Avatar
About विठ्ठल जाधव
श्री विट्ठल जाधव हे अनेक मराठी पुस्तकांचे लेखक आहेत. ते बीड जिल्ह्यातील शिरुरकासार येथील रहिवासी असून पुण्यनगरी आणि इतर वृत्तपत्रांमध्ये नियमित लेखन करत असतात. त्यांना साहित्यविषयक अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

गुरूजींची बदली

एक बातमी धडकली. गरूजींची बदली झाली. आता ते दुसऱ्या गावी जाणार होते. मनाला वेदना होऊ लागल्या. सरकारी आदेश आला होता. नाईलाज झाला होता. गुरुजींनी बदली मागितली नव्हती. तरीही बदली झाली. मुलं पोरकी झाली. मुलं रडत होती. गाव डोळे पुसत होते. पाठमोरी आकृती धुसर होत होती.  […]

बाजारचा खाऊ

तू एक बहीण आम्ही तिघे भाऊ वाटे टाकू चार मिळून खाऊ, खाऊ बाजारच्या खाऊची मजा असते भारी पुडा सोडताच तोंडा सुटते खारी गोडीशेव, जिलेबी शिळे नको ताजे आई म्हणते कशी नका खाऊ भजे रंग फळांचा दिसे गंज आबलुकवाणी दाताने कुरतडावे जिभेस सुटते पाणी उघडा खाऊ खाऊन दुखेल बरकां पोट पालेभाज्या खाऊन सुधारते ती तब्येत सकस खा, […]

जंगलचे नेटवर्क

कावळ्याचे नवे फेसबुक भलतेच आले बघा रंगात रोजरोज न जाता शाळेत शिका म्हणे नेटच्या घरात कोल्होबाचे व्हॉट्सऍप करते करामती भारी जंगलातील बित्तंबातमी येते लगेच स्क्रीनवरी सिंहाचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा म्हणे जंगली कविता म्हणतो लाईक्स वाढवा म्हणे सारा सोशल मिडिया जंगलात शिरला आहे म्हातारीचा मोबाईल वाघानंं पळवला आहे! जंगलातील शांतता मोबाईलने भंगली कोल्हेकुई,डरकाळी नेटवर्कने थांबली! — […]

सोरड

पिकांनी माना टाकल्या होत्या. उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत होता. नद्या आटलेल्या , कोरडयाठाक पडलेल्या होत्या. अंगाभेवती चिलटं घोंगावेत. पुन्हा हातानं हानावेत. तशी माणसं कावल्यागत झाल्ती . पावसाचा शिपका जूनमधी पडून गेल्ता. त्यानंतर गोमतार शिंपडल्यावाणी तरी यायचं त्यांनी. चार- दोन ढगं आभाळात यायचे . […]

हे यंत्रा!

हे यंत्रा ! तुझी जात कोणती? तुझा धर्म कोणता? तुझा पक्ष कोणता? तू सनातन आहेस? कि पुरोगामी आहेस? तू सजीव आहेस? कि निर्जीव आहेस? का बनवतोस रस्ता? धर्मनिरपेक्ष तुझे काम संविधानावर तर चालतोयस.. मानवी कल्याणासाठी तू.. यंत्रयुगातील तू.. कोणती घ्यावी शिकवण? हे यंत्रा ! विठ्ठल जाधव शिरूर, जि.बीड सं.९४२१४४२९९५

हुशार राजू

राजू नावाचा एक छोटा मुलगा. चुणचुणीत आणि गोड स्वभावाचा. सकाळी लवकर उठायचा. आंघोळ करायचा. आई वडील आणि घरातील मोठ्या माणसांच्या पायी डोके ठेवायचा. नम्रपणा हा त्यांचा विशेष गुण होता. अभ्यासातही हुशार होता. मित्रांशी सहकार्याने वागायचा. घरच्या कामाची त्याला खूप आवड होती. त्यांचे वडील त्याला खूप जीव लावायचे. सकाळी शाळेत सोडायचे.घरी आला की नाही ते पहायचे. घरी […]

भाकर आणि वावर

मुलगा म्हणाला बापाला ‘पप्पा,गुगलवर हवं ते मिळते, जसं म्हणावं तस ते ऐकते’ मग तो म्हणाला, ‘ हे गुगल, सिंग अ साँग फाॅर मी’ गुगलने लगेच गाणे म्हटले. ‘ओके ,व्हाट्स अबाऊट टुडे.’ आजचा दिनविशेष सांगितला ‘हे गुगल , शो टुडेज वेदर ‘ लगेच गुगलने आजचे तापमान सांगितले. बाप म्हणाला, ‘वाss बेटा, वाss!’ बरं बेटा आता गुगलला हे […]

आईचा वाढदिवस

मी खुदकन हसलो तू गालात हसतेस मी रडरड रडलो तू छातीशी धरतेस मी शाळेत असताना वाट सारखी पाहतेस डबा तसाच दिसला तू लालेलाल होतेस असे माझा वाढदिवस तू दिनरात राबतेस आयाबाया बोलावून ओवाळणी करतेस कधीतरी साजरा कर आई तुझा वाढदिवस आम्हीही भरवू तोंडी पेढ्यांचा जो गोडघास आई , बन तू लेकरू आम्ही तुझी माय होवू तुला […]

झेंडू

उन्हातही फुलावेस असा तुझा रूबाब आहे निसर्गाचे वरदान पिवळाझेंडू लाजवाब आहे कशास शोधू तो स्वर्ग कुठला कुणास ठाऊक ? बळीराजा इथेच घडवितो दार स्वर्गाचे मनभाऊक.. विठ्ठल जाधव शिरूरकासार (बीड) सं. ९४२१४४२९९५

1 2 3 5