, असें म्हणायला हरकत नाहीं. तेव्हां, बृहन्महाराष्ट्राबद्दल चर्चा करतांना, आधी आपण महाराष्ट्र, महाराष्ट्रीय व महाराष्ट्रीयत्व या शब्दांचा विचार करायला हवा. […]

प्रमाणित अक्षरचिन्हं आणि लिपी

मराठीतील अक्षरचिन्हे, स्वरमाला आणि व्यंजनमालेविषयी एक विवेचन…. पारंपारिक वर्णमाला : स्वरमाला आणि व्यंजनमाला  पारंपारिक स्वरमाला : अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं (अुच्चार…अनुस्वार) अ: (विसर्ग, नेहमीचा सामान्य अुच्चार…. अहा..), ऋ (र्‍हस्व आणि दीर्घ. दीर्घ ऋ संगणकावर मला टाअीप करता आला नाही), लृ (र्‍हस्व आणि दीर्घ) असे अेकूण १६ स्वर आहेत. पारंपारिक व्यंजनमाला : कंठ्य (Guttural) :: क ख ग […]

1 11 12 13 14 15 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..