नवीन लेखन...
Avatar
About विजय लिमये
श्री विजय लिमये हे नागपूर येथील Eco friendly Living Foundation चे अध्यक्ष आहेत. ते पर्यावरण या विषयावर जनजागृती करत असतात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर लेखन करतात.

रमी

पत्त्यांचे अनेक खेळ आहेत त्यात, रमी हा खेळ आपल्या जीवनाशी बराचसा निगडित आहे, म्हणून तो मला बाकीच्या पत्यांच्या खेळापेक्षा थोडा हटके वाटतो. या खेळात जीवनाची अनेक सूत्रे सापडतात. प्रत्येक खेळाडू यात पत्ते वाटतो….त्याला ते वाटावेच लागतात, याचा अर्थ त्याला जीवनाच्या सारीपाटात सूट नाही. जर हा खेळ पुढे सुरू ठेवायचा असेल तर, स्वतःची जबाबदारी प्रत्येकाला पार पाडावीच लागते. […]

दुर्दैवी दुखणे

सोनियाजी व शरदराव त्यांच्या दुखण्याच्या इलाजासाठी वारंवार परदेश गमन करून करदात्यांचा पैसा उधळतात. हो उधळणे असा शब्द मी वापरला आहे, कदाचित त्यांचे दुखणे पाहून हा शब्द, असहिष्णू असाच वाटेल; नाही तो आहेच हे माझे हि ठाम मत आहे, कदाचित लोकांचा रोष ओढवून घेण्यासाठीच मी हा शब्द वापरत आहे असे त्यांच्या भक्तांनी समजावे. आपल्या देशात साठ वर्षातील […]

जाहिरातींचे मायाजाल

जो खोटे बोलतो तो सर्वात मोठ्याने ओरडून सांगतो, हा मानसिकतेचा नियम आहे. चोवीस तास टीव्ही व रेडिओ वर साबण, तेल, सुंदर दिसण्याची क्रीम, शीतपेय, टूथपेस्ट, यांच्या हास्यास्पद जाहिराती आपल्याला दाखवतात यातून आम्ही काय बोध घ्यावा हेच समजत नाही. आजकाल हिंदी चित्रपटातील हिरो शितपेयातील जाहिरातीत सुपरमॅन सुद्धा न करू शकणारे स्टंट करून दाखवतात व शेवटी शीतपेय पिताना […]

शिक्षित अडाणी

युनिव्हर्सिटी कॅम्पसच्या बाहेर एक भाजी विक्रेता फुटपाथवर जवळपास पंचवीस प्रकारच्या भाज्या विकायला बसतो. भाजी घेणाऱ्यांची तोबा गर्दी असते, साधारण वाडीकडे जाणारे सर्व लोक यांच्याकडूनच भाजी घेतात, याचे प्रमुख कारण भाजी बाजारभावापेक्षा स्वस्त असते. सर्व दुचाकी व तुरळक चारचाकी पण इथे थांबून भाजी घेऊन पुढे जातात, हा विक्रेता भाजी घेणाऱ्या प्रत्येकाला एका भाजीला एक प्लास्टिक पिशवी देतो, […]

मिठास जागा, मिठावर जगू नका

श्रीकृष्ण रुक्मिणी एकांतात गप्पा छाटत होते, अचानक रुक्मिणी लाडात येऊन म्हणाली, मी तुम्हाला कशी आहे असे वाटते. श्रीकृष्ण स्मित हास्य करून म्हणाले, रुक्मिणी काय सांगू तुला, तुझे महत्व माझ्यासाठी अनमोल आहे, तू अगदी मिठासारखी आहेस. का………..य, मी मिठासारखी खारट वाटते तुम्हाला, आणि मुसमुसून रडायला सुरवात झाली. श्रीकृष्ण तिला सर्वतोपरी समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण रुक्मिणी काही […]

वर्‍हाडातली गाणी – १८

हत्तीच्या सोंडेवर पेरीला मगर मगरच्या राजाने शाळा मस्त केली शाळेच्या राजाचे चंदनाचे गोटे एवढ्या रातरी धून कोण धुते धून धुय ग बाई चंदन गोटयावरी वाळू घाल ग बाई रंगीत खुंटी वरी आला चेंडू गेला चेंडू लाल चेंडू गुलाबी आपण सारे हत्ती घोडे हत्ती घोडे रवे रवे रव्याचे भाऊ वाणीला गेले एक गेला खारीला एक गेला खोबरीला […]

वर्‍हाडातली गाणी – १७

एक लिंब झेलू बाई दोन लिंब झेलू दोन लिंब झेलू बाई तीन लिंब झेलू तीन लिंब झेलू बाई चार लिंब झेलू चार लिंब झेलू बाई पाच लिंब झेलू पाचाचा पानोडा माय गेली हन्मंता हन्मंताचे ————————– —————येता जाता कंबर मोडी नीज रे नीज रे तान्ह्या बाळा मी तर जातो सोनार वाडा सोनार वाड्यातून काय काय आणले —————————————- […]

वर्‍हाडातली गाणी – १६

पहिल्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा सरता सरता नंदन घराच्या नंदन घराच्या बगिच्या वरी चिंचा बहुत लागल्या भुलाबाई राणीचे डोहाळे तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी पलंग फिरे चौक फिरे शंकर बसिले शेजारी ।।१।। ……………………………………. दुसऱ्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा सरता सरता नंदन घराच्या नंदन घराच्या बगिच्या वरी पेरू बहुत लागले […]

वर्‍हाडातली गाणी – १५

झापर कुत्र सोडा ग बाई सोडा ग बाई चारी दरवाजे लावा ग बाई लावा ग बाई कोण पाव्हणे आले ग बाई आले ग बाई सासरे पाव्हणे आले ग बाई आले ग बाई झापर कुत्र बांधा ग बाई बांधा ग बाई चारी दरवाजे उघडा ग बाई उघडा ग बाई कोण पाव्हणे आले ग बाई आले ग बाई […]

वर्‍हाडातली गाणी – १४

चादण्या रात्री आम्ही भुलाबाई जागवल्या जागवल्या सासू म्हणते सुने सुने तो पाटल्यांचा जोड काय केला काय केला हरवला हरवला, तुमच काय जाते माझ्या बाबाने घडवला घडवला चादण्या रात्री आम्ही भुलाबाई जागवल्या जागवल्या

1 2 3 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..